गुरुवार, ७ जून, २०१८

ईश्वर म्हणे वो देवी......

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

भक्त भगवंताप्रत का येत असतो? तर ज्ञानप्राप्तीसाठी आणि भक्तिसाठी भक्त सत चरणाप्रत येत असतो. आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत ज्ञानप्राप्तीसाठी जात होता.
भगवंतानी आपली सुख-दु:ख स्थिती ग्राह्य केली नाही तर आपली स्थिती चंचल होईल. भक्ताचे भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचे कर्तव्य आहे.
सद्गुरू माऊलीने स्थुल रुप धारण केल्यानंतर सुख- दु:ख स्थिती भोगली कि नाही? पण तरीहि ते स्थिर, शांत, संयमी असायचे. पण तोच भक्त, थोडीशी दुर्मिळ स्थिती झाली तर चलबिचल होतो.
आपणास कल्पना आहे आमची कन्यका अहिल्या पतीच्या शापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? असे असून देखील आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होती ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हालाही सर्वस्वाची जाण होती. सर्वस्व स्थिती भगवंताने स्थुल रुप धारण करून स्थित्यंतरे कशी येतात त्याची स्वयम जाण सद्गुरूनी आपणास दिधलेली आहे.पण तरीही मानव विसरतो.

आपणास कल्पना आहे सुख आल्यानंतर मानव कालावधीची गणना करीत नाही. पण दु:ख आल्यानंतर मानव क्षणापासून सुरुवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत. थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर आपण चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.
आम्ही हे मान्य करीतो कि अपुले कर्तव्य आहे सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. परंतु हतबल होणे नाही. आपण सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लिनता ही ठेवलीच पाहिजे.
आपण सर्वस्व भक्त भगवंताचे आहात, सताचे आहात. त्या सताला तुमच्या सर्वस्व सुख-दु:खाची जाण आहेच. भक्ताची जर पूर्णत्व श्रध्दायुक्त स्थिती नसेल तर? लिनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम नसेल तर? भगवंत भक्तात लय होणार नाहीत. भक्ताचे भगवंतावर अपरंपार, नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होणारच. जेथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील.
म्हणून भगवंत भक्ताप्रत राहण्यासाठी या सर्वस्व गुणांची आवश्यकताआहे. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. लक्षात ठेवा विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते.

मंगळवार, २० मार्च, २०१८

गुरू गुह्य

सत ज्या अवधीत तुम्हांस आपणा प्रत घेत होते त्या अवधीत तुमची मानवी स्थितीप्रमाणे पूर्णत्व सतशुध्दताच करीत होते नां?

मोह आणि माया या सद्गुरूंपासून दूर नेणा-या आहेत.

आरती येणे कोणती स्थिती तर नाम.

सद्गुरूंसमवेत नामामुळेच जाऊ शकतो.

अंत:करणापासून सद्गुरू चरणी केलेली विनंती याला आपण सेवेकरी प्रार्थना म्हणतो.

प्रार्थना आणि विनंती :

प्रार्थना म्हणजे परात्पर, क्षराक्षर व चराचर याच्यात भरूनही अलिप्त असणा-या निर्गुण, निराकार व अविनाशी सच्छिदानंद तत्वाला नम्रतापूर्वक, एकाग्र चित्ताने केवळ दर्शन व सान्निध्य मिळविण्याकरिता नामाने आळविता येणे नाम प्रार्थना.

परब्रह्माकडे म्हणजेच सताकडे सुखदु:खाची, मायेची निवेदने आपण देत असतो तसेच कष्टमय स्थितीतून सुटण्यासाठी व मनाला शांती मिळविण्याकरिता आपण जे प्रणव देतो तीच विनंती.

💐🕉💐🕉💐🕉💐🕉💐

शनिवार, १७ मार्च, २०१८

"फक्त ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

💐🌲💐🌷💐🌲💐🌷

"भगवत् भक्तीच्या उत्तमावस्थेत रत झाल्यानंतरच भगवंताच्या प्रेम पात्रतेचा अधिकार भक्तांला प्राप्त होतो. नुसतंच वाचक अभ्यासक व पांडीत्य किंवा ज्ञानी असुन प्रेमभक्ती प्राप्त होत नाही."

भक्तीप्रेम सुख नेणवे आणिका !
पंडीत वाचका ज्ञानियांसी !!

भक्तीचे व भक्तांचेही अनेक प्रकार आहेत. भक्ती कशीही असली तरी श्रेष्ठ व उत्तमच.

गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात,
"नामभक्ती तर सगळेच करतात पण अंतःकरणात जिव्हाळा व भगवंताविषयीच्या आंतरिक प्रेमाचा कळवळा नसेल तर हा नंदनंदन परमात्मा संतुष्ट व वश्य होऊन प्राप्त होत नाही."

!! राम राम सब कोई कहे,
   ठग ठाकुर और चोर !
!! बिना प्रे💓म रिझें नही,
   तुलसी नंदकिसोर !!
🙏🏻 🙏🌻🌹

बुधवार, १४ मार्च, २०१८

*आनंद सागरात प्रेमे बूडी दिधली |* *लाभले सौख मोठे, नये बोलता बोली||*2*

सताने आपणा सर्वंस्वाना स्वयंस्थितीत घेतले. अन आपुले कर्तव्य यथायोग्य केले. परंतु सेवेकऱ्याकडून ती स्थिती पूर्णत्व होत नाही. राजमार्ग सताने आपणास प्रदान केलेला आहे पण तो राजमार्ग कसा आक्रमीता येईल हे तुम्हास अवगत नाही. एकदा का सताने प्रणव दिधला, त्या प्रणवात पूर्णत्व मग्न होऊन जो कर्तव्य करीतो त्याच्याकडून असे प्रणव येणार नाहीत. परंतु कलीयुगी स्थिती हेच प्रणव आपणाकडून मजला मिळतात. लक्षात घ्या कलीयुगातच सत कर्तव्य करीत होते. सताच्या प्रणवात कधी कमतरता होती का? एकदा का सताने प्रणव दिधले ते पूर्णत्व सिध्द होईलपर्यंत सत कधी शांत राहिले नाही. अशा सताचे आपण सेवेकरी आहात. राजमार्ग आपणास दिधलेला आहे. अन त्याची आक्रमिता आपणास करावयची आहे. याकरीता प्रथम मानवाची मती शुद्ध पाहिजे. शुद्ध मतीने, आचार, विचार येणे वृत्ती! मनापासून ज्याची वृध्दी होते ती कोण तर बुध्दी! जर ती शुध्द असेल तर सताने दिधलेला राजमार्ग आपण आक्रमित जालं. पण बुध्दीच जर शुद्ध नसेल तर कसे होईल. अनेक अडचणी येतील. म्हणून सत प्रणवाप्रमाणे सेवेकऱ्याने आपली बुध्दीमत्ता, मननता, मन कसे ठेवले पाहिजे? सतशुध्द ठेवले पाहिजे. पहा मन सतशुद्ध असेल तर सर्वसे सतशुध्द आहे. त्या मन सतशुध्द्तेतून बुध्दीची स्थिती होते. अन त्याप्रमाणे जर मानव कर्तव्य करु लागला तर त्याला कोठेही अडचण येणार नाही. आपण माझ्या सताचे सेवेकरी आहात, ते सतशुध्दतेनेच गेले पाहिजे.

