बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जाणीतसे !! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव
  तेणे आत्मस्थिती जाणीतसे  !!
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतूरहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टि ज्या माणसाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे, पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव  घेऊ शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो ?
अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परिने सद्गुरू चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही.

मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वराने, अनंतानी मानवाला शक्ति दिलेली आहे. ही शक्ति सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाही असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर  सद्गुरू चरणात, सत चरणात लय असेल तर सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवतात. सद्गुरूंच्या ठिकाणी त्या ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे?

एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब  सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. ...........

पुढे चालू 2

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: