कृष्णांची शिष्ठाई संपल्यानंतर, ते चालले असताना कृष्णांना भूक लागली. पण कृष्ण नात्याने दुर्योधनाकडे वा धर्माकडे न जाता विदूराकडे गेला. हा गरीब होता. (शुध्द साधी ज्योत) कृष्ण त्याच्या घरी आले. तेव्हा विदूर कासावीस झाला. कारण त्यांना मी काय देणार?
परंतु विदूर सत् होते. अन्न घ्यायचे ते सताच्या घरी. त्यावेळी विदुराला परमानंद झाला. विदूर म्हणाले, "या वेळी माझ्या घरी काही नाही." पण कृष्ण म्हणाले, "त्या कण्या आहेत की!"
*विदूरा घरच्या भक्षुणी कण्या*
नंतर कण्यांची पेज पत्रावळीचा द्रोण करून त्यातून खात असताना कृष्ण म्हणाले, "आज मी अमृत प्यायलो. परंतु विदूर म्हणाला परमेश्वराला पेज द्यावी! तेव्हा कृष्ण प्रेमाने म्हणाला, विदूरा तू वाईट वाटून घेऊ नकोस. मी एका हाताने जेवतो. पण तुझ्यासाठी चार हातानी द्रोण केला, तू धन्य आहेस. असे हे कृष्ण सताचे कैवार घेणारे आहेत. कौरवांनी कपटे केली. पांडवाना बारा वर्षे वनवासात पाठवली, वनवासात सुद्धा असताना दुर्योधनाने दुर्वास मुनींना सात - आठसे शिष्यांना घेऊन द्रौपदीकडे जेवणासाठी पाठविले. त्यावेळी अथितीचा आदर सत्कार केला जात असे. दुर्वास द्रौपदीकडे आले परंतु बुध्दी असताची होती. ते सर्व जेवण आटोपल्यानंतर आले तेंव्हा द्रौपदीला भीती वाटली. यांना आता जेवण कुठचे द्यायचे? पण दुर्वास ठणकावून म्हणाले, *"आम्ही गंगास्नान करून येतो, तो पर्यंत जेवणाची तयारी कर."* ती होय म्हणाली, पण तीला आठवण झाली सूर्याने दिलेली थाळी तीने धुऊन ठेवली होती. अशावेळी शांतपणे तीने कृष्णाचा धावा केला. तेव्हा कृष्ण हजर झाले. तीने सर्व हकीगत सांगितली. कृष्णाला सुद्धा पेच पडला कृष्ण म्हणाले, अग, पण द्रौपदी तुझ्याजवळ थाळी आहे ना? पण त्या थाळीला डाळीचा एक कण लागला होता. कृष्णांनी चावी फिरवली. तेव्हा प्रत्येक जण पाण्यातच ढेकर द्यायला लागले. त्यांनी ध्यान करून तेथे कृष्ण असल्याचे पाहिले. व तेथून पळून गेले. भगवंत ज्या ठिकाणी आहेत तेथे कमतरता होऊ शकेल काय? आपल्या भक्ताची बुध्दी कोती तर भगवंत त्याला कोते देतात. पण बुध्दी विशाल असल्यास भगवंत सुद्धा विशाल! भक्ताची लाज त्यांनीच राखली. असे ते करून अकर्ते आहेत.
(क्रमश:) 23 ऑगस्ट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा