मंगळवार, ९ जून, २०२०

प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                        मौलिक ठेवा
                         🙏🙏🙏
काल आपण पाहिले की भगवंताचा अंत आपण काही घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे हे ही लक्षात घ्यावयास हवे की आपणाला त्या भगवंताच्या मायेचा सुद्धा अंत घेणे कठीण कार्य आहे. 

आपणांस प्रश्न पडू शकतो की ही माया कोण?
तर आजपर्यंत आपण जी काही आपल्या बाबांची प्रवचने ऐकली, वाचली असतील, त्यातून सद्गुरू माऊलीने याचा उहापोह केलेलाच आहे. 

बाबांनी माया कोण ह्याचे स्पष्टीकरण केलेले आहे व त्या म्हणण्याप्रमाणे पाहिल्यास माया ही त्या अनंतांचीच, त्या भगवंताचीच शक्ती होय. ज्या अनंतांचा आपण अंत घेऊ शकत नाही, मग सांगा बरे, त्यांची शक्ती असलेल्या मायेचा अंत आपण कसे बरे घेणार?

तर बाबांनीच प्रवचनातून उघड केल्याप्रमाणे माया ही त्यांची शक्ती होती आणि तिची ताकद किती होती? तर अकरा सुर्यांची जेवढी शक्ती होईल, तेवढी तिची शक्ती होती.

ह्यावरून आपणांस एक गोष्ट लक्षात आली असेल की मायेची शक्ती अफाट होती. कारण एका सुर्यापासून केवढी ऊर्जा बाहेर पडत असते. केवढी उष्णता बाहेर फेकली जात असते, ज्याच्यामुळे ही सृष्टी, चराचर कार्यरत आहे. ती उष्णता, ती शक्ती आपण सहन करु शकत नाही. मग अकरा सुर्य आणि त्यांची शक्ती कसे बरे आपण सहन करु शकू?

म्हणूनच आपली माऊली सांगते, मग अशी स्थिती असताना त्यांचा अंत घेणे किती दुरापास्त गोष्ट आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावयास हवे. त्यांचा अंत घ्यावयास जे गेले, ते एकतर त्यांचेच होऊन राहिले किंवा त्यांना त्यांचा अंत लावता आला नाही.......(अनगड)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: