मंगळवार, ९ जून, २०२०

प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                         मौलिक ठेवा
                         🙏🙏🙏
बाबा म्हणतात, "ही माया सुखदुःखाच्या व्यापाराने चालत असते." मानवाला सुख आणि दुःखहि असतातच. अगोदर म्हटल्याप्रमाणे, मनासारखे झाले की त्याला तो सुख म्हणतो आणि मनाच्या विरोधात झाले तर दु:ख म्हणतो. हा सुख दुःखाचा खेळ म्हणजेच मायेचा व्यापार होय. मायेचे कर्तव्यच मुळी हा खेळ खेळत राहणे असते.

मानवाना आज कशाची अपेक्षा असते तर जे समोर असेल ते पाहिजे. देवाकडे गेला, संताकडे गेला, ऋषी-मुनींकडे गेला, देवळात गेला तरी मानव देवाकडे मागणी काय मागतो? 

मानव मागणी एकच मागतो कि, भगवंता मला सुखच दे. माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. म्हणजेच ही माया तो मागत असतो. 

पण हे सुख कसे आहे? तर  क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, ते नश्वर आहे, अर्थात नाशिवंत आहे. ते आज आहे, तर उद्या नाही. ते कायमचे कुणाकडेही नसते. ते लाघवी, मायावी आहे.

म्हणूनच सद्गुरू माऊली पुढे विचारते, "याची जाणीव कोणी घेतली आहे का? सुख हे सदैव असते का? तर नाही. 

सुखा पाठोपाठ दुःख हे आहेच. दुःख गेल्यानंतर सुख हे आहेच. मानवी जीवनात त्या समुद्रामध्ये जशी सुकती आणि भरती असते, तशीच सुख-दु:खाची सुकती आणि भरती ही चालूच असते. 

हिच मायेची लाघवी तऱ्हा आहे. जिथे सुकती आहे, तिथे भरती आहे, अन् जिथे भरती आहे तिथे सुकतीही आहे. सर्वाभूती हे आहे परंतु तुम्हाला त्याचा अंत सापडणार नाही. 

पण ही सुखती, भरती कशामुळे होते ते तुम्हाला कळायचे नाही. त्याला कोणीतरी कारण आहेच, पण ते कारण अदृष्य आहे. सुखदुःखाचे कारण आपण म्हणतो दृष्य आहे, पण ते देखील अदृष्यच आहे......(अनगड)......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: