Ishwar wani लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Ishwar wani लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, ७ जून, २०१८

ईश्वर म्हणे वो देवी......

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

भक्त भगवंताप्रत का येत असतो? तर ज्ञानप्राप्तीसाठी आणि भक्तिसाठी भक्त सत चरणाप्रत येत असतो. आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत ज्ञानप्राप्तीसाठी जात होता.
भगवंतानी आपली सुख-दु:ख स्थिती ग्राह्य केली नाही तर आपली स्थिती चंचल होईल. भक्ताचे भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
सद्गुरू माऊलीने स्थुल रुप धारण केल्यानंतर सुख- दु:ख स्थिती भोगली कि नाही? पण तरीहि ते स्थिर, शांत, संयमी असायचे. पण तोच भक्त, थोडीशी दुर्मिळ स्थिती झाली तर चलबिचल होतो.
आपणास कल्पना आहे आमची कन्यका अहिल्या पतीच्या शापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? असे असून देखील आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होती ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हालाही सर्वस्वाची जाण होती. सर्वस्व स्थिती भगवंताने स्थुल रुप धारण करून स्थित्यंतरे कशी येतात त्याची स्वयम जाण सद्गुरूनी आपणास दिधलेली आहे.पण तरीही मानव विसरतो.

आपणास कल्पना आहे सुख आल्यानंतर मानव कालावधीची गणना करीत नाही. पण दु:ख आल्यानंतर मानव क्षणापासून सुरुवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत. थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर आपण चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आम्ही हे मान्य करीतो कि अपुले कर्तव्य आहे सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. परंतु हतबल होणे नाही. आपण सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लिनता ही ठेवलीच पाहिजे.
आपण सर्वस्व भक्त भगवंताचे आहात, सताचे आहात. त्या सताला तुमच्या सर्वस्व सुख-दु:खाची जाण आहेच. भक्ताची जर पूर्णत्व श्रध्दायुक्त स्थिती नसेल तर? लिनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम नसेल तर? भगवंत भक्तात लय होणार नाहीत. भक्ताचे भगवंतावर अपरंपार, नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होणारच. जेथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील.
म्हणून भगवंत भक्ताप्रत राहण्यासाठी या सर्वस्व गुणांची आवश्यकताआहे. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. लक्षात ठेवा विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते.