शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

गीता 1

असे म्हटले जाते की अठरा दिवसांच्या महाभारत युद्धामध्ये त्या काळातील 80 टक्के पुरुषांचा नाश झाला.

कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या अखेरीस जेथे हे महाभारताचे युद्ध घडले तेथे संजय गेला. त्याने जेव्हा सभोवती पाहिले, तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की खरेच युद्ध झाले होते कां? कारण जेथे पांडव आणि कृष्ण ऊभे होते तेथील पायाखालील जमिनीने सांडलेले सर्व रक्त गिळंकृत केलेले होते. रक्ताच्या एका थेंबाचा देखील तेथे मागमूस नव्हता.
तेवढ्यात एका वयस्कर भारदस्त मागून आलेल्या आवाजाने संजय चकीत झाला. तो म्हणत होता, "संजया! तुला सत्य काय ते कधीच कळणार नाही."

धुळीच्या लोटातून बाहेर येणाऱ्या भगवी वस्त्रे धारण केलेल्या त्या पाठीमागून आलेल्या आवाजाच्या दिशेने संजय फिरला.

रहस्यात्मक रित्या तो वृद्ध संजयला म्हणाला,"तू येथे कुरुक्षेत्राच्या युद्धाबद्दल जाणून घेण्यासाठी आला आहेस, परंतू त्याबद्दल तुला काहीच कळणार नाही, जोपर्यंत खरे युद्ध काय होते हे तुला कळणार नाही."

ह्याचा अर्थ काय?

महाभारत हे महाकाव्य आहे, तो एक पोवाडा आहे, ते एक सत्य आहे, परंतु त्याचबरोबर ते एक तत्वज्ञान देखील आहे.

तो वृद्ध हसला आणि संजयाकड़ून आणखी प्रश्न येण्याची वाट पाहू लागला. संजय म्हणाला, "मला एक सांगा मग ह्यातील तत्वज्ञान ते कोणते?"

वृद्ध म्हणाला, "ठिक आहे." पांडव म्हणजे दुसरे काही नसून, तुझी पाच इंद्रिये होत. दृष्टी किंवा दृष्टिकोन, गंध ज्ञान, चव, स्पर्श ज्ञान, ध्वनी ज्ञान ही ती पाच इंद्रिये.

आणि तुला माहितीय का, "कौरव" म्हणजे कोण?
कौरव म्हणजे आपल्यात असणारे शंभर अवगुण किंवा दुर्गुण, जे आपल्या ह्या पाच इंद्रियांवर रोजच हल्ला करीत असतात.
हे जरी खरे असले, तरी तू त्यांच्याबरोबर दोन हात करू शकतोस......माहितीय का कसे?

संजया ने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

कृष्ण तुझे सारथ्य करतो तेव्हा. तो वृद्ध हसला आणि संजय त्याच्याकडे "आ" वासून बघतच राहिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: