गुरुवार, २८ फेब्रुवारी, २०१३

समर्थाचिया सेवका वक्र पाहे


समर्थाचिया सेवका वक्र पाहे / असा सर्व भूमंडळी कोण आहे /
जयाची लीला वर्णिता तिन्ही लोकी / नु पेक्षा कदा रामदासां भिमानी /

लक्षात घ्या समर्थांचे सांगणे एकाच आहे, समर्थ तारी त्याला कोणीही मारू शकणार नाही. . समर्थासमोर येणे सद्गुरू समोर त्रिगुण देखील फिके पडतात, मायेचे देखील  कांहीही चालत नाही.

सद्गुरूंचा ज्याच्यावर कृपा हस्त आहे त्याचे कोणीही कांहीही करू शकत नाहीआपल्या भक्तासाठी गुपचूप अव्यक्तपणे जाऊन कर्तव्य करून येतील. सद्गुरू कर्तव्य करतात हे कोणाला कळणार देखील नाही. असे जे परमनिधान तत्व ज्यांना तुम्ही सत म्हणतात तेच समर्थतेच सदगुरु सर्वस्व व्यापून अलिप्त असणारे तत्व जळीस्थळीकाष्ठीपाषाणीअसणारे तत्वतीन ताल सप्त पाताल भरूनही उरलेले तत्व मग अशा सताची उपासना करणे योग्य आहे कि नाहीहेच सत सर्वस्व विखुरलेले आहे. त्या सदगुरांच्या नामस्मरणात जर आपण स्थिर झालो तर सदगुरु आपल्याला कदापीही बाजूला सरणार नाहीत. पण मनातले भय मात्र मागे सारा. अशा सदगुरूंचे आपण सेवेकरी आहोत ह्याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. समर्थाचे आपल्या भक्तावर पूर्ण लक्ष असते.





बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

शिष्य कसा असावा?

गुरु कसा असावा ? यावर बरेच जण चर्चा करतात, पण शिष्य कसा असावा यावर कधी जास्त उहापोह होत नाही. 

समर्थांनी 

"म्हणॊनी सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथे न लगती सायास । 
त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरा ॥" असे म्हटले आहे.  

जसे गुरु सद्गुरु पाहिजेत तसे शिष्य सच्छिष्य पाहिजे, म्हणून समर्थांनी सच्छिष्यांची लक्षणे सांगितली आहेत. 

" मुख्य सच्छिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । 

अनन्यभावे शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ 

या ओव्या मधे पुढे समर्थांनी शिष्य हा निर्मळ, आचारशील, विरक्त, निष्ठावंत, पवित्र, धीर, उदारप्रज्ञावंतसात्विकजगतमित्र (सर्वांवर प्रेम करणारा) असावा. तो अविवेकी नसावा. 


"घडी एक विश्वास धरी । सवेची घडी एक गुर्गुरी ।” 

अंत:करणात अभिमान आणि बाहेर विनम्रता असा दुटप्पी पणासद्गुरुंच्या पुढे जास्त लुडबुड करून, अन्य साधकांना सद्गुरुंची सेवा करण्याची संधी न देता मीच सद्गुरुंचा फार जवळचा आणि आवडता शिष्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारा नसावा. 

"सद्गुरुहून देव् मोठा । जयास वाटे तो करंटा । अशी ज्याची पूर्णपणे समर्पित बुद्धी आणि अत्यंत निष्ठा आहे तो उत्तम शिष्य होय.