वाल्मिकी ऋषी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
वाल्मिकी ऋषी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१८

वाल्मिकी ॠषी

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

मानव हा नेहमी म्हणत असतो, "आपल्याच्याने भक्ति कशी होणार? आपल्या मनामध्ये ठामपणा नाही म्हणून."

भक्ति साधी, सोपी, सुलभ परमार्थाची गाठ करून देणारी आहे. ज्याने पापी, अघोर उध्दरीले, तर सद्वर्तनाने मानव का बरे होणार नाहीत?

वाल्याने उघड पापे केली, पण आजच्या मानवांची फसवणुकीची पापे आहेत. अविचाराने खून होतो.

मानवाने नितीयुक्त राहिले पाहिजे. अनिती ही संसाराची कुऱ्हाड आहे. अनिती हा पडदा आहे. तो अदृष्य खून करतो. वाल्या दृष्य खून करीत होता. हा खून म्हणजे गोड बोलून काटा काढणे. अनितीने जाणारे मानव दुसऱ्याचे ते आपले म्हणणारे आहेत. ते मानव मायाविचे जाळे विणतात.

श्रद्धा अटळ असते. ती डळमळणे म्हणजे विश्वासघात करणे. अनितीमान ज्योती बदसल्ला देतात.

संगत करायची तर सताची कर. सतसंगी ज्योतीच्या चेहर्‍यावर सतेज दिसते. पण असत ज्योतीच्या चेहर्‍यावर तेज दिसत नाही.

वाल्याचा व्यक्त गुन्हा व मानवाचा अव्यक्त गुन्हा होय. मानवामध्ये ही सर्रास वृत्ती आहे. अपहाराच्या द्रव्याला स्थिरता नाही.

परधन आपलं नाही. जे आपले आहे ते आपल्या जवळ आहे.

गुप्त खुन यांच्यासारखे महत् पाप दूनियेत नाही.

ज्याचे मन स्वस्थ्य आहे तोच सुखी. तो बाकीची फिकीर करत नाही.

पूर्वीचे मानव दूसऱ्याचे ते आपले म्हणत नव्हते. त्यांच्या मनाची चाकोरी विशाल होती. अशा ठिकाणी परमेश्वर असतात. ज्याठिकाणी परमेश्वर आहेत त्या ठिकाणी त्यांची अर्धांगिनी लक्ष्मी असणारच. सेवेक-यांनी हे लक्षात ठेवणे, "माझ्या हातातले तू घेशील, पण माझ्या प्रारब्धातले तुला घेता येणार नाही."