बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

सुमनाचे मनोगत

सुमन - शब्द किती सोपा, अर्थही सोपेच. फुलाला सुमन देखील म्हटले जाते आणि "सु मन" म्हटल्यावर त्याचा अर्थ चांगले मन देखील होतो. तर अशा ह्या "सुमनाने" म्हणजे फुलाने ठरविले की आपण नेहमी भगवंताच्या गळ्यात मिरविण्यापेक्षा भगवंताच्या चरणावरच स्थिर कां होवू नये? गळ्यात तर सगळेच पडतात, चरणांवर स्थिर कोणी व्हावयाचे? आणि असा विचार मनात येताच "सु-मनच" ते चक्क भगवंताच्या चरणांवर माथा टेकते झाले.

भगवंताच्या चरणांची महती वेगळी सांगायची गरज नाही. जे चरणात आहे, ते इतर कोणत्याही ठिकाणी सापडणार नाही. जो भक्त त्या सताच्या चरणात लिन झाला आहे, त्याला काय कमी आहे? सत् चरण सापडणे कठीण आणि जर कां ते आपल्याला सापडले तर टिकविणे त्याहून कठीण. मग "सुमना"चे "सु-मनाने" जो विचार केला तो यथायोग्यच नाही काय?

तर भक्तगण हो, चला तर आपणही आपल्या सताच्या चरणांवर माथा टेकवूया आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करूया. सत् चरणात रत होऊ या, त्या सुमनासारखे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: