सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२


मायेचे कर्तव्य स्थुल सुटेपर्यंत संपणारच नाही हे पितामहांचे बोल सत्यच होय. 


स्थूल म्हणजे हा मानवी देह. देह आला की अनंतांचा अंश आला आणि त्यांच्या बरोबर त्यांची माया देखील आली. कारण स्थुल आले की माया आली. स्थुलाला सोडून माया नाही. 


माया म्हणजे हा संसार. संसार म्हणजे सगुणाचा सार! यामध्ये देह आला. देहाबरोबर मन आले. मनाबरोबर स्वत्व आले. स्वत्वा बरोबर अहं आला. अहं आला म्हणजे भांड आला. माझे तुझे आले. हे मायेचे असे गोल गोल फिरणारे दुष्टचक्र सतत चालूच असते.


तेव्हां पितामह म्हणतात, "ह्या सांसारिक मायेच्या दुष्टचक्रा पासून जर आपली सुटका करून घ्यावयाची असेल, तर आपणाला एक साधा सरळ उपाय भगवंताने प्राप्त करून दिला आहे, तो म्हणजे "नामस्मरण" करणे."


पितामह म्हणतात, "पण त्यातूनही वेळात वेळ काढून, (आपण जर आपल्या सताचे, आपल्या सद्गुरुंचे, आपल्या भगवंताचे) "अखंड नामस्मरण" येणे "अखंड चिंतन" केले तर आपणावर 

सताची कृपा होऊन जी आपली क्लेशात्मक स्थिती आहे ती दूर जाईल, ती नाश पावेल, तिचा नाश होईल.


एकदा का क्लेशात्मक स्थितीचा, आपल्या मायावी अडचणींचा नाश झाला की मग आपल्याला, आपल्या होणाऱ्या प्रगतीला कोण रोखू शकणार? आपला अनंताप्रत जाण्याचा मार्ग खुलाच झाला ना? 

           चला तर, 

           करुया सताचे नामस्मरण

           अन्तरी पाहूया सद्गुरुंचे चरण !!

           पाहता अंतरी चरण सद्गुरुंचे

           पार होतील भवसागर मायेचे !!!

......................................................

..............अनगड...........


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: