About Sadguru Darbar - सद्गुरू दरबार बद्दल ...........!!!

जवळ जवळ 70 वर्षापूर्वी आमच्या परम पूज्य श्री सद्गरु स्वामी भगवान महाराजांनी सद्गुरू दरबारची स्थापना केली.

हा दरबार त्यांनी मुख्य चार तत्वांवर स्थापिला, ती तत्वे होती -   (अ)  परस्त्री मातेसमान मानने  (ब)  मिथ्या बोलणे नाही  (क)  परधन आपले नाही   (ड)  नशा करणे नाही किंवा मादक पदार्थ सेवन करणे नाही.

याचबरोबर प्रवचनांद्वारे समाज प्रबोधन करणे हा सुद्धा एक मुख्य उद्देश्य होताच. अशाप्रकारे त्यांनी गेल्या ५० वर्षाहूनही अधिक काळ समाज प्रबोधनाचे कार्य केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हि प्रवचन मालिका आम्ही आपणासमोर ठेवीत आहोत.

ह्याशिवाय श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांनी इंगळेवाडी पोस्ट: नुने तालुका / जिल्हा : सातारा व वालावल तालुका : कुडाळ जिल्हा : सिंधुदुर्ग येथेही शाखांची स्थापना केली.

इतकेच नव्हे तर देश, परदेशात देखील श्री सद्गुरू माऊलींचे भक्तगण पसरलेले आहेत. त्यामध्ये नेदरलॅंड, लंडन, सिंगापूर, अमेरिका, नाॅर्वे, आफ्रिका, दुबई इत्यादी देशात ते प्रकर्षाने दिसून येतात.