सताने आपणा सर्वंस्वाना स्वयंस्थितीत घेतले. अन आपुले कर्तव्य यथायोग्य केले. परंतु सेवेकऱ्याकडून ती स्थिती पूर्णत्व होत नाही. राजमार्ग सताने आपणास प्रदान केलेला आहे पण तो राजमार्ग कसा आक्रमीता येईल हे तुम्हास अवगत नाही. एकदा का सताने प्रणव दिधला, त्या प्रणवात पूर्णत्व मग्न होऊन जो कर्तव्य करीतो त्याच्याकडून असे प्रणव येणार नाहीत. परंतु कलीयुगी स्थिती हेच प्रणव आपणाकडून मजला मिळतात. लक्षात घ्या कलीयुगातच सत कर्तव्य करीत होते. सताच्या प्रणवात कधी कमतरता होती का? एकदा का सताने प्रणव दिधले ते पूर्णत्व सिध्द होईलपर्यंत सत कधी शांत राहिले नाही. अशा सताचे आपण सेवेकरी आहात. राजमार्ग आपणास दिधलेला आहे. अन त्याची आक्रमिता आपणास करावयची आहे. याकरीता प्रथम मानवाची मती शुद्ध पाहिजे. शुद्ध मतीने, आचार, विचार येणे वृत्ती! मनापासून ज्याची वृध्दी होते ती कोण तर बुध्दी! जर ती शुध्द असेल तर सताने दिधलेला राजमार्ग आपण आक्रमित जालं. पण बुध्दीच जर शुद्ध नसेल तर कसे होईल. अनेक अडचणी येतील. म्हणून सत प्रणवाप्रमाणे सेवेकऱ्याने आपली बुध्दीमत्ता, मननता, मन कसे ठेवले पाहिजे? सतशुध्द ठेवले पाहिजे. पहा मन सतशुद्ध असेल तर सर्वसे सतशुध्द आहे. त्या मन सतशुध्द्तेतून बुध्दीची स्थिती होते. अन त्याप्रमाणे जर मानव कर्तव्य करु लागला तर त्याला कोठेही अडचण येणार नाही. आपण माझ्या सताचे सेवेकरी आहात, ते सतशुध्दतेनेच गेले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा