शनिवार, ८ जुलै, २०१७

भवसागर मुक्ती

🕉🙏🕉👏🕉🙏🕉👏🕉

"व्यावहारिक जीवनात माता-पिता  आपल्याला जन्म देतात तर अध्यात्मातील माता-पिता म्हणजेच सद्गुरू आपल्याला या भवसागरापासून मुक्ती देतात."

"भवसागराच्या मुक्तीसाठी भगवंताच्या नामस्मरणाची गरज असते. ते "नाम" सद्गुरूच आपल्याला देत असतात. सद्गुरू  हा मानव व भगवंत ह्यामधील एक असा दुवा आहे की मानवाला  भगवंत प्राप्तीचा मार्ग आपोआपच खुला होतो, त्यासाठी  थोडा मायेचा विसर पडणे गरजेचे  असते. मायेचा विसर तेव्हाच शक्य होतो ज्यावेळेस आपल्या शिरी सद्गुरूंचा कृपाहस्त होतो. कृपाहस्त तेव्हाच होतो ज्यावेळेस आपणांस कळू लागते की माया काय आहे. ते शक्य होते फक्त सद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शाने. सद्गुरूंचा पदस्पर्श आणि हस्तस्पर्श होताच अर्थात नामस्मरण मिळताच आपण या भवसागरापासून मुक्त होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करू लागतो. त्यासाठी सद्गुरू सांगतात हा प्रपंच सोडण्याची गरज नाही, मौजमजा सोडण्याची गरज नाही, तर संसारात राहूनच, त्यातून वेळ काढूनच हे सर्वस्व आपणांस प्राप्त  होऊ शकते. त्यासाठी संसारातून, या मायेतून जेवढा वेळ काढून आपल्याला सत् कर्तव्यासाठी देता येईल तेवढा तो आतापासूनच जर आपण दिला तर "थेंबे थेंबे तळे साचे" या म्हणीप्रमाणे आपले सत् मार्गाचे तळे निर्माण होऊन त्याचे एके दिवशी त्याचे सरोवरात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही व भगवंत प्राप्ती दूर राहणार नाही.

🕉👏🕉🙏🕉👏🕉🙏🕉