मंगळवार, ९ जून, २०२०

प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                        मौलिक ठेवा
                         🙏🙏🙏
काल आपण पाहिले की भगवंताचा अंत आपण काही घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे हे ही लक्षात घ्यावयास हवे की आपणाला त्या भगवंताच्या मायेचा सुद्धा अंत घेणे कठीण कार्य आहे. 

आपणांस प्रश्न पडू शकतो की ही माया कोण?
तर आजपर्यंत आपण जी काही आपल्या बाबांची प्रवचने ऐकली, वाचली असतील, त्यातून सद्गुरू माऊलीने याचा उहापोह केलेलाच आहे. 

बाबांनी माया कोण ह्याचे स्पष्टीकरण केलेले आहे व त्या म्हणण्याप्रमाणे पाहिल्यास माया ही त्या अनंतांचीच, त्या भगवंताचीच शक्ती होय. ज्या अनंतांचा आपण अंत घेऊ शकत नाही, मग सांगा बरे, त्यांची शक्ती असलेल्या मायेचा अंत आपण कसे बरे घेणार?

तर बाबांनीच प्रवचनातून उघड केल्याप्रमाणे माया ही त्यांची शक्ती होती आणि तिची ताकद किती होती? तर अकरा सुर्यांची जेवढी शक्ती होईल, तेवढी तिची शक्ती होती.

ह्यावरून आपणांस एक गोष्ट लक्षात आली असेल की मायेची शक्ती अफाट होती. कारण एका सुर्यापासून केवढी ऊर्जा बाहेर पडत असते. केवढी उष्णता बाहेर फेकली जात असते, ज्याच्यामुळे ही सृष्टी, चराचर कार्यरत आहे. ती उष्णता, ती शक्ती आपण सहन करु शकत नाही. मग अकरा सुर्य आणि त्यांची शक्ती कसे बरे आपण सहन करु शकू?

म्हणूनच आपली माऊली सांगते, मग अशी स्थिती असताना त्यांचा अंत घेणे किती दुरापास्त गोष्ट आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावयास हवे. त्यांचा अंत घ्यावयास जे गेले, ते एकतर त्यांचेच होऊन राहिले किंवा त्यांना त्यांचा अंत लावता आला नाही.......(अनगड)

प.पू.श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांचा)
                         मौलिक ठेवा
                         🙏🙏🙏
बाबा म्हणतात, "ही माया सुखदुःखाच्या व्यापाराने चालत असते." मानवाला सुख आणि दुःखहि असतातच. अगोदर म्हटल्याप्रमाणे, मनासारखे झाले की त्याला तो सुख म्हणतो आणि मनाच्या विरोधात झाले तर दु:ख म्हणतो. हा सुख दुःखाचा खेळ म्हणजेच मायेचा व्यापार होय. मायेचे कर्तव्यच मुळी हा खेळ खेळत राहणे असते.

मानवाना आज कशाची अपेक्षा असते तर जे समोर असेल ते पाहिजे. देवाकडे गेला, संताकडे गेला, ऋषी-मुनींकडे गेला, देवळात गेला तरी मानव देवाकडे मागणी काय मागतो? 

मानव मागणी एकच मागतो कि, भगवंता मला सुखच दे. माझ्या मुलाबाळांना सुखी ठेव. म्हणजेच ही माया तो मागत असतो. 

पण हे सुख कसे आहे? तर  क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, ते नश्वर आहे, अर्थात नाशिवंत आहे. ते आज आहे, तर उद्या नाही. ते कायमचे कुणाकडेही नसते. ते लाघवी, मायावी आहे.

म्हणूनच सद्गुरू माऊली पुढे विचारते, "याची जाणीव कोणी घेतली आहे का? सुख हे सदैव असते का? तर नाही. 

सुखा पाठोपाठ दुःख हे आहेच. दुःख गेल्यानंतर सुख हे आहेच. मानवी जीवनात त्या समुद्रामध्ये जशी सुकती आणि भरती असते, तशीच सुख-दु:खाची सुकती आणि भरती ही चालूच असते. 

हिच मायेची लाघवी तऱ्हा आहे. जिथे सुकती आहे, तिथे भरती आहे, अन् जिथे भरती आहे तिथे सुकतीही आहे. सर्वाभूती हे आहे परंतु तुम्हाला त्याचा अंत सापडणार नाही. 

पण ही सुखती, भरती कशामुळे होते ते तुम्हाला कळायचे नाही. त्याला कोणीतरी कारण आहेच, पण ते कारण अदृष्य आहे. सुखदुःखाचे कारण आपण म्हणतो दृष्य आहे, पण ते देखील अदृष्यच आहे......(अनगड)......

