शुक्रवार, २९ जून, २०१८

संसार करून परमार्थ साधा !

परम् पूज्य श्री सद्गुरूस्वामी भगवान महाराज म्हणतात, "आपणाला प्रपंच करावयाचा नाही, तर आपल्याला काय करावयाचा आहे? "संसार".

प्रपंच ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर - प्र म्हणजे प + र म्हणजेच "पर" (इतर) आणि पंच म्हणजे "पंचाईत". याचाच अर्थ साध्या शब्दात सांगायचा म्हणजे परक्याची पंचाईत म्हणजे उठाठेव न करणे. इतरांच्या बाबतीत लक्ष न घालने. स्वतः स्वतःची उन्नती करून घेणे. (पारमार्थिक अर्थाने)

या प्रपंच शब्दाचे इतरही अनेक अर्थ होतात व ते सुद्धा पर म्हणजेच इतरांच्या बाबतीतच असतात. म्हणून भक्ताला काय केले पाहिजे तर "संसार".

आता संसार या शब्दाचा अर्थ पाहू. "संसार" येणे "सगुणाचा सार" येणे आपण मानव देहाने आहोत म्हणजेच सगुण आहोत. आणि सार येणे  मानव देहाचे कर्तव्य कर्म. ते आपण कसे केले पाहिजे ? तर ते सतमय मार्गाने करावयास हवे.

आपणास निर्गुणाप्रत म्हणजेच आपल्या सद्गुरूंप्रत जावयाचे आहे. ते कसे शक्य होईल? तर ते सतमय मार्गाने, मनोभावे सद्गुरूंची सेवा तिन्ही अंगाने येणे तन, मन, धनाने केल्यासच ते शक्य होईल. यासाठीच सद्गुरू माऊली म्हणतात, "संसार करून परमार्थ साधा". संसार केल्यानेच परमार्थ साधता येईल, अन्यथा नाही. प्रपंच करून परमार्थ साधता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: