रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

फुले, .......भगवंताचीच मुले !!!

माझ्या अंगणात जास्वंद फुलले,
गणपतिच्या चरणी मी ते वाहिले,

पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे,
कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे,

मोग-याचा सुगंध पसरला सगळीकडे,
भगवंताच्या दर्शनासाठी अवघे झाले मन वेड़े,

कमळ दल पुष्प जरी अवतरले असे चिखलात,
महालक्ष्मीला ते प्यारे, वसे ते तिच्या करकमलात,

सदाफुलीची ही फुले सदा फुलती आपल्या आसपास,
औषधी असती, लाभतो त्यांना भगवंताचा सहवास,

अनंताचे वर्णन काय मुखी करावे?
नावातच त्याच्या 'अनंत', अनंत वेळा स्मरावे,

सताचा रंग हा शुभ्र, सताच्या सान्निध्यात रहावे,
हिच असे मनिषा तयाची, सद्गुरूंच्या चरणी त्यांना वहावे,

कुणी त्यांच्या गळ्यात जाऊनी पड़े,
तर कुणी घाली भक्ती भावाने साकडे,

कुणी त्याच्या चरणांसाठी आसुसले,
अशी ही फुले, जशी कांही भगवंताचीच मुले,

सुगंध तयांचा सगळीकडे दरवळे,
भगवंताच्या चरणी वाहूनी भक्तगणही सुखावले........!!

मयुर तोंड़वळकर

रविवार, १८ सप्टेंबर, २०१६

दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

दर्शन देरे, देरे भगवंता
  तुझा ठाव नाही, घेता येत अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता .....!!!

तुझीया नामात, होईन मी तल्लीन
  तुझेच नाम, सदा मी गाईन
   आता तरी कृपा, करशील कां अनंता
    दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

नाम तुझे गोड,  नाही त्याला पाड़
 सदा त्याचे वेड़, मनी त्याची ओढ,
  लावशील कां मजला, हे बा अनंता
   दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

हे पिता परमेश्वर !!

🙏🌺🌸🌷🌻🍀👏�🙏

हे पिता परमेश्वर,
हे मातेश्वर,
होईल का मला दर्शन,
तुझीया स्वरूपाचे....!!

दर्शन होता मी भक्त,
होईल का मी विरक्त,
होईल का मी परावृत्त,
मोहमायेच्या पाशातून....!!!

चरणांची सेवा,
घडेल का हे देवा,
आशा करीतो भक्त हा,
आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत....!!!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

मी कोण आहे ?

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

मी कोण आहे ?

सगळे आहे ते तुझेच तर आहे,
मी काय देणार भगवन,
माझे असे काय आहे?

सगळ्या विश्वाचा निर्माता तुच तर आहेस,
मी काय देणार भगवन,
मी देणारा, मी कोण आहे?

जड़विता, घड़विता तुच तर आहेस,
मी काय जड़विणार, घड़विणार
मी कोण आहे?

जगताचा चालक, पालक तुच तर आहेस,
मी कां गमजा करतो,
जो काही आहे तो मीच आहे ?

🙏🌺🌸🌷🌻🍀👏�🙏

बुधवार, ७ सप्टेंबर, २०१६

!! सुंदर तो भाव, सुंदर तो विचार !!

🙏�🌻🍀🌷👍🌸🌺👏�

सुंदर ! अतिशय सुंदर !!

सुंदर तो भाव,
सुंदर तो विचार,
करीतसे तो भक्तगण,
ठाव घेण्यास तो आसूसला !!

कधी मिळेल ठाव,
नाही त्याची जाण,
जाण घेण्यासी,
तो क्षणभरी थांबला!!

तो एक क्षण,
लाभेल का त्या भक्ता,
सद्गुरूंची कृपा,
होईल कां ऽऽऽ त्याच्यावरी?

🙏�🌺🌸🌷🌻🍀🙏

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

बदल हवा !!!

🙏🍀🌻🌷🌸🌺👏�🙏

फक्त इतिहास रचने हा माझा उद्देश नाही,
सगळा आटापिटा आहे तो चेहरा बदलला पाहिजे,

तुझ्या विचारात किंवा माझ्या विचारात,
एक धगधगता अंगार हवा,
गरज आहे त्यात आवेग असावयास पाहिजे,

आजही मी एक प्रश्न माझ्याशीच करतो,
इतकेच योग्य आहे की आणखी कांही बदलू शकतो,

एकच आवाज हृदयातून येतो,
ही तर आहे सुरूवात आता,
अजून हसणे बाकी आहे...॥

🙏🌸🌷🌻🍀🌺👏�🙏