कौरव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कौरव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ६ जून, २०२१

रथ हाकूनिया पांडवांचा......

रथ हाकूनिया पांडवांचा, पळविशी कौरवा.........

     हि त्या श्रीकृष्णांची ओळख आणि श्रीकृष्ण कोण? तर साक्षात ॐकारांचेच अवतारकार्य. 
     हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील तिसरा भाग म्हणजे द्वापार युग आणि या द्वापार युगाची देवता, म्हणजे श्रीकृष्ण. 
     कौरव-पांडवांच्या घमासान झालेल्या युध्दात श्रीकृष्णांनी सताची बाजू घेत, अर्जूनाचे सारथ्य पत्करले व शेवट असताचा नाश केला. इतरही युगात व अवतार कार्यात अघोरांचा नाश व सत् शुध्द भक्तांचे अघोरांपासून संरक्षणच करण्याचे महान असे कार्य वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या नामाभिधानाने पार पाडले.
     परंतु ह्या कलियुगात हेच म्हणजे अघोरांचे पारिपत्य करण्याचे कार्य, सव्विसावे अवतारकार्य नटवून पार पाडण्यात आले, तेच मुळी *भगवान* या नावाने. या अवतार कार्याचे वैशिष्ठ्य होते, स्थुल सोडून इतर सर्व देहांवर कार्य करणे. अर्थात ह्या अगोदरच्या अवतारात स्थुलावर प्रत्यक्षपणे कार्य करता येत होते. त्यामुळे अघोरांची स्थुले त्या त्या वेळेस पडली, परंतु भगवंताकडूनच हे कार्य झाल्याने, त्या अघोरांची सुक्ष्मे इतर देहांमध्ये बलवत्तर झालीत.
     त्यामुळे आतापर्य॔तच्या अवतारकार्यातील अघोर सुक्ष्म, कारण, महाकारण, अणू, रेणू, परमाणूंमध्ये त्यांच्या पाय-यांनुसार बलवत्तर होत गेली व सताला जुमानत नाहिशी झालीत.
     हे कार्य सताशिवाय दुसरे कोणीही करू शकत नसल्याने, या शेवटच्या कलियुगांत सताचे सव्विसावे अवतारकार्य अवधीतच संपन्न होऊन, स्थुल सोडून सर्वस्व अधिकार असल्याने, या सगळ्यांचा नाश करून संपन्न करण्यात आले.
     आता येणारा काळ अघोरांचा निःपात आणि सताचा जयजयकार होऊनच संपन्न होणार आहे.
     आता हा रथ स्वतः श्री भगवान हाकीत असून, कौरव रूपी अघोरांना हटविण्याचे हे कार्य अद्यापिही अव्याहतपणे चालू आहे.
     तरी सताच्या सांगण्याप्रमाणे आपण समस्त भक्तगणांनी या सर्वस्वावर जालिम उपाय म्हणून सतत नामस्मरणांत राहावयाचे आहे व सताला व सताचे चरणकमल डोळे भरून पाहावयाचे आहेत.