रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

फुले, .......भगवंताचीच मुले !!!

माझ्या अंगणात जास्वंद फुलले,
गणपतिच्या चरणी मी ते वाहिले,

पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे,
कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे,

मोग-याचा सुगंध पसरला सगळीकडे,
भगवंताच्या दर्शनासाठी अवघे झाले मन वेड़े,

कमळ दल पुष्प जरी अवतरले असे चिखलात,
महालक्ष्मीला ते प्यारे, वसे ते तिच्या करकमलात,

सदाफुलीची ही फुले सदा फुलती आपल्या आसपास,
औषधी असती, लाभतो त्यांना भगवंताचा सहवास,

अनंताचे वर्णन काय मुखी करावे?
नावातच त्याच्या 'अनंत', अनंत वेळा स्मरावे,

सताचा रंग हा शुभ्र, सताच्या सान्निध्यात रहावे,
हिच असे मनिषा तयाची, सद्गुरूंच्या चरणी त्यांना वहावे,

कुणी त्यांच्या गळ्यात जाऊनी पड़े,
तर कुणी घाली भक्ती भावाने साकडे,

कुणी त्याच्या चरणांसाठी आसुसले,
अशी ही फुले, जशी कांही भगवंताचीच मुले,

सुगंध तयांचा सगळीकडे दरवळे,
भगवंताच्या चरणी वाहूनी भक्तगणही सुखावले........!!

मयुर तोंड़वळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: