Sadguru Darbar - सद्गुरू दरबार Dedicated to my beloved Sadguru Param Pujya Shri Sadguru Swami Bhagwan Maharaj. माझे परम् पूजनीय श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांच्या चरणकमलावर सविनय सादर समर्पित.
मंगळवार, ४ मे, २०२१
रविवार, २ मे, २०२१
श्री समर्थ वाणी
गुरुवार दिनांक 19 मे 1960
श्री समर्थांचे बोल
मन आणि माया
माया म्हणजे काय? हे कोणी पाहिले आहे काय? माया म्हणजे स्वयम् पद आणि त्या स्वयम् पदाचा प्रकाश. त्या प्रकाशाला माया म्हणतात. म्हणजे ज्योत आणि ज्योतीचा प्रकाश त्या प्रकाशात स्थूल मानव पाहतो. तू पाहून त्याला वागतो आणि जे जे दृष्टीस पडले ते ते मिळवण्याचा प्रयत्न करतो.
ज्या प्रकाशात अमूल्य वस्तू दिसत आहे, त्या वस्तू पासून आपले संरक्षण होईल अशी मानवाची भावना, म्हणून ती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात.
अमूल वस्तू खरी. परंतु ती पासून पुढे काय होईल? याचा विचार नाही, त्याला माया म्हणतात.
माया कोठून आली? हे हि त्याला समजत नाही. मायेला हे कळत नाही की मी कुठून आले?
ज्योत आणि प्रकाश एकमेकावर अवलंबून आहेत. हे काही
सेवेकर-याना कळत नाही, म्हणून एखाद्या सेवेक-याला त्याची जाणीव नाही. म्हणून कोणी कोणाला लहान-मोठा म्हणू नये. याचा अर्थ भक्ती आहे.
मान-अपमान, संशय, कल्पना रहित भक्ती आहे. सेवेकर्याने मानापमानाचे गाठोडे जवळ बाळगले तर त्याच्या भक्तीला किंमत शून्य आहे. जो सेवेकरी एकदा ज्या पदाला शरण, त्याच पदाला परिपूर्ण सर्व अर्पण करणे, त्या ठिकाणाचा अंत घेणे, तेच ठिकाण सर्वस्वाचे निदान आहे असे समजावयास पाहिजे. मग तर त्याला पुढचा मार्ग सोपा जातो.
हेच त्याला कळत नाही तो सेवेकरी नाही अगर शिष्यही नाही. स्वरूपाची ओळख करून घेतली हेच श्रेष्ठ होईल. ही ओळख कोणी करून घेतली आहे काय?
ग्रंथ वाचून किंवा ओव्या वाचून अशाने दर्शन होत नाही, कळायचे नाही. मानवाने स्वतःच्या कृतीतच मनोवृत्तीचे दर्शन करावयास पाहिजे.
मी कोणीतरी आहे, हे म्हणणे साफ चुकीचे आहे. जर तु कोणीतरी आहेस, तर तुझ्या हातून चूक झाल्यानंतर तुला आधार काय? मग तू का उठाठेव करतोस? तुला त्या जड देहाची शुद्धी, त्याची ओळख असती, तर तू मी म्हणणारा कोण? सर्वस्वाचे स्पष्टीकरण होवूं शकत नाही.
शनिवार, १ मे, २०२१
शुक्रवार, ३० एप्रिल, २०२१
गुरुवार, २९ एप्रिल, २०२१
बुधवार, २८ एप्रिल, २०२१
सोमवार, २६ एप्रिल, २०२१
दत्त जयंती दिनांक 08:12 1965 (वालावल आश्रम)
दत्त जयंती दिनांक 08:12 1965
संध्याकाळी प्रथम चौरंग स्वच्छ धुऊन घेतला. ज्या ठिकाणी मकर करावयाचा होता त्या ठिकाणी ठेवला. नंतर आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे चार केळीचे खांब खुराना बांधण्यात आले. तांब्याच्या तांब्यात पाच प्रकारची फळे एक) खारीक (दोन) केळी (३) बेदाना (४) बदाम (५). सुपारी व धातूचा सव्वा रुपया एवढे घालून प्रथम पांढऱ्या रंगाचे नवीन कापड चौरंगावर ठेवून त्याच्यावर घटाची स्थापना करण्यात आली.
घटाच्या तांब्यावर तांब्याची परात ठेवून त्याच्यात नारळ ठेवण्यात आला. घटाच्या समोर पाट स्वच्छ धुऊन पुसून त्याच्यावर गुरुगीता ठेवण्यात आली. नंतर गुरुगीता वाचन झाले. श्री अप्पा मास्तर यांनी गुरुगीता वाचन केले. त्याचप्रमाणे स्पष्टीकरणही केले.
तत्पूर्वी श्रीधर पोखरे यानी पादुकांची व आसनाची पूजा केली. घटस्थापना करतेवेळी पाच प्रकारची फळे ठेवण्यात आली.
आसन शेवंतीच्या फुलांनी व गुलाबानी सजविण्यात आले. गुरु गीतेची तसेच श्रीकृष्णांची मूर्ती पंचामृताने अंघोळ करून ते तीर्थ म्हणून सर्वांना दिले.
नंतर श्रीकृष्णाची मूर्ती स्वच्छ पुसून घटावरील परातीत ठेवण्यात आली. आरती झाल्यावर सर्वांनी दर्शन घेतले व पूजा केली. तसेच सर्वांनी आरती ओवाळली. नंतर सर्वांना पंचामृत व सुंठवडा, केळी व प्रसाद म्हणून शिरा वडाचा पानावरून वाढण्यात आला. चहा देण्यात आला. या दिवशी वालावलच्या व बाहेरील गावच्या बऱ्याच ज्योतिनी दर्शन घेतले.
नंतर भजनांचे कार्यक्रम ठेवण्यात आले. साडे नऊ ते साडे अकरा काळसेकरांचे भजन झाले. भजन झाल्यानंतर केळी, शिरा व चहा देण्यात आला.
पहाटे साडेचारला काकड आरती घेण्यात आली.

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)