प्रवचने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रवचने लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, ९ जून, २०२०

प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                         मौलिक ठेवा
                         🙏🙏🙏
बाबा म्हणतात, "ही माया सुखदुःखाच्या व्यापाराने चालत असते." मानवाला सुख आणि दुःखहि असतातच. अगोदर म्हटल्याप्रमाणे, मनासारखे झाले की त्याला तो सुख म्हणतो आणि मनाच्या विरोधात झाले तर दु:ख म्हणतो. हा सुख दुःखाचा खेळ म्हणजेच मायेचा व्यापार होय. मायेचे कर्तव्यच मुळी हा खेळ खेळत राहणे असते.

मानवाना आज कशाची अपेक्षा असते तर जे समोर असेल ते पाहिजे. देवाकडे गेला, संताकडे गेला, ऋषी-मुनींकडे गेला, देवळात गेला तरी मानव देवाकडे मागणी काय मागतो? 

मानव मागणी एकच मागतो कि, भगवंता मला सुखच दे. माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. म्हणजेच ही माया तो मागत असतो. 

पण हे सुख कसे आहे? तर  क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, ते नश्वर आहे, अर्थात नाशिवंत आहे. ते आज आहे, तर उद्या नाही. ते कायमचे कुणाकडेही नसते. ते लाघवी, मायावी आहे.

म्हणूनच सद्गुरू माऊली पुढे विचारते, "याची जाणीव कोणी घेतली आहे का? सुख हे सदैव असते का? तर नाही. 

सुखा पाठोपाठ दुःख हे आहेच. दुःख गेल्यानंतर सुख हे आहेच. मानवी जीवनात त्या समुद्रामध्ये जशी सुकती आणि भरती असते, तशीच सुख-दु:खाची सुकती आणि भरती ही चालूच असते. 

हिच मायेची लाघवी तऱ्हा आहे. जिथे सुकती आहे, तिथे भरती आहे, अन् जिथे भरती आहे तिथे सुकतीही आहे. सर्वाभूती हे आहे परंतु तुम्हाला त्याचा अंत सापडणार नाही. 

पण ही सुखती, भरती कशामुळे होते ते तुम्हाला कळायचे नाही. त्याला कोणीतरी कारण आहेच, पण ते कारण अदृष्य आहे. सुखदुःखाचे कारण आपण म्हणतो दृष्य आहे, पण ते देखील अदृष्यच आहे......(अनगड)......

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव तेणे आत्मस्थिती जाणीतसे !! (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव
  तेणे आत्मस्थिती जाणीतसे  !!
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)

द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतूरहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टि ज्या माणसाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.

मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे, पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव  घेऊ शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो ?
अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल.

अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परिने सद्गुरू चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही.

मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वराने, अनंतानी मानवाला शक्ति दिलेली आहे. ही शक्ति सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाही असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर  सद्गुरू चरणात, सत चरणात लय असेल तर सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवतात. सद्गुरूंच्या ठिकाणी त्या ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे?

एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब  सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. ...........

पुढे चालू 2

बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

"सद्गुरूंची प्रवचनें कशासाठी असतात?


प्रवचनें ज्योतीला शुध्दत्वता करण्यासाठी
असतात.
हे प्रवचनरूपी स्नान आहे.
प्रवचन हे न्यानयुक्त प्रणवांची
आंघोळ असते. शुचि:र्भूत शुध्द
प्रणवांची आंघोळ करून तुम्ही
शुध्द व्हावे याकरीता प्रवचन असते.
कांही वेळेला अमृततुल्य प्रणव देखील
बाहेर फेकले जातात. तुमच्या मनावर
असलेली काजळी दूर करून तुम्हांला
तेजोमय बनविण्यासाठी ही प्रवचनें
असतात."
परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज
यांच्या प्रवचनातून साभार सादर.