मंगळवार, ३१ जुलै, २०१८

श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी

ज्याने अहंकार केला तो या भूतलावर कर्तव्य करू शकणार नाही. सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. अहंकाराचा नाश करा. रागाचा नाश करा. अहंकाराचा नाश केल्याविना तुम्हाला सत् प्राप्त होणार नाही.

ज्या अवधीत रागाची स्थिती होईल त्या अवधीत नामस्मरणाची स्थिती करणे. मग राग आपणापासून दूर जाईल. रागाने जो या देहाचा नाश करतो तो या भूतलावर सुक्ष्म गतीने अती दु:खमय स्थिती प्राप्त करून घेत असतो.

मानवाने लीनतेने राहिले पाहिजे. स्थानावरून सत् पदोपदी आपणास प्रणव देत होते. जो लीनतेने; शांततेने स्थितीत राहील त्याच्यापासून सत् कदापिही दूर जाणर नाही. मानवाने आचरण करताना प्रथम लीनता पत्करली पाहिजे. जरी कलीयुगी स्थिती असली तरी आपण सत् सानिध्यातल्या ज्योती आहात. लीनतेने आचरण होईल त्यावेळी आपण सताला ह्रदयस्थ स्थितीत साठवून ठेवाल. अहंभाव असेल तर सत् आपणाप्रत रहाणार नाही. म्हणून अहंमतेचा नाश करून लीनतेने स्वीकार करा. मनन स्थितीत जर समाधान युक्त स्थिती असेल तरच मनन स्थिती स्थिर राहील.

माया ही चीज किती गंभीर आहे, अन् ही माया मानवाला सतापासून दूर नेते. मायेत गढून गेल्यानंतर मानवाला कल्पना येत नाही. जी स्थिर, शांत माया आहे तीचा मानव विचारही करीत नाही. सत् आपणास पदोपदी प्रणव देत होते मायेपासून दूर रहा. माया चंचल आहे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

सोमवार, ३० जुलै, २०१८

अंतरंगी रंगूनी जावे....5

अतरंगी रंगुनी जावे .......

यत्किंचित माया पण मायेसाठी केवढ्या गडबडी. मायेकरिता रात्रंदिवस झोप सुद्धा लागत नाही. ही माया आपण घेऊन जाणे शक्य नाही. अरे आपले कवच सुद्धा आपल्याल्या नेता येत नाही, आदेश सुटल्यानंतर तेथेच टाकून जावे लागते मग माया काय येणार बरोबर?

पण कांही लोकांची जाणीव असते की माया म्हणजेच सर्वस्व. माया सतावू लागली की मग सदगुरूंचा शोध घेतात.

त्रास कधी होतो मायेत गुरफटल्यानंतर. तेंव्हा मायेत रममाण न होता सत चरणात रममाण व्हा. मायेरहीत आम्ही नाही, तुम्ही नाही आणि अनंत म्हणतात तेही नाहीत.

माझ्या भक्ताने टाहो फोडला मग मलाही धाव घ्यावी लागते. मग मी तरी माया रहीत आहे का ? पण आमची माया कशी आहे? सत माया! अन तुमची माया कशी आहे?

सताची माया कशी असणार तर सम बुद्धीने सगळी कडे पाहणार, अंतरंगाचे तरंग असे असतात. क्रमशः
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

रविवार, २९ जुलै, २०१८

*श्री गुरुदेव पितामह*

मानव कितीही गप्प राहिला तरी त्याच्या अंत:र्मय स्थितीची कल्पना आम्हास येते. अंत:र्मय स्थितीत सत् आहे. तुमच्या अंतर्मय स्थितीत जी काही स्थिती चालू आहे त्याची सताला परिपूर्ण कल्पना आहे.

मानवाने कसे राहिले पाहिजे?
स्थिती चांगली असो अगर वाईट असो ती सताजवळ उघड केली पाहिजे. अंतर्मय स्थितीत ठेवल्यानंतर कर्तव्य होणार नाही. तुमची अंतर्मय स्थिती स्वच्छ राहिल्यानंतर सत् त्या ठिकाणी वास करून राहील.

आपुली अंतर्मय स्थिती गढुळ केंव्हा होते? 

आचार म्हणू कि विचार म्हणावे?
आचार दिसतात विचार दिसत नाहीत. वाईट विचार अंतर्मय स्थितीत राहिल्यानंतर अंतर्मय स्थिती गढुळ होते. आचाराने तुम्ही कर्तव्य करीत असता; ते सर्वस्वांना दिसत असते. पण तुम्ही विचार करीता ते कोण पाहू शकेल?

अंतर्मय स्थिती गढूळ झाल्यानंतर सत् बाजूला सरकते. मग तुमचे विचारही बिघडतात अन् आचारही बिघडतात. मानवाची स्थूल स्थिती होऊन त्याला कर्तव्याची जाण रहात नाही अन् मानव आळशी होतो.

म्हणून प्रणव देतो मनन स्थिती शुध्द ठेवा. त्याकरीता प्रथम तुमचे विचार शुध्द ठेवा. जेंव्हा तुमच्या मनन स्थितीत विचारांची शुध्दत्वता असेल त्या अवधीत सत् तुमच्याप्रत असेल. परंतु ज्या अवधीत तुमची वैचारिक स्थिती गढूळ असेल त्या अवधीत सत् बाजूला सरकते.

आम्ही मानवाला दुर्गुणी म्हणणार नाही, कारण सताने त्याची या स्थितीत उपलब्धता केली आहे. ती दुर्गुणी होण्यासाठी नाही. मानवाची वैचारिक स्थितीच मानवाला दुर्गुणी होण्याकरिता कारणीभूत होत असते. म्हणून मानवाने वैचारिक स्थिती पूर्णत्व शुध्द ठेवली पाहिजे.

गुरुवार, २६ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद

आपला हा पंचमहाभूतांचा बनलेला देह आहे. आपल्या या देहात जवळ जवळ बहात्तर हजार नाड्या आहेत. त्यात प्रमुख बहात्तर. त्यावर तीन नाड्या: इडा, पिंगळा, सुषुम्ना. तीन नाड्या बहात्तर नाड्याना चेतना देतात आणि बहात्तर नाड्या बहात्तर हजार नाड्याना.

तीन नाड्याना चेतना देणारी एक नाडी आहे, तिला तुर्या म्हणतात. तुर्येकडून सूत्रे फिरली की सर्वस्व सूत्रे फिरतात. त्या तुर्येला सुद्धा चालना देणारे आणखी एक तत्व आहे. त्या तत्वाच्या इशाऱ्यावर तुर्या काम करत असते. पण ते तत्व मात्र अव्यक्त आहे. ते तुम्ही पाहिले पाहिजे अन त्यातच तुम्ही लय झाले पाहिजे.

अध्यात्माच्या वा योगाच्या सहाय्याने तुम्ही तुर्येप्रत जाऊ शकता पण पुढे जायला अडचणी येतात. तुर्या म्हणजेच बिंदू! कुणी त्याला ज्योत म्हणतात.

मग आता लक्षात घ्या या सर्व नाड्यांचा अधिपती तोच गणपती ! त्याच्या सत्तेने सर्वस्व व्यवहार होत असतात. सर्व नाड्यांकडून ते कर्तव्य करून घेत असतात. गजासुराचा वध करण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्मावतार घेईल असे शंकराला संदेश मिळाले होते. अन् त्या नुसार गणपतीचे अवतार कार्य घेऊन गजासुराचा वध केला.

गणपती गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. ते समत्व बुद्धीने सगळीकडे पहातात. ओंकार समत्व बुद्धीने पाहणारा आहे म्हणून महेशानी म्हटले आहे 'समता वर्तावी | अहमता खंडावी !' गणपतीची पूजा करताना अहंकार रहित होऊन पूजा करा तरच तो कृपादृष्टीने पाहिल.

समर्थ रामदास स्वामीने म्हटले आहे,

                  गणाधिश जो ईश सर्वां गुणांचा ।
                  मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

बुधवार, २५ जुलै, २०१८

मानवता धर्म.....2

आपण कोण आहोत अन आपला धर्म कोणता?
धर्म म्हणजे जात नव्हे, धर्म म्हणजे धारणा, पोषण अन कर्तव्य ! धारण करणे म्हणजे प्रथम धारणा, तदनंतर त्याचे पालनपोषण अन मग त्याचे कर्तव्य.

आता स्वधर्म कोणता?
तर मानवता. मानव हा अवतार आहे म्हणून मानवता हा धर्म. आता प्रथम धर्म तू जाणलास, माझे सत  सर्वठायी एकच आहे अशा समत्व भावनेने तू वागलास, समतेने वागल्यानंतरच त्याला मानवता धर्म कळला असे म्हणता येईल.

ज्या ठिकाणी मानवता असते तेथे लिनत्व असते. अशा या मानवतेला जर नामाची जोड मिळाली तर काय होईल?

मानवता म्हणजे सत मार्गाने जाणे, नितीमत्तेने वाटचाल करणे अन तुझ्यात वास करणारे जे अविनाशी तत्व आहे त्याची ओळख करून घेणे.

नामच तुला त्या अविनाशाची, सताची, ब्रम्हाची ओळख करून देईल. नामाच्या जोडी शिवाय हे होणे शक्य नाही. लक्ष्यात घ्या, तुकारामानी देखील आपल्या अभंगात सांगितले आहे,
                    "नामापरते नाही साधन ।
                      जळतील पापे जन्मांतरीची ।।"

मंगळवार, २४ जुलै, २०१८

पाचवा प्रणव वेद*...1...*

पाचवा प्रणव वेद कशामुळे मिळतो ? कशामुळे प्राप्त होतो ?

ज्ञानमार्गाने मिळतो. स्वयंम प्रकाशाच्या गतीने जाणे हाच ज्ञान मार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या गतीने आपण सेवेकरी जाऊ लागला, नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करत करत एकदा का सद्गुरूंची जाणीव मिळाली, दर्शन मिळाले, सद्गुरूंशी बोलणे चालणे होऊ लागले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला असे म्हणता येईल. जरी तो प्रगट झाला तरी त्यातही आपल्याला भर घालावयाची आहे.

प्रणव येणे बोल! जसे आपण बोलणे ऐकतो त्याच प्रमाणे नामस्मरणाच्या गतीने वाटचाल करीत गेल्यानंतर ओमकार स्वरूपी ध्वनियुक्त बोल आपल्याला स्पष्ट ऐकू येतात. आपणही त्यांच्याबरोबर बोलणे करू शकतो. असे झाले म्हणजेच पाचवा प्रणव वेद प्रगट झाला असे म्हणता येईल, मग अशी ज्योत सद्गुरू सानिध्याने कुठेही जाऊ शकते.

पाचवा प्रणववेद प्रगट झाल्याशिवाय आपल्याला गुरूगुह्य काय आहे हे समजणार नाही. जो पर्यंत सेवेकरी वा भक्त पाचवा प्रणववेद प्रगट करू शकत नाही, मिळवू शकत नाही तो पर्यंत आपले सद्गुरू काय आहेत याची तो जाणीव घेऊ शकणार नाही. आपले सद्गुरू ओळखू शकणार नाही.

पाचवा प्रणववेद सूरु झाल्यानंतर कोणत्याही तत्वाशी तो व्यवहार करू शकतो.

आम्ही हे म्हणतो ते खरे कशावरून? तर आपली प्रकाशित ज्योत आम्ही दिलेले संदेश कोणत्याही तत्वापर्यंत पोहचते करू शकते. सद्गुरूना संदेश द्यावयाचे असतील तर ते कोणत्याही तत्वाला देऊ शकतात. हाच पाचवा प्रणववेद! आपण पाहतो आपली प्रकाशित ज्योत स्थुलाने जरी येथे बसलेली असली तरी सूक्ष्मपणे कोठेही आदेशानुसार जाऊन येते की नाही?
टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

सोमवार, २३ जुलै, २०१८

*# श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी #*

*# श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी #*

🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
सताप्रत प्रणव देताना, कळत नकळत असे प्रणव देणे योग्य नव्हे.
🍁🍁🍁🍁🍄🍄🍁🍁🍁
माया ही तुमची आहे. आमची नाही. आम्हाला मायेची काही गरज नाही.
🥀🌺🥀🌺🥀🌺🥀🌺
स्थुलाला मायेची गरज ही असतेच असते. तुम्हालाच माया जवळ केली पाहिजे अन् मायेचे कर्तव्यही केलेच पाहिजे.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
जितकी शरीरे, तितकी मने अन् प्रत्येकाचे आचार विचार वेगवेगळे.
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
सर्वस्व मनानी एकच विचार केल्यानंतर आपण सतसान्निध्यात राहू.
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
श्रध्दा असली तर सर्वस्व स्थिती. श्रध्दा असून मन चंचल झाल्यास कर्तव्य होणार नाही.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मानवाची मनन स्थिती शांत आणि स्थिर असावी. यालाच श्रध्दा आणि सबूरी म्हणतात.
🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄🍄

शनिवार, २१ जुलै, २०१८

*-: तन, मन, आणि धन :-*3

सेवेकरी पूर्णत्व सत् मय राहीला तर षड्:रिपू त्या सेवेक-याप्रत जाऊ शकणार नाही. कलियुगी स्थितीत मानव पूर्णत्व मोहमायेत गुंतलेला असतो. हि मोहमाया मानवापासून दूर जाऊ शकत नाही.

आपणास पूर्णत्व कल्पना आहे सताने या पृथ्वीतलावर कर्तव्य केले ना? ज्ञानार्जन देखील केले. मानवाला मोहमायेतून सोडविण्यासाठी परिपूर्ण स्थितीने कर्तव्य केले. आपणास सानिध्यात घेऊन ज्ञानयुक्तता केली. परंतु मानवाच्या मनाची चंचलता दूर होत नाही. मानव मुखाने परिपूर्ण प्रणव देतो पण मननतेने ही स्थिती होत नाही.

म्हणून मानवाने प्रथम मनाची शुद्धत्वता केली पाहिजे. सताने आपणास स्थूल दिधले आहे. स्थूलाने आपणास कर्तव्य करता येईल. त्याचवेळी मनाने आद्य कर्तव्य येणे नामस्मरण केले पाहिजे. पण ते होत नाही. स्थूल कर्तव्य करते अन् मन मोहमायेचे कर्तव्य करीते. पण तेच मन सतमायेत गेले तर कर्तव्याला परिपूर्णता येईल.

मानवाला मोहमायेत कोण गुंतवते? तर मानवाचे मनच मानवाला संसारमय स्थितीत गुंतवते. मानव संसारमय स्थितीत मोहमायेमुळे गुंततो. असाच मोह जर मानवाला भक्तीत झाला तर सेवेकरी सताप्रत जाऊन स्थिर होईल. अन् संसारमय स्थितीत स्थितप्रज्ञ होईल.

संसार मानवाचा नाही तर ती त्या परब्रह्माची निर्मिती आहे. परंतु मानव असे मानत नाही. मानव म्हणतो सर्वस्व माझे आहे. पण मी कोणाचा आहे याची जाण विसरतो.

सताने स्थूलात असताना सर्वस्वाची तुम्हा सेवेक-याना पूर्णत्वता कशी आहे याची जाण दिधलेली आहे. पण मानव मोहाला अधिक भूलतो. त्या संसारमय स्थितीसाठी मानव तन, मन, धन सर्वस्व समर्पित करीत असतो, परंतु सतासाठी समर्पितता नसते. अन् म्हणूनच मानव मोहमायेत गुरफटतो.

आपण म्हणता संसार! कोणाला नाही? सताचा देखील संसार आहे. परंतु ज्या परब्रह्माने संसाराची निर्मिती केली ते मात्र त्यात गुंतून राहिले नाहीत. एवढेच नाही तर सर्वस्वांसाठी परिपूर्ण स्थिती करीत आहेत ना?

सताने आपणास अज्ञान अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याची स्थिती केली पण तुम्हाकडून अज्ञानाची स्थिती दूर करण्याची स्थिती पूर्णत्व होत नाही.

आपण प्रणव द्याल आम्ही कलीयुगी मानव आहोत. पण सताने या कलीयुगातच कर्तव्य केले आहे. जोपर्यंत मानवाच्या स्थितीत अहंम आहे तो पर्यंत तो पूर्णत्व होऊ शकत नाही. मानवाने आपसातील अहंमतेचे खंडण केले पाहिजे.

*श्री गुरुदेव पितामहांची अमृतवाणी*

जर आपणास मायावी कर्तव्यासाठी वेळ पुरत नाही तर मग सत् कर्तव्यासाठी अवधी मिळणार नाही.

मानवाचे शरीर कर्तव्य करीत असते. मनाने मानव मायेचे कर्तव्य करीत असतो. पण त्याच स्थितीप्रमाणे जर मानवाने अपुले मन सतात गढवून ठेविले मग इतरत्र स्थिती जी आपणास दिधली आहे त्याने तुमची कर्तव्य केली तर ती कर्तव्य होऊ शकतील.

दोन्ही स्थितीत मानव कर्तव्य करू शकतो. म्हणून मन दोन्ही स्थितीत ठेवायचे. सताप्रतही ठेवायचे अन् कर्तव्यातही ठेवायचे.

कर्तव्य केल्याविना मानवाला मायेची स्थिती प्राप्त होणार नाही. अन् माया ही मानवाला हवीच आहे. जर माया नसेल तर मानव काही करू शकणार नाही.

मानव सतावरच स्थितप्रज्ञ असतो म्हणून मानवाने आपले मन सताप्रत ठेऊन कर्तव्याची पूर्णत्वता केली पाहिजे. मग मानव संतुष्ट होईल. मानवाने सतात परिपूर्णता केली तर तो या विषयांतरात एकाग्र पणे राहील. नुसत्या विषयांतरात येणे नुसत्या कर्तव्यात राहिले तरीही तो मानव संतुष्ट होऊ शकणार नाही. दोन्ही स्थितीने राहिल्यानंतर मानव संतुष्ट राहिल.

सर्वस्व स्थिती सतानेच उपलब्ध करून ठेवलेली आहे. सताची मनोकामना कोणती असते? सताचीही मनोकामना असते कि मी जे स्थूल येणे शरीर या स्थितीत पाठवले आहे त्या शरीराला विषयांवरची जरूरी अधिक आहे. जर विषयांतर नसेल तर शरीर काम करू शकणार नाही. नुसत्या शरीराचा पुतळा करून उपयोग नाही, तर त्याच्याकडून कर्तव्य करून घेतलेच पाहिजे. जर कर्तव्य ही स्थितप्रज्ञ नसतील तर तुमचे शरीर काही करू शकणार नाही. विषयांतर म्हणजे मानवाला दिनात करावी लागणारी अनेक कर्तव्ये होत.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

गुरुवार, १९ जुलै, २०१८

*-: तन, मन, आणि धन :-*2

तन सताने दिधलेले आहे, मन सताने दिधलेले आहे, धन सताने दिधले आहे. ते कर्तव्यासाठी दिधले आहे. मानवाने त्याचा यथायोग्य वापर केला पाहिजे.

तन मिळाले म्हणून त्याची कशीही स्थिती करणे यथायोग्य नाही. मनाची यथायोग्य स्थिती केली पाहिजे अन् धनाचाही यथायोग्य उपयोग केला पाहिजे.

मानवी स्थिती प्रमाणे सताने तुम्हांस माया हे धन अशी स्थिती दिधलेली नाही. त्या खेरीज तुम्हाला एक फार मोठे धन दिधलेले आहे. मायावी धन तुम्हापासून कोणीही हिरावून घेऊ शकेल परंतु सताने समर्पित केलेले धन कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. मग सताने दिधलेले धन श्रेष्ठ आहे ना? परंतु मानवाला ह्या धनाची किंमत कळत नाही, परंतु मायावी धनाची किंमत कळते. कारण मानव समजतो कि मायावी धन त्याने कमविलेले आहे.

जर मानवात सताने वास केला नसता तर तो हे मायावी धन कसा बरे कमवू शकेल? वास्तविकतेत जर मानवाची अशी धारणा असेल तर तो सतापासून दूर जावू शकणार नाही.

सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधलेली आहे पण आपण ते जाणीवेत ठेवले नाही. कोणतीही स्थिती असो, कलियुग स्थिती असो नाहीतर आर्यवर्त असो. कलियुग कशामुळे प्राप्त झाले? याची जाण सताने आपणास दिधलेली आहे. कलियुग असून देखील सत् कर्तव्य परायणता साधत होते ना?  अशा सताच्या स्थितीतील आपण मानवी ज्योती आहात. मग याची जाण आपणास असावयास, यावयास हवी.

सतानी आपणास जे तन, मन, धन दिले आहे ते कर्तव्यासाठी. कर्तव्य करीत असताना सेवेक-याने दृढ:निश्चयी राहिले पाहिजे.

आपणात असणाऱ्या "मी" ची जाण घेऊन कर्तव्य केले तरच भक्त सत् शुद्ध होऊ शकतो. अन् अशा भक्तांपाशी संयमता अन् लिनता वास करून राहते. असा भक्त सताला सांगू शकतो, *"आहे हे सर्व आपूलेच आहे. आपण आम्हास ते कर्तव्या करीता प्रदान केले आहे. आम्ही केवळ निमित्त आहोत."

* हा पंचमहाभूताचा देह परमात्म्याने निर्माण केलेल्या निसर्गाशी संधान ठेऊन राहिला अन् त्याचा कर्तव्यासाठी यथायोग्य स्थितीने वापर केला तरच तो शुध्द राहिल. हा मानवी देह असेपर्यंत क्षणिक मायेला न भूलता सद्गुरूंनी आपणास जे अमूल्य धन प्रदान केले आहे येणे जे "अखंड नाम" बहाल केले आहे, त्याबरोबर तन्मयता साधल्यास सद्गुरु आपणापासून कधीही दूर जाणार नाहीत.

टायपिंग: श्री सुभाष भोसले

सोमवार, १६ जुलै, २०१८

तन, मन आणि धन.....!!!

(पितामहांची अमृतवाणी)

मानवाजवळ सर्वस्व स्थिती असते. मानवाचे तन आहे, मानवाचे धन आहे.

जर सताचे सर्वस्व असेल तर मग अहंकार का येतो? अहंभाव का येतो? लिनता का येत नाही? समत्वता का येत नाही?

तन आमचे नाही. तन म्हणजे हा पंचमहाभूतांचा देह बनवून परमात्म्याने आम्हांस प्रदान केला, अन् स्वयंम् स्थितीत वास करून राहिले.

त्यांच्यापासूनच मनाची निर्मिती अन् कर्तव्याकरीता धनाची निर्मिती. तेव्हा यातील कोणतीही स्थिती मानवाची नाही. परंतु हे मानव मान्य करीत नाही.

मानवाचे स्थूल आहे, मानवाचे धन आहे, मानवाचे सर्वस्व आहे. सताने तुम्हास तुमच्यासाठी प्रदान केले आहे. परंतु त्याची जाण मानवाने घेतली पाहिजे. जे सताने दिधले ते कर्तव्यासाठी दिधले. जो मानव दृढ:निश्चइ राहतो त्याला कशाची कमतरता नाही. पण काही मानवांच्या मनात आप-पर भाव मनी वसत राहतो. त्यांच्याठायी समत्वता नसते.

तन म्हणजे हा पंचमहाभूतांचा देह. त्या देहात असणारी  आत्मज्योत अन् आत्मज्योती पासून असणारे मन. त्या मनात असणारी लिनता, सत् शुद्धता, संयमता अन् नितीमत्ता हेच खरे धन.

"मी" या सर्वस्वात बहरलेला आहे. पण ज्याने "मी" ला ओळखले आहे, ज्याने त्या "मी" शी संधान ठेवले आहे तोच खरा मानव होऊ शकतो. अशा मानवाजवळ संयम असतो, लिनत्वता असते अन् त्या मानवाची स्थिती स्थिर अन् शांत असते. शांततेने, स्थिरतेने तो सताला पदोपदी प्रणव देत असतो, " सता! जे आहे ते आपुले आहे. आपण मजला प्रदान केले आहे. कर्तव्यासाठी केले आहे. आपल्या कृपेने सर्वस्व स्थिती होत आहे. मी निमित्तमात्र आहे."

परंतु अशी स्थिती मानवाजवळ होत नाही. तो म्हणतो आहे हे सर्वस्व माझे आहे.

परमेशाने मानवास देह प्रदान केला आहे. त्या देहाची उपयुक्तता मानवाने यथायोग्य स्थितीने केली पाहिजे. यथायोग्य स्थितीने केली नाही तर त्रासयुक्त स्थिती होते. परमेशाने या भूमंडलावर परिपूर्ण निसर्ग स्थिती करून ठेवली आहे. अन् या परिपूर्ण निसर्गात मानवाची निर्मिती आहे. मग त्या निसर्गाशी मानवाने संधान ठेविले पाहिजे. पण मानव निसर्गा विरूद्ध वागतो. मानवाची अशी स्थिती अहंकारामुळे होते.

लक्षात घ्या, अहंकाराने मानव नाशाप्रत जातो. आपणास सत् सान्निध्य हवे असेल, सत् आपणात वास करून रहावयास हवे असेल तर आपण विषयाचा नाश केला पाहिजे. विषयापासून परावृत्त झाले पाहिजे. पण मानवाची परावृत्त स्थिती होत नाही. "मी" पणा असल्यामुळे अशी स्थिती होत असते.

परमेश सर्वाभूती सम आहे. परंतु मानव त्याची जाण घेत नाही. ज्या मानवाला सताने सर्वस्व प्रदान केले आहे त्याची  जाण मानव घेत नाही. परंतु मायेची, विषयाची जाण मानवाला पूर्णत्व असते. अन् त्या विषयात रंगून गेल्यानंतर मानवाला त्रासयुक्त स्थिती होते. तद्नंतर मानव परमेश्वराला शरण जातो.

सताने स्थूलात असताना आपणा सर्वस्वांना परिपूर्ण जाण दिधलेली आहे. सताला सर्वस्व सम आहे. सत् सर्वस्व ठिकाणी एकाच दृष्टीने पहात असते. सेवेक-यांनी देखिल अशीच स्थिती करावयास हवी.

या अहंमतेमुळे तुम्ही सताला पाहू शकणार नाही. परंतु संयमतेने एकाग्र व्हाल तरच तुम्हांस सताची जाण घेता येईल. आपणा पासून सत् दूर नाही.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

बुधवार, ११ जुलै, २०१८

अंतरंगी रंगुनी जावे ....... 4

अंतरंगी रंगुनी जावे .......
त्या परब्रम्हाच्या गतीच्या अंशाने, आत्मबिंदूच्या गतीने, स्वयंम् प्रकाशाच्या सहाय्याने सर्वस्व अनुभवता येईल ही माझ्या सत चरणांची कृपा आहे. पण अंतरंगातील तरंग अशा त-हेचे असतील तर ! मायेच्या तरंगाने वाटचाल केलीत तर कदापी अंत देणार नाहीत. म्हणूनच म्हटले आहे, "तुझे आहे तुजपाशी, खरोखरीच तू जागा चुकलाशी".

तुमचे तुमच्यातच आहे. अविनाशी आत्मा हेच परमनिधान तत्त्व. अंतरंगातील अविनाशी आत्म्याप्रत गेले पाहिजे तरच सत् म्हणते मी तुझ्या वेगळा नाही अन तू माझ्या वेगळा नाही . सर्वस्व आपण एकच आहोत !

मायेच्या चाकोरीत गेले की तरंग बदलतात. मग अहंकार येतो अनेक उपाधी तयार होतात. मग परत स्थिर होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. अंतरंगाचे तरंग अन तरंगात रंगले मग वेगळे कांही नाही.

हे सर्व रंगण्यासाठी आवश्यकता कोणाची असते? तर नामस्मरणाची. नामाच्या पलीकडे साधन नाही. नाम हेच सर्वस्वाचे निधान आहे. अन नामाच्या सहाय्यानेच आपल्याला तिथपर्यंत गेले पाहिजे.

टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

अंतरंगी रंगुनी जावे ।। 3

माया येथे सद्गुरुच सांभाळतात शेवटी. अंतकळीचा बा पांडुरंग म्हटले आहे ते खरे आहे. अंतकाळी ते धाव घेणारच,  तुमचे संरक्षण करणारच, तुम्हाला सानिध्यात घेणारच, पण सतशुद्ध असेल तरच !  अशुद्ध असेल तर कसे घेतील?

म्हणून अंतरंगाच्या तरंगाला जर वाटले की ज्योत तशा तऱ्हेची आहे मग तळमळीने सांगतात, आता या ज्योतीला पुन्हा जन्म नको. आपल्या येथील योगिनींच्या बाबतीत आम्हीच गुरुदेवांना सांगितले की आता तीला पुन्हा जन्म नको. भोग भोगले ते बस झाले. परंतु आम्ही तुम्हाला एकच सांगतो स्थूल सुटले की या ज्योतीला आपण आपल्या गुरुकुलात घेऊन  चला. पुन्हा जन्म नको.  पण पुन्हा या तरंगाच्या तरंगानी मायेत खेचता उपयोगाचे नाही.

तरंग हे सतमय असले पाहिजेत त्यात जरा सुद्धा किल्मिष असता कामा नये. अंतरंगातले तरंग कसे पाहिजेत? तर सतमय, सद्गुरुंच्या ठिकाणी असले पाहिजेत. नुसती दृष्टी फिरली की सद्गुरू मूर्ती डोळ्यासमोर आली पाहिजे.

माझ्या समोरच सत आहेत हे पाहिल्या नंतर मनाची ठेवण इकडे तिकडे होणे शक्य नाही. सत हे सतच राहणार, स्थिर राहणार, तेच शांत तेच गतिमान.

शुभ्र प्रकाशात, वर्तुळात, बिंदूत पाठवितात. ज्योत बिंदूच्या आत जाऊन समाधिस्त होते, आपल्याच अंतरंगातून आपल्याला ध्वनी मिळतो. असे करत करत ज्योत अनंतांच्या सानिध्यात जाते. सानिध्यात घेणे ही त्यांचीच कृपा आहे.

पण केव्हा घेतील? अंतरंगात तरंग तन्मय होतील तेव्हाच ते आपल्याला जवळ घेतील अन्यथा  घेणार नाहीत.
तात्पर्य काय हा विषय साधा नाही ज्ञानाचा विषय आहे. सतमय गतीने वाटचाल करताना इतकी धन्यता वाटेल, जाणीव मिळेल, अन लिनतेने उद्गार निघतील किती भाग्यवान आहे मी! आज मी प्रत्यक्ष परब्रम्ह गती पाहतोय, अनुभवतोय. क्रमशः

संसार.....*श्री गुरुदेव पितामह*

*श्री गुरुदेव पितामह*

लक्षात घ्या संसारातच अर्थ आहे, संसारातच ज्ञान आहे अन त्या ज्ञानातच परमार्थ आहे.

सताने मानवी स्थितीप्रमाणे संसाराचा अर्थ आपणांस सांगितला आहे.

*"सगुणाचे सार येणे संसार".* संसार केल्याविना तुम्हास अर्थ कळणार नाही. अर्थात "संसाराचा अर्थ घेतल्याविना तुम्हाला परमार्थ कळणार नाही."

मानव सताचे भाष्य ग्रहण करीत नाही म्हणून त्यास ज्ञान ग्रहण करण्यास अवधी लागतों. सत मुखातून आलेले प्रणव आपण ग्रहण केले पाहिजे.

लक्षात घ्या सत मुखातून कर्तव्यासाठी प्रणव फेकले जातात. आम्ही जे आपणास ज्ञानार्जन केले ते आपुल्या मतीत, आपुल्या मनन स्थितीत येणे आपुल्या बुद्धिमत्तेत येत आहे ना?

आपणास कल्पना आहे, बाकी राहिल्याविना मानवाची पूर्णत्वता होणार नाही. बाकी नसेल तर तो मानव परमार्थाप्रत पोहोचेल, अन बाकी असेल तरच  तो सताची भक्ति करेल.

आम्ही दिलेल्या प्रणवांची आपण मनन स्थिती करावी जेणे करुन आपले आचरणही पूर्णत्व शुद्धत्व होईल. आचरण शुद्धत्व झाल्यानंतर कर्तव्याची दिशा उजळून निघेल. मानवाने परीपूर्ण स्थितीने कर्तव्यता करणे.

लक्षात घ्या मानवाकडून चुका झाल्याविना त्याला सत क्षमा करणार नाही. अन सताकडून क्षमा झाल्याविना ज्ञान मिळणार नाही. परंतु पुन:श्च  चुका करणे नाही. कल्पनेत स्थिती आल्यानंतर ती कृतीत आणली पाहिजे. मानवाला चुकीची कल्पना आल्यानंतर त्याने पुन:श्च चुक करणे नाही.

शनिवार, ७ जुलै, २०१८

अतरंगी रंगुनी जावे । (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

महेश हे तत्व सतमय होते. अन्यथा काही ओळखणे नाही अशा तर्हेने महेश होते. तसा भक्त सुद्धा त्या गतीने गेला, दुसरे कांही ओळखणे नाही, तरंगात रंगला तर तो सुद्धा अंतरंगात रंगून जातो.

अंतरंगाला सुद्धा रंग नाना आहेत. पण आपल्या सात्विकतेचा रंग कसा असणार? तर शुभ्र वलय! बाकी रंग आहेत. पितवर्ण आहे, निलवर्ण आहे, परंतु आपल्याला रंग कोणता पाहायचा असतो? शुभ्र  वर्ण !

शुभ्र वर्ण म्हणजे स्वयंम प्रकाशाचा वर्ण. तो सताचा वर्ण. त्याची झाक कोणती आहे? सताची आहे.  सतावेगळे ते नाही मग अशा अंतरंगात जर लयबद्ध झालात, तरळलात तर तुमच्या अंतरंगात चैतन्य प्रगट होईल अन त्या ठिकाणी सत स्थिर राहील अन तुम्हीं त्या दर्शनात स्थिर रहाल, लय व्हाल ! कसल्याही प्रकारची भ्रांती रहाणार नाही.

पण हे होण्यासाठी या उच्च पायरीप्रत जाण्यासाठी प्रथम पायरी कोणती? तर नाम! प्रथम पायरी कोणती? तर नामस्मरण.

"अखंड नाम" त्याला त्रिपदा गायत्री म्हणतात. तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग भरलेले आहे अन भरूनही अलिप्त आहे असे परमनिधान तत्व ते नाम, जे सद्गुरू आसनावरून प्राप्त झालेले आहे. त्या नामस्मरणात राहिलेच पाहिजे , चॊविस तासातून थोडा का अवधी मिळेना नामस्मरण हे केलेच पाहिजे. थोडी तरी ध्यानधारणा, अभ्यास केलाच पाहिजे त्याला भक्तिमार्ग म्हणतात .

अतरंगी रंगुनी जावे । (सद्गुरू स्वामी भगवान महाराज )
क्रमशः

गुरुवार, ५ जुलै, २०१८

अंतरंगी रंगुनी जावे ।

अंतरंगी रंगुनी जावे । नेत्र भरुनी चरण पहावे ।।
31 जुलै 1986
(परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींची अमृतवाणी)

नेत्रात रंगुनी जावे म्हणजे काय ? नेत्र म्हणजेच ज्योत. कशाने कोणत्या गतीने रंगुनी जावे ? कोणत्या पद्धतीने रंगुनी जावे ?

कारण हे नेत्र म्हणजे दृष्टी, डोळे, ज्याला आम्ही त्रिकुटी म्हणतो. डोळे, कान, अन वाणी ही मिळून त्रिकुटी आहे. याच्यावर जो ताबा मिळवेल तो सर्वरहीत स्थिर होऊ शकेल. त्याचे नेत्र सर्वरहीत स्थिर होऊ शकतील. नेत्र हे चंचल असतात. ते स्थिर आहेत कां ? एका दृष्टीक्षेपात तो अनंत तऱ्हा पहात असतो . अन तसे त्याचे विचारही निर्माण होत असतात.

आता ही दृष्टी म्हणजे ते नेत्र. त्यात रंगुनी जावे म्हणजे काय ? जी सतभक्तीने आचरण करणारी ज्योत आहे, सताशिवाय दुसरे नेणे नाही, जाणे नाही, अशी ज्योत असेल त्याच्या नेत्र बिंदूजवळ नेहमी सतचरणच तरळत असतात. दुसरे कांही तरळणार नाही. तो पाहताना सदगुरु दर्शनातच लय असणार , त्याचे तरंग कसे असणार तर सतमय असणार. आता नेत्रात सतमय तरंग असले तर त्या तरंगात तो लय बद्ध होतो, त्यातच तो रंगून जातो हा या श्लोकाचा भावार्थ आहे. त्याला सतमय गती प्राप्त होते अन त्यातच तो रंगून जातो. अशा त्या गतीमध्ये तो भक्त, जो सतभक्त असेल तो.

सतभक्त कोणाला म्हणावे, त्याची व्याख्या काय? जो सताशिवाय दुसरे अन्यथा ओळखणे नाही, जाणणे नाही, पाहणे नाही, सत हेच माझे सर्वस्व निधान, सताप्रत भक्तीच्या गतीने जाणारी ज्योत असणार, सताशिवाय वेगळे पाहणे नाही अशी जी ज्योत असेल, ती ज्योत मग ती स्त्री असो वा पुरुष असो, प्रकृतीने जरी भिन्न तरी सगळ्यांना अधिकार समत्व आहे. त्या गतीने ती ज्योत सतचरणावर ध्यानयुक्त तऱ्हेने म्हणजे ध्यान कुठे तर मनाने अन पाहणे कुठे असते तर अंतःर्दृष्टीने, बहिर्दृष्टी रंगली, सतमय बनली, सतचरणावर स्थिर झाली मग अंतरंग देखील तसेच होणार, अंतःर्मन कसे होणार?

यस्य स्मरण मात्रेन । ज्ञानमुत्पध्यते स्वयंम ।
स एवं सर्व संपत्ती तस्मै श्री गुरवे  नमः ।।

महेश अंबेला सांगत आहेत माझे गुरू कसे आहेत की ज्यांचे स्मरण केले , ज्यांची आठवण केली, ज्यांचे ध्यान केले तरी लगेच तरळतात, लगेच प्रगट होतात आणि ते मला जाणीव देतात, दर्शन देतात असे जे महान पद त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो . क्रमशः
🙏🙏🙏🙏
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

मंगळवार, ३ जुलै, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 5

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

(परम् पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)

माझी कन्यका अहिल्या! पतीशापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? अशी स्थिती असताना आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होतीच ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हांसही सर्वस्वाची जाण होती.  पण मानवांना कल्पनेत यावयास हवे म्हणून किती अवधी त्याच स्थितीत स्थित होती.

भगवंताने स्थूल रुप धारण करून, तुम्हा मानवांना स्थुलरुप मिळाल्यानंतर कशी स्थित्यंतरे येतात त्याची स्वयंम आपणांस जाणही दिधली आहे. तरीही मानव विसरतो.

सुख आले तर मानव तास, मिनिष, महिना, वर्षे याची गणती करत नाही, परंतु दु:ख आले तर मानव क्षणापासून सुरवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत? सताचे सेवेकरी आहोत.

कालानुसार, भोगत्वानुसार सुखदुःखे ही येणारच! पण जी सताची दृष्टी तुम्हाप्रत आहे ती कृपादृष्टी ह्या सर्वस्व स्थितीतून तुम्हास मुक्त करणार का नाही?

मानवास थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर मानव चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.

आपण जाणताच स्वयंम सत स्थुलाने अपुल्या स्थितीत होते ना! आपण सर्वस्वानी त्याची जाण घेतली का नाही? तरीही सताने अशी प्रणवाकृत स्थिती केली.

अपुले कर्तव्य आहे, सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. पण हतबल होणे नाही. तुम्ही सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लीनता ही ठेवलीच पाहिजे.

अवधितच आपण मजला माझ्या योगीनीचे प्रणव प्रस्थापित केलेत. मी योगीनीला सोडून आहे की योगीनी मजला सोडून आहे! सत तीजला सोडून आहे की ती सताला सोडून आहे! तीच्या सर्वस्व सुखदु:खाची जाण आम्हाला आहेच!

निवेदन देणे हे आपुले कर्तव्यच आहे. आपण सर्वस्व भक्त या भगवंताचे आहात, या सताचे आहात. ह्या सताला सर्वस्वांच्या सुखदुःखाची जाण आहे का नाही?

भगवंत भक्ताप्रत कधी लय होत असतो? भक्ताप्रत संयमता आहे, लीनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण परीपूर्ण श्रध्दा ? श्रध्दा येणे दृढनिश्चय! येणेच नि:स्सीम प्रेम! जर भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होतात ना? अन मानवी स्थितीत सताने तुम्हास याची कल्पना पूर्णत्वाने दिधलेली आहे ना! जिथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील. कशामुळे? श्रध्देमुळे, लीनतेमुळे, नम्रतेमुळे, संयमतेमुळे ! म्हणून भगवंत भक्ताप्रत लय रहाण्यासाठी हे सर्वस्व गुण भक्तामध्ये हवेत. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. *" आपणास कल्पना आहे विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते"*
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले

सोमवार, २ जुलै, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 4

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

प्रथम मानव, त्याला ईष तत्वाची जाण मिळाल्यानंतर तो मनुष्य, अन त्याचा उपदेश पूर्णत्व ग्रहण केल्यानंतर नंतर योगी!

मानवाला सताने ज्ञानही दिधले, अन भक्तिही दिधली. *"ज्ञानाविना भक्तिही शून्य अन भक्तिविना ज्ञानही शून्य"*

आपुले मन सतचरणावर लीन झाल्यानंतर भक्ति होते. सदगुरु चरणांजवळ आल्यानंतर ज्ञानही प्राप्त होते अन भक्तिही प्राप्त होते. परंतु ते मानवाने कसे ग्राह्य करायचे असते?

मनात जर पूर्णत्वाने सत् भक्ति असेल तर बौद्धिक स्थिती विशाल होईल. बौद्धिक स्थिती विशाल झाल्यानंतर ज्ञानही विशालच होईल. तरच त्याला ज्ञानाचा अन भक्तीचा प्रत्यय येईल. आपण स्थित रहावयाचे, सतशुध्द रहावयाचे, मन सतशुध्द करावयाचे, नम्र रहावयाचे, प्रणव लीनतेने द्यावयाचे तरच गती गतीने तुमच्या ज्ञानात, भक्तित पूर्णत्वाने वाढ होईल.

भक्त भगवंताप्रत का येत असतो? भक्तिसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी तो सतचरणाप्रत येत असतो का? येणे भक्त भगवंताप्रत येतो, तो सुख, दु:ख सांगण्यासाठी. कलीयुगी स्थितीप्रमाणे, आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत जात होता तो ज्ञानासाठी. परमेशाला पूर्णत्व पहाण्यासाठी!

परंतु या कलीयुगी स्थितीत कशी स्थिती होते?
तर आपली सुख दु:ख  सताने येणे भगवंताने ग्राह्य करून सुखशांती दिधली पाहिजे.

अन जर का भगवंताकडून अशी स्थिती झाली नाही तर मग भक्त चंचल होईल. भगवंताने आपली सुख दु:खे ग्राह्य केली नाहीत तर आपली सर्वस्वांची स्थिती चंचल होते. चलबिचल होते.

मग तो मानव असो, सेवेकरी असो, तो कसा प्रणव देईल? आम्ही आपल्या चरणांवर शरण आलो आहोत यातून मजला सोडवा.

आपण प्रणव दिधलें भक्त भक्तिसाठी सताप्रत येत असतो, अन तोच भक्त पुन:श्च प्रणव कसे देतो?

आपणा सर्वस्वांच्या ज्ञानात अधिकाधिक तेजोमय स्थिती होण्यासाठीच हे प्रणव दिधलें आहेत.

भक्ताचे प्रणव ग्राह्य करणे हे भगवंताचे कर्तव्यच आहे. अन भक्ताने भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचेही कर्तव्य आहे.

परंतु हे आपणास असे प्रणव प्रस्थापित का केले? इतुके ज्ञान आपणाप्रत असताना आपणाकडून प्रणवांची स्थिती का होऊ नये?

भगवंताने स्थुलरुप धारण करून सुखदु:खे भोगली का नाही? त्या अवधीत भगवंत कसे होते? स्थिर, शांत, संयमी होते. पण तोच भक्त थोडीसी दुर्मिळ स्थिती झाली तर कसा होतो? चलबिचल होतो. अवधितच स्थितीही प्रगट करतो.
टायपिंग : श्री सुभाष भोसले