शुक्रवार, २१ मे, २०२१

आठवणी


फोटो कोलाजमध्ये सुरूवातीला LOOKING BACK आणि MOVING FORWARD ह्या थिमची (विषय विशेष) ची योजना करण्यात आलेली आहे. 

पाठीमागे वळून बघत असताना आलेले अनुभव लक्षात ठेवून पुढील जीवन यात्रेची मार्गक्रमना करावयाची आहे, हे नित्य ध्यानात ठेऊन वाटचाल करायची आहे, मग त्यामध्ये कितीही अडचणी येवोत. यामध्ये आपल्या श्री सद्गुरू माऊलींचा सतत लक्ष आपल्यावर आहे हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवावयाचे आहे, ही त्यामागची भावना असून, तिला या चित्रातून व्यक्त करण्यात आलेले आहे.

मंगळवार, १८ मे, २०२१

आठवण एक साठवण


श्री सद्गुरू भंडारा शुभदिन, वालावल, सिंधुदुर्ग

        आजच्याच दिनी, 18 मे 2018 (गुरूवार), आपला श्री सद्गुरू भंडारा शुभदिन मोठ्या उत्साहात व आनंदाने श्री सद्गुरू माऊली कृपेने साजरा करण्यात आला होता. 
         ह्या शुभदिनी, आश्रमाच्या सभोवतालचा आसमंत भगव्या रंगात न्हाऊन निघाला होता. भगवा रंग हा त्याग, बलिदान, ज्ञान, शुध्दता व सेवेचे प्रतिक मानला गेला आहे आणि आपल्या श्री सद्गुरू माऊलिंनी देखील आपणांस ज्ञानोपसनेद्वारे त्याग, बलिदान, शुध्दत्वता व सेवा यांचेच आपल्या प्रवचनांद्वारे अखंड असे मार्गदर्शन केले होते, जे आजही आम्हा पामरांना दिपस्तंभासारखे ह्या भवसागरात तारून नेत आहे.
           ह्याच सर्व पार्श्वभूमीवर चित्रातील निळ्या रंगाची लकेर आपणांस, हा रंग आकाश आणि पाण्याचा रंग असल्याची आठवण करून देत, आपल्यातील अविचलपणाचे वैशिष्टय़ जपण्याची शिकवण देत आहे. हे जसे खरे, तसेच हा रंग विश्वासाचं देखील प्रतीक आहे. 
          ह्या दोन रंगाच्या मध्यभागी खुलून उठलेला आपला हा वालावल आश्रम छायाचित्रामध्ये अतिशय दिमाखदार पध्दतीने उतरविण्यात आपलेच एक गुरूबंधू श्री आदेश माधवी अशोक पीसी हे यशस्वी झालेले आहेत. (अनगड)