बुधवार, ११ जुलै, २०१८

अंतरंगी रंगुनी जावे ....... 4

अंतरंगी रंगुनी जावे .......
त्या परब्रम्हाच्या गतीच्या अंशाने, आत्मबिंदूच्या गतीने, स्वयंम् प्रकाशाच्या सहाय्याने सर्वस्व अनुभवता येईल ही माझ्या सत चरणांची कृपा आहे. पण अंतरंगातील तरंग अशा त-हेचे असतील तर ! मायेच्या तरंगाने वाटचाल केलीत तर कदापी अंत देणार नाहीत. म्हणूनच म्हटले आहे, "तुझे आहे तुजपाशी, खरोखरीच तू जागा चुकलाशी".

तुमचे तुमच्यातच आहे. अविनाशी आत्मा हेच परमनिधान तत्त्व. अंतरंगातील अविनाशी आत्म्याप्रत गेले पाहिजे तरच सत् म्हणते मी तुझ्या वेगळा नाही अन तू माझ्या वेगळा नाही . सर्वस्व आपण एकच आहोत !

मायेच्या चाकोरीत गेले की तरंग बदलतात. मग अहंकार येतो अनेक उपाधी तयार होतात. मग परत स्थिर होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागतो. अंतरंगाचे तरंग अन तरंगात रंगले मग वेगळे कांही नाही.

हे सर्व रंगण्यासाठी आवश्यकता कोणाची असते? तर नामस्मरणाची. नामाच्या पलीकडे साधन नाही. नाम हेच सर्वस्वाचे निधान आहे. अन नामाच्या सहाय्यानेच आपल्याला तिथपर्यंत गेले पाहिजे.

टायपिंग: श्री रविंद्र वेदपाठक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: