"मुक्ती आणि मोक्ष"
हेच असे सगळ्यांचे लक्ष्य |
ते मिळते फक्त
होता दर्शन सद्गुरू चरणांचे ||
🕉🙏🌷🌺☘🙏🕉
Sadguru Darbar - सद्गुरू दरबार Dedicated to my beloved Sadguru Param Pujya Shri Sadguru Swami Bhagwan Maharaj. माझे परम् पूजनीय श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांच्या चरणकमलावर सविनय सादर समर्पित.
जया अंगी नाही द्वैत अद्वैत भाव
तेणे आत्मस्थिती जाणीतसे !!
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)
द्वैत म्हणजे हेतू, अद्वैत म्हणजे हेतूरहीत, अशी जी ज्योत असेल ती आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकते. अशी ज्योत आत्मस्थिती अनुभवते. अशी दृष्टि ज्या माणसाच्या मनाजवळ आहे तोच अशा आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकतो. अशी स्थिती जाणून घेऊ शकतो.
मानव आत्मज्ञानी होईल हे मान्य आहे, पण हेतूरहीत केव्हा होईल? हेतूरहीत झाल्याखेरीज मानव आत्मस्थितीचा अनुभव घेऊ शकणार नाही. पण मानव हेतूरहीत कधी होऊ शकतो ?
अहंकार रहित झाल्यानंतर मानव हेतूरहीत होऊ शकेल.
अहंकार हा हेतूचा सर्वात मोठा आसरा आहे, शत्रू आहे, रिपू आहे. मग हा अहंकार नष्ट करण्याकरीता मानवाने काय केले पाहिजे? मन सर्वस्व परिने सद्गुरू चरणांवर अर्पण केलेले असेल अशा मानवाला काही अवघड नाही.
मानवावर अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात. परमेश्वराने, अनंतानी मानवाला शक्ति दिलेली आहे. ही शक्ति सर्वत्र भरून उरलेली आहे. ते नाही असे कोणतेही ठिकाण नाही. ज्योत जर सद्गुरू चरणात, सत चरणात लय असेल तर सद्गुरू त्या ज्योतीला कोणत्याही प्रसंगातून सोडवतात. सद्गुरूंच्या ठिकाणी त्या ज्योतीने सर्वस्व वाहणे आवश्यक आहे. मन बाकी ठेवून जर सद्गुरू चरणांवर बाकीचे अर्पण केलेले असेल तर त्याचा काय उपयोग आहे?
एखादी ज्योत नामस्मरणात लय असेल, सद्गुरूंच्या ध्यानात सदैव मग्न असेल, सद्गुरूंच्यात तादाम्य पावलेली असेल तर त्याला ताटकळत ठेवणार नाहीत. प्रसंगातून त्याला ताबडतोब सोडवतील. तो सेवेकरी म्हणतो, "सता आपल्या चरणांवर मी सर्वस्व अर्पण केले आहे. ...........
पुढे चालू 2
प्रभातिचा शुभारंभ करूया
घेऊनी तुझे नाम सद्गुरू राया
वंदन करीतो मी तुजला
पडतो तुझीया मी पाया........
जवळपास करण्यासाठी माया
का घालवितो वेळ माझा मी वाया?
रमण्या ऐवजी नामात तुझीया
झिजवितो मायेत, मी माझी काया
फरफटवितो मजला जमविण्या,
कवडीमोल ती माया
आयुष्याचा दवड़ीतो अमुल्य वेळ,
जवळ करण्यात नश्वर अशी ती माया
नाम तुझीये न घेता सुप्रभाती
घेतो मोबाईल मी हाती
रमून जातो त्यातच
फेसबुक आणि व्हाॅटस् अपच्या सांगाती
................मयुर तोंड़वळकर............
✨🌹 ✨🌹 ✨🌹 ✨🌹 ✨🌹
*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*
*सद्गुरू ही पर्दा दूर हटावे।*
*सद्गुरू से पाईये सच्चा प्यार,*
*सद्गुरू से मिलता मोक्ष द्वार।*
*अन्त समय जो सद्गुरू को ध्याता,*
*यम न खोले उस का खाता*
*सद्गुरू को करिये वंदना भाव से बारंबार ,*
*नाम सुनकर किया जिस ने भवसागर पार*
👏👏👏👏👏 👏👏👏 👏👏👏
*सद्गुरू बिन मार्ग कौन दिखावे*
*सद्गुरू ही पर्दा दूर हटावे।*
सद्गुरू हे साऱ्या जगतातील एकच असे
तत्व आहे जे सगळ्याना सत् मार्ग दाखवून त्या
अनंता प्रत आपल्याला घेऊन जातात,
सद्गुरूच मायेचा पर्दा दूर करतात. (सद्गुरूनी
म्हटल्याप्रमाणे त्या मायेची शक्ती ही 21
सुर्यांची जितकी शक्ती असते तितकी त्या
एका मायेची शक्ती आहे).
*सद्गुरू से पाईये सच्चा प्यार,*
*सद्गुरू से मिलता मोक्ष द्वार।*
खरे प्रेम जर कोणाकडे मिळत असेल तर ते
फक्त सद्गुरूंकड़ेच मिळू शकते. इतकेच नव्हे
तर मोक्षाचे द्वार सुध्दा फक्त सद्गुरूच खोलून
देऊ शकतात. इतर कोणीही नाही. (मोक्ष म्हणजे
काय? तर मुक्ती मोक्ष म्हणजे एखाद्याला त्या
सताच्या चरणांची प्राप्ती होणे, म्हणजेच सताने
त्या भक्ताला आपल्या चरणाप्रत घेणे)
*अन्त समय जो सद्गुरू को ध्याता,*
*यम न खोले उस का खाता*
याचा अर्थ असा की जो सदोदीत त्या सताचे
म्हणजेच सद्गुरूंचे ध्यान करतो (अन्त समय
नाही) तर अंतिम श्वासापर्यंत जो सतत त्या
सद्गुरूंचे ध्यान करतो त्याला यम देखील या
स्थुलातून नेऊ शकत नाही. त्याला फक्त
सद्गुरूच मुक्ती मोक्ष देतात म्हणजेच आपल्या
चरणावर स्थिर करतात. (आणि अशी कित्येक
उदाहरणे या दरबारात घड़ून गेलेली आहेत. जुन्या
भक्तगणांनी ती पाहिली देखील आहेत.)
*सद्गुरू को करिये वंदना भाव से बारंबार ,*
*नाम सुनकर किया जिस ने भवसागर पार*
ज्या संताने हे लिहीलय ते म्हणतात, "त्या सद्गुरूंची
वंदना म्हणजेच नामस्मरण आपण सगळ्यांनीच
वारंवार, नेहमी, सदोदीत केले पाहिजे, आणि ते
ही कसे तर भावपूर्ण, निस्सीम भावनेतून, मनापासून,
मन:पूर्वक, अंतरात्म्यातून ओढ लाविल असे. अशा
रीतीने जो माझा भक्तगण जाईल, त्याला हा
भवसागर पार करून जाण्यास मीच (सद्गुरूच) मदत
करणार आहेत ह्याची जाणीव सर्वस्वांनी घ्यावयास
हवी.
🙏🌺🍀🌸🌷🌻👏🙏
माझ्या अंगणात जास्वंद फुलले,
गणपतिच्या चरणी मी ते वाहिले,
पारिजातकाचा सुवास दरवळला चोहीकडे,
कृष्णाच्या चरणी घातले मी साकडे,
मोग-याचा सुगंध पसरला सगळीकडे,
भगवंताच्या दर्शनासाठी अवघे झाले मन वेड़े,
कमळ दल पुष्प जरी अवतरले असे चिखलात,
महालक्ष्मीला ते प्यारे, वसे ते तिच्या करकमलात,
सदाफुलीची ही फुले सदा फुलती आपल्या आसपास,
औषधी असती, लाभतो त्यांना भगवंताचा सहवास,
अनंताचे वर्णन काय मुखी करावे?
नावातच त्याच्या 'अनंत', अनंत वेळा स्मरावे,
सताचा रंग हा शुभ्र, सताच्या सान्निध्यात रहावे,
हिच असे मनिषा तयाची, सद्गुरूंच्या चरणी त्यांना वहावे,
कुणी त्यांच्या गळ्यात जाऊनी पड़े,
तर कुणी घाली भक्ती भावाने साकडे,
कुणी त्याच्या चरणांसाठी आसुसले,
अशी ही फुले, जशी कांही भगवंताचीच मुले,
सुगंध तयांचा सगळीकडे दरवळे,
भगवंताच्या चरणी वाहूनी भक्तगणही सुखावले........!!
मयुर तोंड़वळकर
दर्शन देरे, देरे भगवंता
तुझा ठाव नाही, घेता येत अनंता
दर्शन देरे, देरे भगवंता .....!!!
तुझीया नामात, होईन मी तल्लीन
तुझेच नाम, सदा मी गाईन
आता तरी कृपा, करशील कां अनंता
दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!
नाम तुझे गोड, नाही त्याला पाड़
सदा त्याचे वेड़, मनी त्याची ओढ,
लावशील कां मजला, हे बा अनंता
दर्शन देरे, देरे भगवंता ......!!!