(पितामहांची अमृतवाणी)
मानवाजवळ सर्वस्व स्थिती असते. मानवाचे तन आहे, मानवाचे धन आहे.
जर सताचे सर्वस्व असेल तर मग अहंकार का येतो? अहंभाव का येतो? लिनता का येत नाही? समत्वता का येत नाही?
तन आमचे नाही. तन म्हणजे हा पंचमहाभूतांचा देह बनवून परमात्म्याने आम्हांस प्रदान केला, अन् स्वयंम् स्थितीत वास करून राहिले.
त्यांच्यापासूनच मनाची निर्मिती अन् कर्तव्याकरीता धनाची निर्मिती. तेव्हा यातील कोणतीही स्थिती मानवाची नाही. परंतु हे मानव मान्य करीत नाही.
मानवाचे स्थूल आहे, मानवाचे धन आहे, मानवाचे सर्वस्व आहे. सताने तुम्हास तुमच्यासाठी प्रदान केले आहे. परंतु त्याची जाण मानवाने घेतली पाहिजे. जे सताने दिधले ते कर्तव्यासाठी दिधले. जो मानव दृढ:निश्चइ राहतो त्याला कशाची कमतरता नाही. पण काही मानवांच्या मनात आप-पर भाव मनी वसत राहतो. त्यांच्याठायी समत्वता नसते.
तन म्हणजे हा पंचमहाभूतांचा देह. त्या देहात असणारी आत्मज्योत अन् आत्मज्योती पासून असणारे मन. त्या मनात असणारी लिनता, सत् शुद्धता, संयमता अन् नितीमत्ता हेच खरे धन.
"मी" या सर्वस्वात बहरलेला आहे. पण ज्याने "मी" ला ओळखले आहे, ज्याने त्या "मी" शी संधान ठेवले आहे तोच खरा मानव होऊ शकतो. अशा मानवाजवळ संयम असतो, लिनत्वता असते अन् त्या मानवाची स्थिती स्थिर अन् शांत असते. शांततेने, स्थिरतेने तो सताला पदोपदी प्रणव देत असतो, " सता! जे आहे ते आपुले आहे. आपण मजला प्रदान केले आहे. कर्तव्यासाठी केले आहे. आपल्या कृपेने सर्वस्व स्थिती होत आहे. मी निमित्तमात्र आहे."
परंतु अशी स्थिती मानवाजवळ होत नाही. तो म्हणतो आहे हे सर्वस्व माझे आहे.
परमेशाने मानवास देह प्रदान केला आहे. त्या देहाची उपयुक्तता मानवाने यथायोग्य स्थितीने केली पाहिजे. यथायोग्य स्थितीने केली नाही तर त्रासयुक्त स्थिती होते. परमेशाने या भूमंडलावर परिपूर्ण निसर्ग स्थिती करून ठेवली आहे. अन् या परिपूर्ण निसर्गात मानवाची निर्मिती आहे. मग त्या निसर्गाशी मानवाने संधान ठेविले पाहिजे. पण मानव निसर्गा विरूद्ध वागतो. मानवाची अशी स्थिती अहंकारामुळे होते.
लक्षात घ्या, अहंकाराने मानव नाशाप्रत जातो. आपणास सत् सान्निध्य हवे असेल, सत् आपणात वास करून रहावयास हवे असेल तर आपण विषयाचा नाश केला पाहिजे. विषयापासून परावृत्त झाले पाहिजे. पण मानवाची परावृत्त स्थिती होत नाही. "मी" पणा असल्यामुळे अशी स्थिती होत असते.
परमेश सर्वाभूती सम आहे. परंतु मानव त्याची जाण घेत नाही. ज्या मानवाला सताने सर्वस्व प्रदान केले आहे त्याची जाण मानव घेत नाही. परंतु मायेची, विषयाची जाण मानवाला पूर्णत्व असते. अन् त्या विषयात रंगून गेल्यानंतर मानवाला त्रासयुक्त स्थिती होते. तद्नंतर मानव परमेश्वराला शरण जातो.
सताने स्थूलात असताना आपणा सर्वस्वांना परिपूर्ण जाण दिधलेली आहे. सताला सर्वस्व सम आहे. सत् सर्वस्व ठिकाणी एकाच दृष्टीने पहात असते. सेवेक-यांनी देखिल अशीच स्थिती करावयास हवी.
या अहंमतेमुळे तुम्ही सताला पाहू शकणार नाही. परंतु संयमतेने एकाग्र व्हाल तरच तुम्हांस सताची जाण घेता येईल. आपणा पासून सत् दूर नाही.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा