नाम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नाम लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० मार्च, २०१८

गुरू गुह्य

सत ज्या अवधीत तुम्हांस आपणा प्रत घेत होते त्या अवधीत तुमची मानवी स्थितीप्रमाणे पूर्णत्व सतशुध्दताच करीत होते नां?

मोह आणि माया या सद्गुरूंपासून दूर नेणा-या आहेत.

आरती येणे कोणती स्थिती तर नाम.

सद्गुरूंसमवेत नामामुळेच जाऊ शकतो.

अंत:करणापासून सद्गुरू चरणी केलेली विनंती याला आपण सेवेकरी प्रार्थना म्हणतो.

प्रार्थना आणि विनंती :

प्रार्थना म्हणजे परात्पर, क्षराक्षर व चराचर याच्यात भरूनही अलिप्त असणा-या निर्गुण, निराकार व अविनाशी सच्छिदानंद तत्वाला नम्रतापूर्वक, एकाग्र चित्ताने केवळ दर्शन व सान्निध्य मिळविण्याकरिता नामाने आळविता येणे नाम प्रार्थना.

परब्रह्माकडे म्हणजेच सताकडे सुखदु:खाची, मायेची निवेदने आपण देत असतो तसेच कष्टमय स्थितीतून सुटण्यासाठी व मनाला शांती मिळविण्याकरिता आपण जे प्रणव देतो तीच विनंती.

💐🕉💐🕉💐🕉💐🕉💐

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

प्रभातिचा शुभारंभ

प्रभातिचा शुभारंभ करूया
घेऊनी तुझे नाम सद्गुरू राया
वंदन करीतो मी तुजला
पडतो तुझीया मी पाया........

जवळपास करण्यासाठी माया
का घालवितो वेळ माझा मी वाया?
रमण्या ऐवजी नामात तुझीया
झिजवितो मायेत, मी माझी काया

फरफटवितो मजला जमविण्या,
कवडीमोल ती माया
आयुष्याचा दवड़ीतो अमुल्य वेळ,
जवळ करण्यात नश्वर अशी ती माया

नाम तुझीये न घेता सुप्रभाती
घेतो मोबाईल मी हाती
रमून जातो त्यातच
फेसबुक आणि व्हाॅटस् अपच्या सांगाती
................मयुर तोंड़वळकर............

सोमवार, ४ मार्च, २०१३

नामस्मरण


नामस्मरण - चार वर्ण, अबालवृद्ध स्त्री- पुरुषांना अनुसर्ण्यास सुलभ जाणारे असे अमोघ साधन म्हणजे नामस्मरण होय. याची महती अनेक ग्रंथात वर्णिलेली आहे.सर्व साधू, संताच्या प्रत्ययास आलेले असे हे साधन होय. सर्वांचा त्या वर विश्वास असून इतरांस अनुभव घेण्याचा संतानी अति काकुळतीने उपदेश केला आहे. अशा या नामधनाविषयी संशय घेणे म्हणजे ... पाप होय.

कांही एक भाग्य होते पूर्वजांचे/ पापियांसी कैचे रामनाम//
रामनामे कोटी कुळे उद्धरती/ संशय धरती तोची पापी//
सर्व जाणे अंती रामनामे गती/ आणि वेद श्रुती गर्जताती//
गर्जती पुराणे आणि संतजन/ करावे भजन राघवाचे//

एक होती गणिका तिने एक पोपट पाळला होता, पोपटाचे नाव राघव. त्याच्यावर तिचे फार प्रेम होते आणि रामाचे नाव सुद्धा राघव म्हणून ती त्या पोपटाला जीवाच्या पलीकडे जपायची. अंतकाळी ती गणिका सारखी म्हणयाची अरे राघवा माझा अंत काळ आता जवळ आला आहे तुला पाणी कोण देईल, पेरू कोण देईल आणि राघव राघव करीत तिने प्राण सोडला आणि असा चमत्कार झाला कि

रामनामे उद्धरली ती गणिका/ नेली देवलोका याच देही//
याच देही गती पावली कुंटणी/ रामनाम वाणी उच्चारिता// ........समर्थ रामदास स्वामी.

आपले जीवन, सर्व मनोरथ पूर्ण करणारे साधन असे हे रामनाम आहे. त्या योगे भयाचे निवारण होऊन जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. पण आपले काम इतकेच की सदासर्वदा प्रात:काळी सायंकाळी सर्वकाळी हृदयात राम साठवून अखंड नामस्मरण करणे. 

आपल्या सद्गुरूनी सुद्धा हेच सांगितले आहे, जाता येता जो जो वेळ मिळेल त्या वेळेला नामस्मरण करा. नामस्मरणाने पापांचा नाश होतो आणि पुण्याचा संचय होतो.

श्वास श्वास पै नाम लै/ वृथा श्वास मत खोय//
ना जाने उस श्वास का/ आदत होय न जाय//....... स्वामी विवेकानंद.