शुक्रवार, ३ मार्च, २०१७

निजधर्म हा चोखड़ा | नाम उपधारा घड़ाघड़ा || भुक्ति-मुक्ती सवंगड़ा | हा भाव सिंधुतरी ||

●  निजधर्म हा चोखड़ा | नाम उपधारा घड़ाघड़ा ||
      भुक्ति-मुक्ती सवंगड़ा | हा भाव सिंधुतरी ||  ●●
!!  प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज प्रवचन  !! 1

आपण कोण आहोत अन् आपला धर्म कोणता?

धर्म म्हणजे जात नव्हे. धर्म म्हणजे धारणा, पोषण अन् कर्तव्य. प्रथम धारणा, तद्नंतर त्याचे पालनपोषण अन् मग त्याचे कर्तव्य.

आता स्वधर्म कोणता? तर मानवता.

मानव हा अवतार आहे म्हणून मानवता हा धर्म. आता प्रथम धर्म तू जाणलास. माझे सत् हे सर्वांठायी एकच आहेत अशा समत्व भावनेने तू वाग. समतेने वागल्यानंतरच त्याला मानव धर्म कळला असे म्हणता येईल.

ज्या ठिकाणी मानवता असते तेथेच लीनत्व असते. अशा या मानवतेला नामाची जोड़ मिळाली तर काय होईल?

मानवता म्हणजे सत् मार्गाने जाणे. नितीमत्तेने वाटचाल करने अन् तुझ्यात वास करणारे जे अविनाशी तत्व जे आहे त्याची ओळख करून घेणे. नामच तूला त्या अविनाशांची, सताची, ब्रह्माची ओळख करून देईल. नामाच्या जोड़ी शिवाय हे होणे शक्य नाही.

🕉🌺🌷☘🕉🙏🕉🌺🌷☘🕉

बुधवार, १ मार्च, २०१७

"मुक्ती आणि मोक्ष"

🕉🙏☘🌺🌷🙏🕉

"मुक्ती आणि मोक्ष"
हेच असे सगळ्यांचे लक्ष्य |
ते मिळते फक्त
होता दर्शन सद्गुरू चरणांचे ||

🕉🙏🌷🌺☘🙏🕉

सद्गुरू चरणांवर ज्याचे लक्ष्य......

🕉🙏☘🌺🌷🙏🕉

सद्गुरू चरणांवर ज्याचे लक्ष्य
त्याला नसेल कोणतेच दुर्भिक्ष्य
सद्गुरू दर्शन दुरापास्त
नसे कधी तयास |

सद्गुरूंचे दर्शन होता
भक्तास न भासे उणीव कदा
तयाची कार्ये घडतील सदा
विनासायास, अनायास ||

कार्ये जरी घडली
विनासायास विनाप्रयास
तरी तो नसावा उद्देश्य
चरण सद्गुरूंचे मिळविण्याचा ||

एकच लक्ष्य एकच ध्येय
सद्गुरू चरण मिळणे हेच श्रेय
सद्गुरू चरण मिळताच भक्त
संसाराच्या जंजाळातून होतो तो कायमचा मुक्त!!

!!  जय श्री सद्गुरू माऊली  !!

🕉🙏🌷🌺☘🙏🕉