गुरू गुह्य


प.पू. श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृतवाणी

*_गुरु गुह्य_* 
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज अमृतवाणी)

_आपली श्री सद्गुरु माऊलीं गुरू गुह्य उघड करुन सांगताना म्हणते,_  

*"गुरुदेव पितामहांसारखे  परम्  पूज्य तत्व, सप्त ऋषींचे प्रमुख, यज्ञ यागात सर्वश्रेष्ठ, महान महान ऋषी ज्यांच्यापूढे लिन आहेत असे ते तत्व"*  

_ते देखील या आसनाप्रत प्रणव देत असतात. मग असे ते आसन आणि त्यावर आरुढ असलेले तत्व सेवेकऱ्यांनो परम् श्रेष्ठ नाही का?_

मग अशा आसनाप्रत, अशा तत्वाप्रत मनाने किती लीन राहिले पाहिजे. आणि जर का एकदा मन त्या ठिकाणी लीन झाले, सतमय झाले, सद्गुरुमय झाले, मग आपोआप सर्वस्व त्या ठिकाणी आकारेल. सर्वस्वाची जाण देणारे तत्व दूसरे तीसरे कोणी नसून सद्गुरुच आहेत. त्याच्या वेगळे जाण देणारे दूसरे कोणीही नाही.

बुधवार, २७ मे, २०२०

लालबाग सद्गुरु दरबार स्थानांतरण सोहळा


Lalbaug Darbar Shifting - लालबाग सद्गुरु दरबार  स्थानांतरण सोहळा
सदरच्या या विडियो मध्ये वापरण्यात आलेली गीते (भजन, अभंग) हे धार्मिक असल्याने वापरण्यात आलेले असून, त्यापासून कोणत्याही प्रकारचा आर्थिक अथवा इतर लाभासाठी वापरलेली नाहीत.
सौजन्य: गायक अजित कडकडे, सुरेश वाडकर व इतर
विनस विडियो, सुमित म्युझिक.

सद्गुरू वचने


रविवार, २४ मे, २०२०

कोकण आश्रम पुनर्स्थापना सोहळा आणि भंडारा उत्सव - २०१७

कोकण आश्रम (वालावल, कुडाळ) पुनर्स्थापना सोहळा आणि भंडारा उत्सव - २०१७ चा विडियो पहाण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा आणि आनंद घ्या.

https://youtu.be/fpNuRE9L2ro

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

साधना

साधना या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. हे सत्य होय. यापैकी च एक म्हणजे *साधना* हा संधीयुक्त शब्द. 

*साधन* + *अ* = साधना (यामध्ये न+अ जोडला की ना होतो)

आता आपण हे लक्षात घेतले पाहिजे की *अ* हा *_अनंतामधील अ_* असे समजूया व त्यांच्याप्रत जाण्याचे जे *_साधन_* आहे ते समजूया *_अनंतांचे नाम_* म्हणजेच जे आपण _अनंतांचे म्हणा, आपल्या श्री सद्गुरू माऊलींचे जे नाम_ घेत असतो, ते असते, त्या _अनंताप्रत किंवा श्री सद्गुरू माऊलींप्रत पोहचण्याचे साधन_ आणि ह्या दोहोंचा जेव्हा व्याकरणातील संधी तयार होतो, त्यावेळेस आपण त्या संधीला *_साधना_*  ह्या नामाभिधानाने संबोधतो. _आहे की नाही गंमत._ याचाच अर्थ असा की *_साधना_*  ह्याचा आपल्याला अभिप्रेत असलेला अर्थ अर्थ आहे *_अनंताप्रत जाण्याचे जे साधन आहे, ते आहे, त्यांचे नाम_* आणि हेच *_नाम_* आपण ज्यावेळेस सातत्याने घेत असतो, त्यावेळेस आपल्याकडून होते ते *_नामस्मरण._*

_अशाप्रकारे जर आपण *_साधना_*  केली तर मग *_अनंत किंवा सद्गुरू माऊली आपणांपासून दूर राहू शकेल कां?_*

_म्हणून आपल्याला आयुष्यात काय "साधायचे" आहे हे ठरविणे, आणि ते प्राप्त होईपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजेच एका अर्थी साधना करने, हे आपले *_आद्य_* कर्तव्य ठरते._

*_अनगडाची ही बडबड,_*
*_आठवा मनोमनी सत्वर_*
*_कास धरुनीया नामाची_*
*_कापूया दोघांमधील अंतर_*

*_अंतराला देता अंतर_*
*_दिसो लागतील सद्गुरू चरण_*
*_चरणांत लिन होता_*
*_एकरुप होती सकलजण_*

*_द्वैत भाव मिटता ठायी_*
*_अद्वैत भाव जागे मनी_*
*_अनगडाचे चित्त लागे_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*
*_सद्गुरु माऊलींच्या चरणी_*