सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२


विठ्ठल वाणी

विठ्ठलाना जेव्हा दरबारात आषाढी एकादशीच्या शुभदिनी बोलाविण्यात आले होते, तेव्हा त्यांनी काढलेले हे उद्गार आहेत.

ते म्हणतात, आपण सेवेक-यानी, जागृतावस्थेत आपल्या ध्यानात, मनात तसेच निद्रित अवस्थेत म्हणजेच झोपेत सुद्धा जे काही कर्तव्य करावयाचे आहे, ते कर्तव्य सताचेच करावयाचे आहे. याचाच अर्थ असा की आपण सद्गुरुंचे सतत नामस्मरण करावयाचे आहे. त्यांना कदापिही विसरायचे नाही. नामस्मरण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे ह्याची परिपूर्ण जाणीव ठेवायची आहे.


पुढे ते म्हणतात, सताने हा जो मानवी देह सर्वस्वाना दिधला आहे, तो परिपूर्ण मानवी कर्तव्य करून म्हणजेच आपले दैनंदिन मायावी कर्तव्य करून सुद्धा त्यातूनही वेळात वेळ काढून भक्ती करण्यासाठी दिधला आहे, याची जाणीव संत - महंताना परिपूर्ण होती, तशीच ती आपणही ठेवून, आपले कर्तव्य पार पाडावयाचे आहे आणि अशा प्रकारे जर आपण आपले कर्तव्य पार पाडले, तर तो सुदिन दूर नाही, जेव्हां आपले सत् आपणास दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत.

ज्या दिनी आपणास सताचे दर्शन घडेल, तोच आपला मुक्ती आणि मोक्षाचा दिन असेल..

..............................

.......अनगड.....


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: