मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

चाफा



*तुडवणं हे माणसाचं कर्म आहे*
*सुगंध देणं हा चाफ्याचा धर्म आहे*
*कर्माचं मोल ओळखले ज्यांनी*
*धर्म त्यांच्या रुजतो मनोमनी*
................ *_अनगड_* ..........
❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️🙏❤️

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

आत्मविश्वास.......

गुह्यत्वाचा साक्षात्कार.......

नमस्कार.......

अथांग........

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

मिरर इमेज


सुमंगल.......... सुप्रभात!!!
मिरर इमेज......... असे ज्या छायाचित्राला इंग्रजी मध्ये म्हटले जाते, ते मराठी भाषेत प्रतिबिंबीत छायाचित्र होय. हा एक त्याचाच नमुना होय.......!!!
छायाचित्रामधील एका कोपऱ्यातली गुलाबी छटा, वर हिरवा शालू, मध्येच नारिंगी, पिवळी आणि शुभ्र सफेदीची छटा, तर बाजूलाच निळाई आणि मध्येच गणेश रुपी ॐकारांचे स्थान, हे सर्व पाहिल्यावर मन बावरे होण्यास कितीसा वेळ लागणार.........!!!
चला तर मग, या रंगांच्या छटांत आपणही रंगून जाऊया व ॐकारांप्रत व त्यांच्या नामात स्थीर होण्यासाठी मार्गस्थ होऊया..........!!!

सद्गुरु वचने.......

गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०

चाफा

सुमंगल............. सुप्रभात!!!
चाफा - एक अत्यंत सुगंधी फुल. याची नांवे जशी अनेक तसेच रुपरंगही अनेक. कधी तो सोनचाफा म्हणून सापडतो, तर कधी कवठीचाफा या नावाने अवतरतो. ही भिन्नता जरी असली तरी सुगंध मात्र वेड लावणाराच असतो. त्याच्या सुगंधाचा घमघमाट असा सर्वत्र दरवळतो की इतर सुगंध त्याच्या पुढे फिक्केच ठरावेत.........!!!
असा हा सुगंधाचा धनी, जनी, मनी ठसा उमटविल्याशिवाय रहात नाही........!!!
चला तर मग आजचा आपला दिन असाच सुगंधीमय बनवूया.......आजचा आपला दिवस मंगलमय होवो....!!!