शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

गीता 2

"कृष्ण म्हणजे तुझा आतील आवाज, तुझा अंतरात्मा, तुझा दिशादर्शक प्रकाश आणि तू जर का तुझ्या जीवनाला त्या कृष्णाच्या स्वाधीन केलेस तर तुला जीवनात काळजी करण्यासारखे काहीच उरणार नाही."

ह्या बरोबर संजय सुन्न / स्तब्ध झाला व पुन्हा भानावर येऊन प्रश्न करता झाला, "मग महानुभव, मला सांगा, द्रोणाचार्य आणि भीष्म हे दुर्गुणी होते का, जे कौरवांच्या बाजूने लढले? ह्या प्रश्नावर दु:खी होऊन त्या वृद्धाने नकारार्थी मान ड़ोलवली.

जसे तुम्ही वयाने वाढता तसे तुमचा वयस्करांकड़े पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. "तुमच्या वाढत्या वयात तुम्हाला असे वाटू लागते की जे वयस्कर तुमच्या लहानपणी सगळ्याच बाबतीत चांगले आदर्शवत होते ते तसे नाहीत. त्यांच्यामध्ये सुद्धा दोष आहेत. आणि एके दिवशी तुम्हाला विचार करावासा वाटतो की ते खरच तुमच्या भल्यासाठी आहेत की वाईटासाठी आहेत. तुम्हाला असाही साक्षात्कार होईल की तुम्हाला त्यांच्याबरोबर तुमच्या भल्यासाठी भांडणही करावे लागेल. आणि वय वाढतानाचा हा सगळ्यात कठीण असा कालक्रम असेल आणि त्यासाठीच अशावेळी "गीता" ही महत्त्वाची असणार आहे."

संजय जमिनीवर निश्चल पड़ला, का तर तो थकला होता म्हणून नव्हे तर त्याचे कारण होते की तो ते समजत होता आणि ह्या संपूर्ण प्रकरणातील अघोरपणा दुष्टपणा त्याला जाणवला होता.

तो विचारता झाला, "मग कर्णाबद्दल काय?"

"ह!" तो वृद्ध म्हणाला. तू अत्युत्तम ते शेवटाला ठेवलेस. कर्ण म्हणजे तुझ्या त्या पंचेन्द्रीयांचा बंधु. तो म्हणजे तुझी इच्छा. तो तुझाच एक भाग होय, परंतु दुर्गुणांचा साथी. त्याला त्याच्या चुकांची कल्पना आहे पण तो दुर्गुणी लोकांबरोबर असल्यामुळे फक्त बहाने देतोय, जशा तुझ्या इच्छा सदानकदा बहाने करीत असतात.

जशा तुझ्या इच्छा नाही कां तुला दुर्गुण जवळ करण्यासाठी बहाने करतात?

संजयाने शांतपणे मान हलवली. त्याने जमिनीकडे पाहिले. हजारो कल्पना मनामध्ये पिंगा घालीत असल्याकारणाने त्यांची मनोमन जुळणी करीत होता आणि जेव्हा त्याने मान वरकरून त्या वृद्धाकड़े पाहिले तेव्हा तो वृद्ध निघून गेला होता. धुळीच्या लोटांमध्ये तो केव्हाच अंतर्धान पावला होता. एक फार मोठे जीवनाचे तत्वज्ञान मागे सोडून तो निघून गेला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: