Durlabh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Durlabh लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ९ जून, २०१८

तरी दुर्लभ या त्रिभुवनात.....!!!

*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

महेश अंबेला प्रणव देत आहेत, *" तू तुझे मन शुध्द शुचिर्भूत करून पूर्णत्वाने मी  जे प्रणव देतो ते ग्रहण कर. मी जे प्रणव देतो ते त्रिभुवनातही दुर्लक्षित आहेत."*
असेच प्रणव सत तुम्हा सर्वस्वाना स्थानावरून येणे आसनावरून देत होते. सत तुम्हास पूर्णत्व स्पष्टीकरण करून सांगत होते. सदगुरुमय झाल्याविना तुम्हास ज्ञान प्राप्त होईल का? नाही.
जेंव्हा मानव सदगुरु सानिध्यात येतो तेंव्हा सत त्या मानवाची पूर्णत्व शुध्दीकरण स्थिती करीते. त्याच अवधीत तो मानव सतशुध्द होऊन सदगुरुमय होतो. त्यापूर्वी मानव चंचल अन द्विधा मनस्थितीत असतो. ज्या अवधीत सत तुमच्या शिरकमलावर हस्त स्पर्श करून अखंड नामाची गती प्राप्त करीते, त्या अवधीत तुमची स्थिती सतशुध्द अन सदगुरुमय होते. अन तदनंतर सत तुम्हास सताची पूर्णत्व जाण करून देते. जे अंबेने प्रणव स्वयंभूना दिधले, *"तुम्हीच माझे गुरू आहात, तुम्हीच मजला सताची जाण द्या"* तदनंतर हे प्रणव स्वयंभूनी अंबेला दिधले. अन आम्ही आपणास आपल्या सताची पूर्णत्वाने जी स्थिती या भूतलावर होती त्याचे प्रणव दिधले. परंतु समीकरण एकच आहे, ही जी स्थिती आहे ती कवण केलेली स्थिती आहे. *अन तुमची स्थिती प्रत्यक्ष सताने घडवून दिलेली स्थिती आहे.* अंबेने स्वयंभूना प्रणव देणे यापेक्षा अधिकाधिक आगळी वेगळी स्थिती सताने तुम्हास प्रदान केलेली आहे. अन त्याप्रमाणें जर तुमची कृतीमान स्थिती असेल तर तो सेवेकरी कसा होईल? तर तो सतापासून दूर जाणे शक्य नाही. अन सतही त्या सेवेकऱ्यापासून दूर राहणे शक्य नाही. सत तुम्हास प्रणव देत होते कि ही कलीयुगी स्थिती आहे. या कलीयुगी स्थितीत मोहमायेत जी स्थिती आहे त्यात अधिक न गुंतता तुम्ही सत नामस्मरणात पूर्णत्व लय होऊन रहा. अशी स्थिती केल्यानंतर सत येणे परब्रह्म तुम्हास दुष्टांतमय स्थिती देईलच देईल.
सताने सर्वस्व उघड स्थिती केली पण तुम्ही ते स्मरणतेत घेतले नाही. मानव मोहमायेत अधिकाधिक गुंतत गेला त्यामुळे तो सतापासून दूर गेला. पूर्णत्व सताप्रत राहण्यासाठी सेवेकऱ्याने कर्तव्यापुरते मायेचे कर्तव्य करून सतत नामस्मरणात राहिले पाहिजे. पण मानवाकडून अशी स्थिती होत नाही.
कर्तव्य करीत असतानासुध्दा मन नामस्मरणात गुंतून राहिले पाहिजे. लक्षात घ्या नाम तुमच्यात गुंतून आहे. नामाने तुम्हाला सोडले तर तुमचे स्थुल  स्थित्य रहाणार नाही. म्हणजेच नाम तुमच्यात गुंतून आहे पण आपण संसारमय स्थितीत आहात. संसार येणे स्वार्थ! अन हेच प्रणव महेश अंबेला देत आहेत. सताला संसार नाही का? तुम्ही हाच सताचा संसार आहे. पण सत तुम्हात गुंतून राहिले नाही. तुम्हास ज्ञानोपदेश करीत, तुम्हास सतशुध्द करीत, तुम्हास सतभक्तिची पूर्णत्व जाण देत स्वयंम परब्रम्हाचे कर्तव्य करीत होते.