शुक्रवार, ७ सप्टेंबर, २०१८

रामविजय : जय जय रघुवीर समर्थ|

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी*

दशरथ राजाच्या कुटुंबाचे कुलगुरू वशिष्ठ ऋषी! दशराथाचे वडील दिलीप. साक्षात परमेश्वर कौशल्येच्या उदरी जन्म घेणार हे माहित नव्हते. पण वशिष्ठांना हे माहित होते. परमेश्वर सुद्धा पाहतात कि ज्याच्या उदरी, कुशीत जन्म घ्यायचा ती भूमी शुध्द पाहिजे. यज्ञ केल्यावर पितामहांनी पिठाचे पिंड केले. पिंडामुळे पुत्रप्राप्ती झाली. म्हणजेच त्या पिंडात आव्हान करून शक्ति निर्माण केली. परमेश्वराच्या संधीने भाग केले. परंतु एक भाग घारीने नेला तो अंजनीने भक्षण करून मारूतीचा जन्म झाला.

स्वरूप, कांती, सतेज, दैदीप्यमान ज्योत म्हणजेच राम! परंतु कौशल्या अभिमानी नव्हती. माझे, तुझे तिच्याजवळ नव्हते. राम पूर्णात पूर्ण होते. शीतल, शांत, धीर गंभीरतेने जाणारी दयाघन ज्योत होती.

प्रभु रामचंद्र म्हटले कि आल्हाद वाटतो. शुध्द स्फटिकासारखा, सतेज, बुध्दीमान होता. बुध्दीवान होते साक्षात क्षिराब्धीच ते! सातव्या अवतारात शेष हा लक्ष्मण होता.

राम पितृ व मातृ भक्त होते. त्यांनी सावत्र आईला सुध्दा दुखावले नाही. ज्याचे वर्तन शुध्द आणि शीतल तोच सद् वर्तनी, शुद्ध शुचि:र्भूत. अविनाशी ममतेने व प्रेमळपणाने राहत असत. नितांत आदरणीय असे लहानाचे मोठे होऊ लागले.
                              (क्रमश:) 26 ऑगस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: