रविवार, १० जून, २०१८

*तरी दुर्लभ या त्रिभुवनात |*
*ते तूं ऐकें वो सुनिश्चित ||*
*सदगुरु ब्रम्ह सदोदित |*
*सत्य सत्य वरानने ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

अंबा तापट होती, कर्तव्यासाठी हट्टाग्रही होती. स्वयंभू सतत नामस्मरणात लय राहायचे अन ज्यावेळी समाधीस्थ स्थितीतून उतरतील तेव्हाच ती त्यांना प्रणव देउ शकत असे. म्हणूनच ती प्रणव प्रस्थापित करीत  आहे, तुम्ही जे सतत ध्यानमय स्थितीत राहून परब्रम्हाचे दर्शन आपण घेत आहात ते मजला प्राप्त व्हावयास हवे.

महेश अंबेला सांगत आहे, *"तू मन सतशुध्द कर, परब्रम्हाची जाण घेतलीस तर तुला ते पूर्णत्व प्राप्त होईल."*
सत आपणाला सदोदित प्रणव देत होते, *" मन शुद्ध करून सताला पहाण्याची स्थिती करा."

* मानव सताप्रत पूर्णत्व स्थितीने राहिले तर मननतेला अवधी लागत नाही. मानवी मनाची स्थिती स्थिर नसल्याने मननतेला अवधी लागतो. परंतु मन सताप्रत स्थिर राहिल्यानंतर अवधिची आवश्यकता नाही.

सताने या पृथ्वीतलावर दृश्यत्वता प्राप्त करून संसारयुक्त स्थिती करून तुम्हासही आपणाप्रत घेऊन परब्रम्हास प्राप्त करून घेण्याचा राजमार्ग साध्य करून दिधला. तुम्हास सत प्राप्त झाले, येणे सद्गुरू प्राप्त झाले तर राजमार्ग साध्य झाला. राजमार्गाने सेवेकऱ्याने वाटचाल केली तर परब्रम्हाची जाण प्राप्त होईल. अन तदनंतर तो भवसागरातून मुक्त होईल. जर मानव स्थिर झाला तर कशाचीही कमतरता भासणार नाही. शारिरीक स्थितीची नाही, ज्ञानाची नाही, सौख्याची नाही, सुखाची नाही कशाचीही कमतरता मानवाला वाटणार नाही. सत राजमार्ग साध्य करून देते परंतु मानवाला आक्रमिता येत नाही.

आम्ही आपणास सर्वस्वाना सदोदित प्रणव देतो आद्यकर्तव्य करा, सदोदित नामस्मरणात रहा. नामस्मरणात राहिल्यानंतर मन सतशुध्द राहून स्थिर शांत रहाते. मन स्थिर शांत राहिल्यानंतर शरीर शांत रहाते. मग सेवेकरी नामस्मरण किती करीतो. देहाला स्थिर शांत ठेउन सेवेकऱ्याने नामस्मरण हे केलेच पाहिजे.

लक्षात ठेवा नाम हे मानवाला सोडून नाही, अन मानव नामाला सोडून राहूच शकत नाही. कर्तव्य करीत करीत मानवाने मनाने नामस्मरण केले पाहिजे. परंतु मानवाकडून एवढी स्थिती पूर्णत्व होत नाही.

सेवेकरी मनाची स्थिती जागृतमय करील तेवढी त्या सेवेकऱ्याची जीवनज्योत प्रज्वलित होईल. त्याचा प्रकाश तेजोमय होईल. तुमच्या अंत:स्थितील ज्योत नामस्मरणामुळे तेजोमय होईल. हे करण्यासाठी मन सतशुध्द ठेवा.

भवसागरातून आपणास पलीकडे जावयाचे असेल तर सदगुरूंची साथ हवी. सदगुरूंची साथ दृढनिश्चयी ठेवलीत तर तुम्ही परब्रह्माप्रत निश्चितपणे जाऊ शकाल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: