गुरु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

शिष्य कसा असावा?

गुरु कसा असावा ? यावर बरेच जण चर्चा करतात, पण शिष्य कसा असावा यावर कधी जास्त उहापोह होत नाही. 

समर्थांनी 

"म्हणॊनी सद्गुरु आणि सच्छिष्य । तेथे न लगती सायास । 
त्या उभयतांचा हव्यास । पुरे एकसरा ॥" असे म्हटले आहे.  

जसे गुरु सद्गुरु पाहिजेत तसे शिष्य सच्छिष्य पाहिजे, म्हणून समर्थांनी सच्छिष्यांची लक्षणे सांगितली आहेत. 

" मुख्य सच्छिष्याचे लक्षण । सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण । 

अनन्यभावे शरण । त्या नांव सच्छिष्य ॥ 

या ओव्या मधे पुढे समर्थांनी शिष्य हा निर्मळ, आचारशील, विरक्त, निष्ठावंत, पवित्र, धीर, उदारप्रज्ञावंतसात्विकजगतमित्र (सर्वांवर प्रेम करणारा) असावा. तो अविवेकी नसावा. 


"घडी एक विश्वास धरी । सवेची घडी एक गुर्गुरी ।” 

अंत:करणात अभिमान आणि बाहेर विनम्रता असा दुटप्पी पणासद्गुरुंच्या पुढे जास्त लुडबुड करून, अन्य साधकांना सद्गुरुंची सेवा करण्याची संधी न देता मीच सद्गुरुंचा फार जवळचा आणि आवडता शिष्य आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करणारा नसावा. 

"सद्गुरुहून देव् मोठा । जयास वाटे तो करंटा । अशी ज्याची पूर्णपणे समर्पित बुद्धी आणि अत्यंत निष्ठा आहे तो उत्तम शिष्य होय.