मंगळवार, ९ जून, २०२०

प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

पहिले प्रेम सद्गुरू असावयास हवे.......

प्रत्येक मानवाला सुखदुःख हे आहेच आणि असते देखील. सुखदुःख रहित या कलीयुगात कोणी मानव असू शकेल कां? असे आपले बाबा आपल्याला विचारीत आहेत.

भगवंताची शक्ती ही अगाध शक्ति आहे. त्यांनी इतकी अफाट शक्ति निर्माण केलेली आहे कि त्याचा अंत लावणे, आम्हा पामराना शक्य नाही. 

असे आपले बाबा आपल्याला कां बरे विचारीत आहेत? याचे कारण आपण मर्त्य मानव भगवंताच्या त्या अगाध शक्तीकडे, आपल्या मायेत गुरफटून गेल्यामुळे दुर्लक्ष करीत असतो. आपल्याला आपल्या मायेशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. आपणांस समोर दिसत असले तरीही आपण भगवंत तथा भगवंताच्या त्या अगाध शक्तीकडे कानाडोळा करीत असतो. 

आपण मायेच्या आपमतलबी प्रेमापोटी आपल्या भगवंताच्या ख-या प्रेमाला पारखे होतो. आपण शाश्वत प्रेम डावलून अशाश्वत प्रेमाच्या पाठी लागतो आणि मग सर्वस्व गमावून बसतो.

आपले खरे आणि पहिले प्रेम सद्गुरू असावयास हवे. कारण सद्गुरू माऊली हिच या सर्व चराचराची, सर्वस्व जगताची निर्माणकर्ती आहे. तिच्या मुळेच सर्व सृष्टीची निर्मिती आहे. तिच्यापासूनच सर्वस्वाची उत्पत्ती आहे. हे सगळे आपणांस तिने ह्या सव्विसाव्या अवतार कार्यात प्रत्यक्षपणे दाखवून दिले आहे आणि तरीही आपण मानव काय करतो? तर ते कळून सुद्धा न कळल्यासारखे करतो.
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज)
........अनगड.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: