बुधवार, १४ मार्च, २०१८

*आनंद सागरात प्रेमे बूडी दिधली |* *लाभले सौख मोठे, नये बोलता बोली||*

आपण iसत चरणाप्रत आलात ही आनंद स्थिती येणे आनंद सागरच आहे ना! या स्थितीत आपणास काय बहाल केले आहे, भक्ति बहाल केली आहे. अन भक्तीच्या महासागरात आपण सामावलेले आहात का? तुम्ही मायावी महासागरातच बुडी दिधली आहे. जो आनंद महासागरात बुडी घेईल ते सुख येणे शांतता अन संयमाने पूर्ण बहरून जाईल. परंतु मायावी सागरात बुडी घेणारा असा बहरून जाईल का? नाही. सताने भक्तीच्या महासागरात तुम्हाला आणून सोडले आहे. परंतु आपण परीपूर्ण भक्तियुक्त झाला आहात का? नाही. जर आपण भक्तीने परीपूर्ण झाला नाहीत मग आपणास आनंद महासागराची कल्पना येणार नाही. तर त्या आनंद महासागराची कल्पना घेण्यासाठी काय केले पाहिजे? तर भक्तीच्या महासागरात डुंबत राहिले पाहिजे. परंतु हे होत नाही. याला कारण मायावी स्थिती. माया कोणाला नाही. माया सर्वस्वाना आहे. परंतु आद्य कर्तव्य जे आपण विसरतो तेंव्हाच आपुली अशी स्थिती होते. मानवी स्थितीप्रमाणे तुम्ही प्रणव सताप्रत देत आहात. सत ते प्रणव ग्रहण करतें अन प्रणव ग्रहन करून तुम्हास सुख शांती प्राप्त करून देते. अरे! ही देखील मायाच नव्हे का? माया येणे प्रेम. ही सत सात्विक माया, अन अशा या सात्विक स्थितीचे आपण सेवेकरी आहात. मग आपण कशात डुंबुन राहायचे? भक्ति अन नामस्मरणात डुंबुन रहावयास पाहिजे का मायेत? मग आपणाकडून असे प्रणव का येतात? मानवी स्थितीप्रमाणे जर सर्वस्व शुद्ध असेल तर अशी चूक होणार नाही. जर आनंद सागरात आपण डुंबत राहिला असतात तर असे प्रणव आले नसते. सत प्रणवाप्रमाणे भक्तीच्या सागरात येणे भक्तिमध्ये डुंबले पाहिजे. म्हणजे या मोहमायेपासून आपणास मुक्तता मिळेल. ज्या भक्ताने भक्तीच्या स्थितीने प्रेमाने आपणास सामाऊन घेतले त्याला सुखाची दु:खाची कमतरता येइल का? दु:ख त्याच्याजवळ येउ शकेल का? त्याच्यापासून सुख दूर जाउ शकेन का? नाही. शांतता, संयमता तेथे  पूर्णत्व राहील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: