सोमवार, १० सप्टेंबर, २०१८

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

*रामविजय : जय जय रघुवीर समर्थ*

आर्यवर्तात पूर्वी शाळा नसून गुरूकुले होती. त्यांचेपैकी काहींचे गुरू वशिष्टमुनीं होते. तेथे उच्च, नीच, श्रीमंत, गरीब, ब्राम्हण, क्षत्रिय असा भेदभाव नव्हता. मानव हीच जात व अवतार - स्त्री, पुरुष. फक्त शुध्द अशुद्ध ते पहात.

वशिष्ठ गुरूकुलामध्ये ते शिक्षण घेत होते. वशिष्ठांनी सुध्दा यांना 'योगवाशिष्ठ ' शिकविले.

आपण तन, मन, धन अर्पण करतो, ते करणारे फार निराळे आहेत. रूढी प्रमाणे सेवेकरी तिन्ही अंगाने शरण जायला पाहिजे.

सद्गुरु हे स्वयंमेव पद आहे. हे पद शिष्याला टिकवावे लागते.

दशरथ हे वयस्थ झाले तेव्हा राम हे राज्याधिपती होण्यास लायक होते. वशिष्ठांना सर्व माहित होते, पण ते सांगत नव्हते.

कैकयी शुध्द सात्विक ज्योत होती. मंथरा तीची दासी होती. मंथरेने कैकयीला सांगितले रामाला राजपद मिळाले तर भरताचे काय? राम आपल्या मातेला न भेटता सावत्र आईला प्रथम भेटत असत.

परंतु अनंताना माहित होते व त्यांना पूढे घडवायचे होते. कैकयीने दशरथांना बोलावले. कैकयी ही दशरथांची लाडकी होती. तीने फसवून वर मागीतले. ते ऐकून दशरथ बेहोष पडला.

पहिला वर भरताला राज्य व दुसरा वर रामाला वनवास. दशरथ राजा मुर्च्छा येऊन पडला. त्याचे रामावर जास्त प्रेम होते. पण धन्य ते राम! त्याबद्दल त्याना काहीच वाटले नाही. रामाच्या कानावर आले तेंव्हा ते गहिवरून कैकयीला म्हणाले, *"माते भरताला राज्यावर बसव."* पण वडीलांची ही तऱ्हा. त्यावेळी कैकयी शुद्धीवर आली. ते म्हणाले तुमच्या आदेशाने मी चौदा वर्षे फिरून येतो.
                                (क्रमश:) 27 ऑगस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: