सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

पूढे राम आपला मार्ग आक्रमत किसकिंदी येथे आले. तेथे मारूतीची भेट झाली. मारूती रामाचा सेवेकरी (दास) बनला. नंतर तिथेच त्यांची वदघट झाली.

मारूतीने उड्डाण करून लंकेत जाऊन ज्या ठिकाणी सीता होती, तिथे मुद्रिका (खूण) घेऊन गेला होता.

हनुमंताने माझी सीतामाई आहे हे बरोबर ओळखले व प्रत्यक्ष पाहिले कि सर्व निद्रिस्त आहेत. त्यांनी झाडावरून पाने टाकायला सुरवात केली. सीतेने वर पाहिले. मारूती म्हणाला तू घाबरू नकोस.

इकडे रावणाला कळले कि बागेत माकड आले. तेंव्हा त्याला पकडण्यासाठी लाख उपद्व्याप केले. जेवढे त्याने केले ते सर्व त्याच्याच अंगलट आले.

त्यांनी चिंध्या शेपटीला बांधून शेपटीला आग लावली. सर्वत्र हाहा:कार झाला. मारूतीने भूभूतक्तार करून लंकेला आग लावली. रावण घाबरला. 3/4 लंका जाळून टाकली.

त्याला रावणाच्या समोर आणले. रावण म्हणाला, "तू हे काय चालवले आहेस?" रावण म्हणाला, "मी उंच आसनावर आहे." तेव्हा मारूतीने सुध्दा आपले आसन उंच केले.

मारूतीने घाम गाळला तो मगरीने ग्रहण केला. तेव्हा मकरध्वज जन्माला आले.

त्याने रामाला सीतेची सर्व हकीगत सांगितली.

म्हणून समर्थ सांगतात, "माझा जो सेवेकरी आहे त्याने कोणत्याही तऱ्हेची काळजी वाहू नये. त्यांचा मी त्राता आहे."

*सद्गुरु मारक नसून तारक असतात.* आपण ज्या आपुलकीने तळमळता ते किती भाग्यवान आहेत.

नारायणांचा नारायण. अशा तत्वांचे आपण सेवेकरी. नीतीने परिपूर्ण असणारे, शुद्ध विचार, आचार व भावना पाहिजे. तरच तुम्ही श्रीहरीच्या आसनाला पात्र व्हाल. ते मायावीने शांती देतील.

मी तुमच्यातली एक ज्योत आहे. पण त्या बाहेर जर काही आतबाहेर झाले तर दोषात्मक आहे. त्यांचे संधान परमेश्वराशी आहे. ते सर्व व्यापक असणारे तत्व हे चालू देणार नाही.
                             (क्रमश:) 29 ऑगस्ट

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मनुष्य यत् किंचित मायावी तत्वासाठी पशु बनतो. हा संशय म्हणजे क्षणिक लोभासाठी. हे करणे बरे नाही. मायावी तत्वात गुरफटला कि ईश्वर तत्व निराळे राहते. ज्याठिकाणी भक्ति तेथे तो रममाण होतो. तेथे विशेष अडचणी काही नाही.

सर्वात सोपी म्हणजे भक्ति. तुमच्यात जे आहे ते ओळखायला पाहिजे.

ते म्हणाले, "माते तुझे प्रणव कायम. मी निघालो."

रामावर सर्वांची माया होती. त्या गडबडीत सीतेला सर्व कळले कि प्रत्यक्ष राम वनवासाला चालले आहेत. त्यांनी कुणाला सांगितले नव्हते. सीता म्हणाली, "तुम्ही जेथे, तेथे मी येणार!" ती म्हणाली, "जशा परिस्थितीत तुम्ही, तशा परिस्थितीत मी."

सीतेचे मनोधैर्य श्रेष्ठ होते. तीने काही गोष्टींचा विचार केला नाही. प्रत्यक्ष राजाला बाहेर गेल्यावर स्वत: सर्व करायला पाहिजे. परंतु तीने कष्टाचे सुख पत्करले. ज्याठिकाणी नवरा तेथे छायेने (पत्नीने) असावयास पाहिजे.

जनकानी सीतेला सर्व काही सांगितले होते. शेवटी पती हा माझा साक्षात परमेश्वर! सीता आदिमाया शक्ति होती. सर्वजण वनवासाला निघाले. करीत करीत राम नाशिक येथे पंचवटीला आले. त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे मठ आहे.

राक्षसांचा नि:पात करण्यासाठी दक्षिणेला जावे लागले. असे परम् तत्व असताचा नि:पात करण्यासाठी चालले होते. पण राक्षस किती लबाड व अघोर असतात. रावणाने मारीचाला मायावी हरीण बनवून सीतामाईला बनविण्याचा प्रयत्न केला. ह्याच्या कातडीची मी वस्त्रे बनवीन.

पण लक्ष्मणाला माहित होते. राम हरिणीच्या मागे होते. पण रावणाने रामाची नक्कल केली कि, "मी संकटात सापडलो आहे, लक्ष्मणा धाऽऽव." तेव्हा सीता घाबरली. पण लक्ष्मणाने सांगितले, "आई तू शांत रहा." परंतु लक्ष्मणाला ती आडवे, तीडवे बोलू लागली. लक्ष्मणा आताच तुम्ही निघा. आई जातो म्हणून त्याने रेषा आखली अन् सांगितले कुणी भिक्षेला आले तर याच्या बाहेर पडू नकोस.

तेव्हा लबाड रावण साधु बनले. व भिक्षेला आले. रावण लांब उभे राहिले. सीतेला पेच पडला व सीता म्हणाली, "तुम्ही जवळ या, भिक्षा वाढायची आहे." वाढताना चुकून तीचा पाय रेषेबाहेर पडला व रावणाने तीला पकडली.

अनंताना हे घडवायचे होते. राम मारिचाला मारून परत आले अन् पहातात तर सीता नाही. रामाला सुध्दा गहिवरून आले. पण लक्ष्मण धीर गंभीर होता.

ते शोधत शोधत दंडकारण्यात फिरू लागले व सीता सीता म्हणून झाडांना कवटाळीत होते. त्याचवेळी सतपुरूषांचा उध्दार होत होता. त्याचवेळी पार्वती शंकराला म्हणाली, "मी नकली सीता बनते." तेव्हा शंकर म्हणाले, "मी राम कोण आहे हे ओळखतो. तू त्या भानगडीत पडू नकोस. तुझ्यामुळे मला त्रास होईल. सावध रहा."

शेवटी पार्वती आली. लक्ष्मण रामाच्या पाठीमागे होताच. पार्वती नकली सीता बनली व लांब उभी राहिली. राम प्रेमाने अश्रू गाळत होते. परंतु राम काही फसले नाहीत. त्यांनी सर्व पाहिले. राम जवळ आले तरी फसले नाहीत. त्यांनी ढुंकुनसुध्दा पाहीले नाही.

*"परस्त्री मातेसमान."* राम पूर्ण शुध्द होते. रामांनी मुद्दाम टाळले. नकली सीता म्हणाली, "हे प्रभो ! आपली सीता येथे असताना आपण असे काय करता?" राम उत्तरले, *"हे भवाने! तू मला बनवायला आलीस का?"* (तीच ती तुळजापूरची भवानी) "हा दाशरथी राम पत्नीला पागल नव्हता. तू काय कैलासपती भोलानाथ समजलीस."

तीने पतीचा धावा केला. रामाने तीची पूजा केली.
                                  (क्रमश:)

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

*रामविजय : जय जय रघुवीर समर्थ*

आर्यवर्तात पूर्वी शाळा नसून गुरूकुले होती. त्यांचेपैकी काहींचे गुरू वशिष्टमुनीं होते. तेथे उच्च, नीच, श्रीमंत, गरीब, ब्राम्हण, क्षत्रिय असा भेदभाव नव्हता. मानव हीच जात व अवतार - स्त्री, पुरुष. फक्त शुध्द अशुद्ध ते पहात.

वशिष्ठ गुरूकुलामध्ये ते शिक्षण घेत होते. वशिष्ठांनी सुध्दा यांना 'योगवाशिष्ठ ' शिकविले.

आपण तन, मन, धन अर्पण करतो, ते करणारे फार निराळे आहेत. रूढी प्रमाणे सेवेकरी तिन्ही अंगाने शरण जायला पाहिजे.

सद्गुरु हे स्वयंमेव पद आहे. हे पद शिष्याला टिकवावे लागते.

दशरथ हे वयस्थ झाले तेव्हा राम हे राज्याधिपती होण्यास लायक होते. वशिष्ठांना सर्व माहित होते, पण ते सांगत नव्हते.

कैकयी शुध्द सात्विक ज्योत होती. मंथरा तीची दासी होती. मंथरेने कैकयीला सांगितले रामाला राजपद मिळाले तर भरताचे काय? राम आपल्या मातेला न भेटता सावत्र आईला प्रथम भेटत असत.

परंतु अनंताना माहित होते व त्यांना पूढे घडवायचे होते. कैकयीने दशरथांना बोलावले. कैकयी ही दशरथांची लाडकी होती. तीने फसवून वर मागीतले. ते ऐकून दशरथ बेहोष पडला.

पहिला वर भरताला राज्य व दुसरा वर रामाला वनवास. दशरथ राजा मुर्च्छा येऊन पडला. त्याचे रामावर जास्त प्रेम होते. पण धन्य ते राम! त्याबद्दल त्याना काहीच वाटले नाही. रामाच्या कानावर आले तेंव्हा ते गहिवरून कैकयीला म्हणाले, *"माते भरताला राज्यावर बसव."* पण वडीलांची ही तऱ्हा. त्यावेळी कैकयी शुद्धीवर आली. ते म्हणाले तुमच्या आदेशाने मी चौदा वर्षे फिरून येतो.
                                (क्रमश:) 27 ऑगस्ट

शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

रामविजय : जय जय रघुवीर समर्थ|

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

दशरथ राजाच्या कुटुंबाचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी! दशराथाचे वडील दिलीप. साक्षात परमेश्वर कौशल्येच्या उदरी जन्म घेणार हे माहित नव्हते. पण वशिष्ठांना हे माहित होते. परमेश्वर सुद्धा पाहतात कि ज्याच्या उदरी, कुशीत जन्म घ्यायचा ती भूमी शुध्द पाहिजे. यज्ञ केल्यावर पितामहांनी पिठाचे पिंड केले. पिंडामुळे पुत्रप्राप्ती झाली. म्हणजेच त्या पिंडात आव्हान करून शक्ति निर्माण केली. परमेश्वराच्या संधीने भाग केले. परंतु एक भाग घारीने नेला तो अंजनीने भक्षण करून मारूतीचा जन्म झाला.

स्वरूप, कांती, सतेज, दैदीप्यमान ज्योत म्हणजेच राम! परंतु कौशल्या अभिमानी नव्हती. माझे, तुझे तिच्याजवळ नव्हते. राम पूर्णात पूर्ण होते. शीतल, शांत, धीर गंभीरतेने जाणारी दयाघन ज्योत होती.

प्रभु रामचंद्र म्हटले कि आल्हाद वाटतो. शुध्द स्फटिकासारखा, सतेज, बुध्दीमान होता. बुध्दीवान होते साक्षात क्षिराब्धीच ते! सातव्या अवतारात शेष हा लक्ष्मण होता.

राम पितृ व मातृ भक्त होते. त्यांनी सावत्र आईला सुध्दा दुखावले नाही. ज्याचे वर्तन शुध्द आणि शीतल तोच सद् वर्तनी, शुद्ध शुचि:र्भूत. अविनाशी ममतेने व प्रेमळपणाने राहत असत. नितांत आदरणीय असे लहानाचे मोठे होऊ लागले.
                              (क्रमश:) 26 ऑगस्ट

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

शेवटी कौरव पांडवांची लढाई जुंपली, परंतु त्याना पांच पांडवांचा नाश करता आला नाही. अर्जुनाच्या ठिकाणी माया उत्पन्न झाली त्यावेळी अर्जुनाने वायुमंत्र उपदेशिला. त्याच ठिकाणी कृष्णाने सुक्ष्माची गती दिली. अर्जुनाने गुरू, मामा, आजोबा, भाऊ या सर्वाना पाहिले. अर्जुन कृष्णाला म्हणाला मला हे राज्य नको. अन् हे पापही नको. तुच्छ ते राज्य. "कृष्णा ! मला या राज्याची आवश्यकता नाही." तेव्हा कृष्ण म्हणाले, "अर्जुना तुला ही दुर्बुद्धी कशी सुचली?" कृष्णाने जाणले व त्याला ठिकाणावर आणण्यासाठी उपदेश केला. तीच गीता 150-200 श्लोकात केली. 

"ही लढाई सत्य असत्यासाठी आहे. तू कोण? मारविता कोण? वगैरे सांगून विराट रूप दाखविले व हे सर्व खेळ मी अनंताचा अनंत करीत आहे." कृष्णाने अर्जुनाला शुद्धीवर आणून ठणकावले कि, "तुझ्याकडून हे युध्द करून घेणार आहे."

तेव्हा अर्जुन लढाईला उभा राहिला. पण अर्जुनाला बाण लागला नाही. कृष्णाने सारथ्याचे काम केले. त्याच्या
रथाच्या वरती रूद्र मारूती होता. म्हणून रथ उडत नव्हता.

इतके सर्वस्व घडविले, पण द्रोण, भीष्म कठीण होते. द्रोण ही सामान्य ज्योत नव्हती. कृष्णाने कारस्थाने केली. त्याने भीमाला बोलावले व सांगितले अश्वत्थामा हत्तीला ठार मारणे. ठार मारल्यानंतर कृष्ण धर्माजवळ आले. आकाशपाताळ एक केले व धर्म राजाला म्हणाले, "अश्वत्थामा लढाईत पडला हे आम्ही सर्वत्र पसरविणार. तेव्हा द्रोण तुझ्याकडे येईल, तेव्हा तू फक्त असे म्हण कि, "अश्वत्थामा लढाईत पडला. मनुष्य किंवा हत्ती माहित नाही."

कृष्णाने सत्यासाठी लबाडी केली. पण कृष्ण तेथेच अव्यक्त राहिले. द्रोणाना कळताच ते धर्माजवळ आले. अन् धर्माला म्हणाले धर्मराज अश्वत्थामा लढाईत पडला हे खरे आहे काय? तेव्हा कृष्णाने धर्माला श्रवणी दिली. धर्माने सांगितले, "अश्वत्थामा लढाईत पडला."

तेव्हा द्रोणाचार्याना बाणाने मारले. भीष्मांची तसेच कर्णाची गती केली. कर्ण हा पांडव होता. पण अघोराकडे सानिध्य.

कर्ण खरा दानशूर होता. कवचकुंडले मागितली. कृष्णाने पृथ्वीला आदेश दिले तू दुभंग हो. तेव्हा कर्णाच्या रथाची चाके जमीनीत रूतली. कृष्ण म्हणाले, "कर्णा तू एका साध्वीची वस्त्रफेड होताना खाली मान का घातलीस?"

महाभारत संपल्यावर कृष्णराज यादवकुलोत्पन्न होते; यादव उन्मत्त झाले. त्याने समाधी अंगाने आपली काया स्थिर केली. सत्यासाठी झगडले. कृषणावतारात त्यांनी याप्रमाणे कार्य केले.

आता कलीयुगात सद्गुरु तत्वाने कार्य करीत आहेत. नीती तत्वाने जाण्यास सद्गुरु सांगत आहेत. सत् हे सतासाठी झगडणारे आहे. ते निर्भीड, सत्य अन् सात्विक आहे. *सत्या परता नाही धर्म!* ज्याच्या जवळ सत्य धर्म नाही तो मुक्तिस कसा जाणार?   24 ऑगस्ट 

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

कृष्णांची शिष्ठाई संपल्यानंतर, ते चालले असताना कृष्णांना भूक लागली. पण कृष्ण नात्याने दुर्योधनाकडे  वा धर्माकडे न जाता विदूराकडे गेला. हा गरीब होता. (शुध्द साधी ज्योत) कृष्ण त्याच्या घरी आले. तेव्हा विदूर कासावीस झाला. कारण त्यांना मी काय देणार? 

परंतु विदूर सत् होते. अन्न घ्यायचे ते सताच्या घरी. त्यावेळी विदुराला परमानंद झाला. विदूर म्हणाले, "या वेळी माझ्या घरी काही नाही." पण कृष्ण म्हणाले, "त्या कण्या आहेत की!"
        *विदूरा घरच्या भक्षुणी कण्या*

      नंतर कण्यांची पेज पत्रावळीचा द्रोण करून त्यातून खात असताना कृष्ण म्हणाले, "आज मी अमृत प्यायलो. परंतु विदूर म्हणाला परमेश्वराला पेज द्यावी! तेव्हा कृष्ण प्रेमाने म्हणाला, विदूरा तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी एका हाताने जेवतो. पण तुझ्यासाठी चार हातानी द्रोण केला, तू धन्य आहेस. असे हे कृष्ण सताचे कैवार घेणारे आहेत. कौरवांनी कपटे केली. पांडवाना बारा वर्षे वनवासात पाठवली, वनवासात सुद्धा असताना दुर्योधनाने दुर्वास मुनींना सात - आठसे शिष्यांना घेऊन द्रौपदीकडे जेवणासाठी पाठविले. त्यावेळी अथितीचा आदर सत्कार केला जात असे. दुर्वास द्रौपदीकडे आले परंतु बुध्दी असताची होती. ते सर्व जेवण आटोपल्यानंतर आले तेंव्हा द्रौपदीला भीती वाटली. यांना आता जेवण कुठचे द्यायचे? पण दुर्वास ठणकावून म्हणाले, *"आम्ही गंगास्नान करून येतो, तो पर्यंत जेवणाची तयारी कर."* ती होय म्हणाली, पण तीला आठवण झाली सूर्याने दिलेली थाळी तीने धुऊन ठेवली होती. अशावेळी शांतपणे तीने कृष्णाचा धावा केला. तेव्हा कृष्ण हजर झाले. तीने सर्व हकीगत सांगितली. कृष्णाला सुद्धा पेच पडला कृष्ण म्हणाले, अग, पण द्रौपदी तुझ्याजवळ थाळी आहे ना? पण त्या थाळीला डाळीचा एक कण लागला होता. कृष्णांनी चावी फिरवली. तेव्हा प्रत्येक जण पाण्यातच ढेकर द्यायला लागले. त्यांनी ध्यान करून तेथे कृष्ण असल्याचे पाहिले. व तेथून पळून गेले. भगवंत ज्या ठिकाणी आहेत तेथे कमतरता होऊ शकेल काय? आपल्या भक्ताची बुध्दी कोती तर भगवंत त्याला कोते देतात. पण बुध्दी विशाल असल्यास भगवंत सुद्धा विशाल! भक्ताची लाज त्यांनीच राखली. असे ते करून अकर्ते आहेत.
                                     (क्रमश:) 23 ऑगस्ट

*मातृ परम दैवतम्*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

      कृष्ण शिष्ठतेसाठी आले असता दुर्योधन उच्च स्थानी बसले होते. त्यावेळी कृष्ण म्हणाले, "मी शिष्ठतेसाठी आलो आहे. तुम्ही समान दोन भाग करून महायुद्ध आटपा. पण त्या पांडवाना सुईच्या टोकाइतकीसुध्दा जमीन मिळणार नाही", असे कौरव म्हणाले.

इतका अपराध झाला तरी कृष्ण सहन करीत होते. भीम हा फक्त आईला (कुंतीला) मान द्यायचा. कृष्ण विचार करीत बसले. ते दुर्योधनाला म्हणाले, "दुर्योधना तू विचार कर. तुझे म्हणने चौकटीत बसत नाही." दुर्योधन धर्माला म्हणाला, "तुझे काय मत आहे?" तेव्हा धर्म म्हणाला, "ते कृष्ण सांगेल." तेव्हा कृष्ण म्हणाला, "यामध्ये तुला कोण पुण्यवान दिसतो का?"

धर्माला पापी बनविणारा दुर्योधन, तोच पापी होता. तेव्हा त्याला सर्व पापी दिसत होते. धर्म म्हणाला, "सर्व पुण्यवान व दुर्योधन सुध्दा पुण्यवान."

ज्याचे आचार विचार सत् त्याला सतच दिसणार. कृष्ण मात्र नाराज झाले. पुढे महान अवर्षण होणार हे माहित होते.
                              (क्रमश:)