सोमवार, २६ एप्रिल, २०२१

दत्त जयंती दिनांक 08:12 1965 (वालावल आश्रम)


दत्त जयंती दिनांक 08:12 1965

संध्याकाळी प्रथम चौरंग स्वच्छ धुऊन घेतला. ज्या ठिकाणी मकर करावयाचा होता त्या ठिकाणी ठेवला. नंतर आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे चार केळीचे खांब खुराना बांधण्यात आले. तांब्याच्या तांब्यात पाच प्रकारची फळे एक) खारीक (दोन)  केळी  (३)  बेदाना (४) बदाम  (५). सुपारी व धातूचा सव्वा रुपया एवढे घालून प्रथम पांढऱ्या रंगाचे नवीन कापड चौरंगावर ठेवून त्याच्यावर घटाची स्थापना करण्यात आली.

घटाच्या तांब्यावर तांब्याची परात ठेवून त्याच्यात नारळ ठेवण्यात आला. घटाच्या समोर पाट स्वच्छ धुऊन पुसून त्याच्यावर गुरुगीता ठेवण्यात आली. नंतर गुरुगीता वाचन झाले. श्री अप्पा मास्तर यांनी गुरुगीता वाचन केले. त्याचप्रमाणे स्पष्टीकरणही केले.

तत्पूर्वी श्रीधर पोखरे यानी पादुकांची व आसनाची पूजा केली. घटस्थापना करतेवेळी पाच प्रकारची फळे ठेवण्यात आली.

आसन शेवंतीच्या फुलांनी व गुलाबानी सजविण्यात आले. गुरु गीतेची तसेच श्रीकृष्णांची मूर्ती पंचामृताने अंघोळ करून ते  तीर्थ म्हणून सर्वांना दिले.

नंतर श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घटावरील परातीत ठेवण्यात आली. आरती झाल्यावर सर्वांनी दर्शन घेतले व पूजा केली. तसेच सर्वांनी आरती ओवाळली. नंतर सर्वांना पंचामृत व सुंठवडा, केळी व प्रसाद म्हणून शिरा वडाचा पानावरून वाढण्यात आला. चहा देण्यात आला. या दिवशी वालावलच्या व बाहेरील गावच्या बऱ्याच ज्योतिनी दर्शन घेतले.

नंतर भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले. साडे नऊ ते साडे अकरा काळसेकरांचे भजन झाले. भजन झाल्यानंतर केळी, शिरा व चहा देण्यात आला.

पहाटे साडेचारला काकड आरती घेण्यात आली. 

Omkar

सद्गुरूंचे स्तवन

अमृतवाणी