मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

सद्गुरू आणि अनंत

अंत न लागे अनंताचा
लिनता, नम्रता न अंगी बाणे
एकच मार्ग उरतो आता
शरण तयासी जाणे ||

शरण तयासी जाण्याचा
मार्ग दाखवी सद्गुरू
उपदेशाची अमृत वाणी
स्वामी मुखातून उच्चारू ||

उच्चारता नाम तयाचे
गळून पडतील पातके
सद्गुरू आणि अनंत हे
एकच तत्व इतुके ||

स्वामी हा तिन्ही जगाचा
नामातच असे सामावलेला
नाम मुखी घेता तयाचे
जन्म सार्थकी लागेल अमुचा !!!
..........मयुर तोंड़वळकर.........

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

शरण जाता श्री सदगुरूशी.......

कोण रक्षितो गर्भामधे...?
कोण पुरवितो तेथे वारा...?
कोण निर्मितो बाळासाठी
जन्माआधिच अमृत धारा...?

कोण छेडीतो श्वासांमधे...?
प्रभूस्मरणाच्या मंजूळ तारा,
कोण निर्मितो नाद अनाहत.....?
ज्याने उजळे मनगाभारा.

उजळविण्याला मनगाभारा
कोण चेतवी अंतरज्योती...?
करण्या निशिदिन स्मरण प्रभूचे
कोण देतसे अखंड स्फुर्ती...?

कोण घडवितो वटवृक्षाला..?
कणा येवढ्या बिजामधूनी,
कोण देतसे फळांस गोडी..?
जिवन सोशून मातीमधूनी.

कोकिळ कंठी कोणी दिधले..?
गंधर्वांचे अपूर्व देणे,
वसंत येता आम्रतरूवर
कोण फुलवितो त्याचे गाणे..?

कुणी रेखिले मोरपिसावरी..?
रंग रेशमी इंन्द्रधनुचे,
मेघ बरसता गर्द वनामधे
कोण नाचतो त्याच्या संगे..?

निद्रेतूनही नयनांमधे
स्वप्न होऊनी कोण जागतो..?
सुखदु:खामधे हृदयी राहून
कोण अखंडीत सोबत करतो..?

कोण..? कसे..? या प्रश्नापाठी
आयुष्याची संध्या होते,
शरण जाता श्री सदगुरूशी
मग कर्त्याची ओळख होते.

"कर्ता एक रघुनंदन" हे
शरणांगत होताच उमगते,
प्रश्न मनीचे विरून जाती
एक तत्व हे मनी प्रगटते.

सद्गुरुकृपेच्या ऋणातुनी या
कोण कसे होईल उतराई,
हात मस्तकी सदैव वत्सल
जैसा ठेवत असते आई...

Courtesy: WhatsApp/Internet/unknown author
 🙏🙏🙏🙏

शनिवार, ८ जुलै, २०१७

भवसागर मुक्ती

🕉🙏🕉👏🕉🙏🕉👏🕉

"व्यावहारिक जीवनात माता-पिता  आपल्याला जन्म देतात तर अध्यात्मातील माता-पिता म्हणजेच सद्गुरू आपल्याला या भवसागरापासून मुक्ती देतात."

"भवसागराच्या मुक्तीसाठी भगवंताच्या नामस्मरणाची गरज असते. ते "नाम" सद्गुरूच आपल्याला देत असतात. सद्गुरू  हा मानव व भगवंत ह्यामधील एक असा दुवा आहे की मानवाला  भगवंत प्राप्तीचा मार्ग आपोआपच खुला होतो, त्यासाठी  थोडा मायेचा विसर पडणे गरजेचे  असते. मायेचा विसर तेव्हाच शक्य होतो ज्यावेळेस आपल्या शिरी सद्गुरूंचा कृपाहस्त होतो. कृपाहस्त तेव्हाच होतो ज्यावेळेस आपणांस कळू लागते की माया काय आहे. ते शक्य होते फक्त सद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शाने. सद्गुरूंचा पदस्पर्श आणि हस्तस्पर्श होताच अर्थात नामस्मरण मिळताच आपण या भवसागरापासून मुक्त होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करू लागतो. त्यासाठी सद्गुरू सांगतात हा प्रपंच सोडण्याची गरज नाही, मौजमजा सोडण्याची गरज नाही, तर संसारात राहूनच, त्यातून वेळ काढूनच हे सर्वस्व आपणांस प्राप्त  होऊ शकते. त्यासाठी संसारातून, या मायेतून जेवढा वेळ काढून आपल्याला सत् कर्तव्यासाठी देता येईल तेवढा तो आतापासूनच जर आपण दिला तर "थेंबे थेंबे तळे साचे" या म्हणीप्रमाणे आपले सत् मार्गाचे तळे निर्माण होऊन त्याचे एके दिवशी त्याचे सरोवरात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही व भगवंत प्राप्ती दूर राहणार नाही.

🕉👏🕉🙏🕉👏🕉🙏🕉

शुक्रवार, ९ जून, २०१७

वचने

[1/4, 9:02 AM] Mayur Tondwalkar: 🙏💐☘🌼🌹🍃🌿🌻🌷🌺🙏

हेतु शुद्ध ठेवा, मानस शुद्ध ठेवा, कर्तव्य शुद्ध ठेवा आणि भगवंताच्या दर्शनासाठी मार्गस्थ व्हा......

🙏🌺🌷🌻🌿🍃🌹🌼☘💐🙏
[1/4, 9:05 AM] Mayur Tondwalkar: 🙏💐☘🌼🌹🍃🌿🌻🌷🌺🙏

माझे भगवंत, माझे सद्गुरू,
सर्व समस्यांवर तेची आधारू,
नामस्मरणाची कास धरू,
अवघे विश्वची भरून उरले सद्गुरू !!

🙏🌺🌷🌻🌿🍃🌹🌼☘💐🙏

शुक्रवार, ३ मार्च, २०१७

निजधर्म हा चोखड़ा | नाम उपधारा घड़ाघड़ा || भुक्ति-मुक्ती सवंगड़ा | हा भाव सिंधुतरी ||

●  निजधर्म हा चोखड़ा | नाम उपधारा घड़ाघड़ा ||
      भुक्ति-मुक्ती सवंगड़ा | हा भाव सिंधुतरी ||  ●●
!!  प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज प्रवचन  !! 1

आपण कोण आहोत अन् आपला धर्म कोणता?

धर्म म्हणजे जात नव्हे. धर्म म्हणजे धारणा, पोषण अन् कर्तव्य. प्रथम धारणा, तद्नंतर त्याचे पालनपोषण अन् मग त्याचे कर्तव्य.

आता स्वधर्म कोणता? तर मानवता.

मानव हा अवतार आहे म्हणून मानवता हा धर्म. आता प्रथम धर्म तू जाणलास. माझे सत् हे सर्वांठायी एकच आहेत अशा समत्व भावनेने तू वाग. समतेने वागल्यानंतरच त्याला मानव धर्म कळला असे म्हणता येईल.

ज्या ठिकाणी मानवता असते तेथेच लीनत्व असते. अशा या मानवतेला नामाची जोड़ मिळाली तर काय होईल?

मानवता म्हणजे सत् मार्गाने जाणे. नितीमत्तेने वाटचाल करने अन् तुझ्यात वास करणारे जे अविनाशी तत्व जे आहे त्याची ओळख करून घेणे. नामच तूला त्या अविनाशांची, सताची, ब्रह्माची ओळख करून देईल. नामाच्या जोड़ी शिवाय हे होणे शक्य नाही.

🕉🌺🌷☘🕉🙏🕉🌺🌷☘🕉

बुधवार, १ मार्च, २०१७

"मुक्ती आणि मोक्ष"

🕉🙏☘🌺🌷🙏🕉

"मुक्ती आणि मोक्ष"
हेच असे सगळ्यांचे लक्ष्य |
ते मिळते फक्त
होता दर्शन सद्गुरू चरणांचे ||

🕉🙏🌷🌺☘🙏🕉

सद्गुरू चरणांवर ज्याचे लक्ष्य......

🕉🙏☘🌺🌷🙏🕉

सद्गुरू चरणांवर ज्याचे लक्ष्य
त्याला नसेल कोणतेच दुर्भिक्ष्य
सद्गुरू दर्शन दुरापास्त
नसे कधी तयास |

सद्गुरूंचे दर्शन होता
भक्तास न भासे उणीव कदा
तयाची कार्ये घडतील सदा
विनासायास, अनायास ||

कार्ये जरी घडली
विनासायास विनाप्रयास
तरी तो नसावा उद्देश्य
चरण सद्गुरूंचे मिळविण्याचा ||

एकच लक्ष्य एकच ध्येय
सद्गुरू चरण मिळणे हेच श्रेय
सद्गुरू चरण मिळताच भक्त
संसाराच्या जंजाळातून होतो तो कायमचा मुक्त!!

!!  जय श्री सद्गुरू माऊली  !!

🕉🙏🌷🌺☘🙏🕉