समर्थ वाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समर्थ वाणी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ मे, २०२१

श्री समर्थ वाणी

गुरुवार दिनांक 19 मे 1960

श्री समर्थांचे बोल
मन आणि माया

माया म्हणजे काय? हे कोणी पाहिले आहे काय? माया म्हणजे स्वयम् पद आणि त्या स्वयम् पदाचा प्रकाश. त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तू पाहून त्याला वागतो आणि जे जे दृष्टीस पडले ते ते मिळवण्याचा प्रयत्न करतो. 

ज्या प्रकाशात अमूल्य वस्तू दिसत आहे, त्या वस्तू पासून आपले संरक्षण होईल अशी मानवाची भावना, म्हणून ती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात.

अमूल वस्तू खरी. परंतु ती पासून पुढे काय होईल? याचा विचार नाही, त्याला माया म्हणतात. 

माया कोठून आली? हे हि त्याला समजत नाही. मायेला हे कळत नाही की मी कुठून आले? 

ज्योत आणि प्रकाश एकमेकावर अवलंबून आहेत. हे काही
सेवेकर-याना कळत नाही, म्हणून एखाद्या सेवेक-याला त्याची जाणीव नाही. म्हणून कोणी कोणाला लहान-मोठा म्हणू नये. याचा अर्थ भक्ती आहे.

मान-अपमान, संशय, कल्पना रहित भक्ती आहे. सेवेकर्‍याने मानापमानाचे गाठोडे जवळ बाळगले तर त्याच्या भक्तीला किंमत शून्य आहे. जो सेवेकरी एकदा ज्या पदाला शरण, त्याच पदाला परिपूर्ण सर्व अर्पण करणे, त्या ठिकाणाचा अंत घेणे, तेच ठिकाण सर्वस्वाचे निदान आहे असे समजावयास पाहिजे. मग तर त्याला पुढचा मार्ग सोपा जातो. 

हेच त्याला कळत नाही तो सेवेकरी नाही अगर शिष्यही नाही. स्वरूपाची ओळख करून घेतली हेच श्रेष्ठ होईल. ही ओळख कोणी करून घेतली आहे काय? 

ग्रंथ वाचून किंवा ओव्या वाचून अशाने दर्शन होत नाही, कळायचे नाही. मानवाने स्वतःच्या कृतीतच मनोवृत्तीचे दर्शन करावयास पाहिजे. 

मी कोणीतरी आहे, हे म्हणणे साफ चुकीचे आहे. जर तु कोणीतरी आहेस, तर तुझ्या हातून चूक झाल्यानंतर तुला आधार काय? मग तू का उठाठेव करतोस? तुला त्या जड देहाची शुद्धी, त्याची ओळख असती, तर तू मी म्हणणारा कोण? सर्वस्वाचे स्पष्टीकरण होवूं शकत नाही. 

समर्थ वाणी