गुरूदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुरूदेव लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २१ जून, २०१८

*जयजयादि परात्परा |*

*जयजयादि परात्परा |*
    *जगत्गुरू कर्पुरगौरा ||*
       *गुरुदीक्षा निर्विकारा |*
          *श्रीशंकरा मज देई ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*" परात्परा येणे कोणती स्थिती?
सर्वस्व स्थितीत विखरुनही पराच्याही पलीकडे असणारी स्थिती येणे अनंत स्थिती."*

पार्वतीचे प्रणव आहेत "सर्वस्व स्थितीत आपण सर्वश्रेष्ठ आहात." परंतु पार्वतीला कल्पना होती का?

पार्वती स्वयंभूना प्रणव प्रस्थापित करीत होती, आपणच सर्व जगात श्रेष्ट आहात अन आपणाकडून मजला गुरुदिक्षा अनुकरण करावयाचे आहे. स्वयंभूकडून गुरुदिक्षा स्विकारून ती काय करणार होती? कशाची उपलब्धता तिजला करून घ्यावयाची होती?

आपण सर्वस्व जाणता दिक्षेत सर्वस्व स्थिती आहे. एकदा का सदगुरूंचे अनुकरण केले तर शिष्याला सर्वस्व स्थिती अनुभूतीत येते. अन अनुभूतीत आल्यानंतर शिष्याचे कोणते कर्तव्य असते? येणे सेवेकऱ्याचे कोणते कर्तव्य असते? *"सतत नामस्मरण करणे", सतत नामस्मरण केल्यानंतर सेवेकऱ्याला काय प्राप्त होते? ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त होते येणे कोणती स्थिती? तर स्वयंप्रकाश प्राप्त होतो"* अन त्या स्वयंमतेत प्रकाशात सेवेकरी काय पहात असतो? तर आपल्या सताचे येणे सदगुरूंचे दर्शन घेत असतो. सदगुरु दर्शन कशामुळे प्राप्त होईल हीच या पार्वतीची इछा.

जीव आणि ब्रम्ह!
सेवेकरी जीवात्मा स्थितीत असतो. येणे आत्मा स्थितीत असतो, अन सदगुरु परब्रह्म स्थितीत असतात. जीवात्मा परब्रह्म स्थितीत एकात्म झाल्याखेरीज दर्शन स्थिती प्राप्त होईल का? नाही होणार. जीव परब्रम्हात लय व्हावयास हवा. तो जीव परब्रम्हात लय कसा होईल. कुणामुळे होईल तर सदगुरूंमुळे होईल. जे दिधलेले नाम आहे त्याच्यात सेवेकरी पूर्णत्व लय झाला पाहिजे.

तरच जीव परब्रम्हात लय होईल. जे नाम आपणाप्रत सताने प्रदान केले आहे ते नाम कशासाठी प्रदान केले आहे. ते सताला पाहण्यासाठी प्रदान केले आहे. जीवात्मा तुमच्या शरीरयष्टीत स्थांबत असतो, तर भवसागरात तुम्हास कोण फिरवित असते? मन! अन त्या मनाला स्थिर शांत कोण करीते? तर नाम! जेव्हा सेवेकरी नाममय होतो तेंव्हाच मन स्थिर होते. मन स्थिर झाल्यानंतर आत्मा स्वयंप्रकाशित होतो. स्वयंप्रकाशित झाल्यानंतर त्या आत्म्याचे संधान परब्रम्हाशी होते. म्हणून मानवाने सताचे नामस्मरण केले पाहिजे. हीच स्थिती पार्वतीला जाणून घ्यायची आहे. स्वयंभू तत्व कसे होते तर आपल्या सताशी एकात्म होते.