*आनंद सागरात प्रेमे बूडी दिधली |* *लाभले सौख मोठे, नये बोलता बोली||*

आपण iसत चरणाप्रत आलात ही आनंद स्थिती येणे आनंद सागरच आहे ना! या स्थितीत आपणास काय बहाल केले आहे, भक्ति बहाल केली आहे. अन भक्तीच्या महासागरात आपण सामावलेले आहात का? तुम्ही मायावी महासागरातच बुडी दिधली आहे. जो आनंद महासागरात बुडी घेईल ते सुख येणे शांतता अन संयमाने पूर्ण बहरून जाईल. परंतु मायावी सागरात बुडी घेणारा असा बहरून जाईल का? नाही. सताने भक्तीच्या महासागरात तुम्हाला आणून सोडले आहे. परंतु आपण परीपूर्ण भक्तियुक्त झाला आहात का? नाही. जर आपण भक्तीने परीपूर्ण झाला नाहीत मग आपणास आनंद महासागराची कल्पना येणार नाही. तर त्या आनंद महासागराची कल्पना घेण्यासाठी काय केले पाहिजे? तर भक्तीच्या महासागरात डुंबत राहिले पाहिजे. परंतु हे होत नाही. याला कारण मायावी स्थिती. माया कोणाला नाही. माया सर्वस्वाना आहे. परंतु आद्य कर्तव्य जे आपण विसरतो तेंव्हाच आपुली अशी स्थिती होते. मानवी स्थितीप्रमाणे तुम्ही प्रणव सताप्रत देत आहात. सत ते प्रणव ग्रहण करतें अन प्रणव ग्रहन करून तुम्हास सुख शांती प्राप्त करून देते. अरे! ही देखील मायाच नव्हे का? माया येणे प्रेम. ही सत सात्विक माया, अन अशा या सात्विक स्थितीचे आपण सेवेकरी आहात. मग आपण कशात डुंबुन राहायचे? भक्ति अन नामस्मरणात डुंबुन रहावयास पाहिजे का मायेत? मग आपणाकडून असे प्रणव का येतात? मानवी स्थितीप्रमाणे जर सर्वस्व शुद्ध असेल तर अशी चूक होणार नाही. जर आनंद सागरात आपण डुंबत राहिला असतात तर असे प्रणव आले नसते. सत प्रणवाप्रमाणे भक्तीच्या सागरात येणे भक्तिमध्ये डुंबले पाहिजे. म्हणजे या मोहमायेपासून आपणास मुक्तता मिळेल. ज्या भक्ताने भक्तीच्या स्थितीने प्रेमाने आपणास सामाऊन घेतले त्याला सुखाची दु:खाची कमतरता येइल का? दु:ख त्याच्याजवळ येउ शकेल का? त्याच्यापासून सुख दूर जाउ शकेन का? नाही. शांतता, संयमता तेथे  पूर्णत्व राहील.

शुक्रवार, ९ मार्च, २०१८

*आरती सदगुरूंची उजळली अंतरी|*

साम्य स्थितीत सत प्रवृत्ती असते. तरी मानवाला त्याची कल्पना येत नाही. मानव सताची आरती केव्हा करीतो? आप्ल्या स्थितीनुसार स्तुती अन आरती एकच आहे. म्हणून विचारत आहे सताची आरती मानव केव्हा करीतो? स्तुती प्रणवाद्वारे होते अन आरती कशी असते? आपणास क्ल्पना आहे मानवाला भक्ति जशी सोपी आहे तसेच भक्ति हा प्रणव देण्यास सोपा आहे. अन आरती हा ही एक प्रणव देण्यास सोपा आहे. परंतु या प्रणवात गहनता आहे. मानवी स्थितीप्रमाणे सताचे स्थितीत राहून आपणा सर्वस्वाना किती प्रणव बहाल केलें. परंतु त्या प्रणवाची मननता आपण सेवेकऱ्यानी केली नाही. पूर्णत्वाने ज्ञान मननतेत बहरून राहिले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता ही सर्वस्व भक्तिचीच अंगे आहेत. आपल्या मननतेनुसार मन पूर्णत्व सदगुरुमय करून, सतत नामस्मरण करीत दिव्यदृष्टीने आत्मज्योतीच्या प्रकाशात रममाण होणे येणे नाम आरती!

सताने आपणा सर्वस्वाना नाम बहाल केले आहे. येणे नाम आरती! सदगुरूंनी बहाल केलेले नाम अंत:र्मय स्थितीत येणे त्रयीत लय केल्यानंतर आपल्याला दिव्य प्रकाश मिळेल. त्या दिव्य प्रकाशात आपण सत पाहू  शकाल. अंबर येणे आकाश! आकाशात सुध्दा बहरून उरलेला हा दिव्य प्रकाश आहे. सताने दिधलेले  नाम अंत:र्मय स्थितीत ठेउन जो आपण प्रकाश पाहू शकाल, तोच प्रकाश आकाशमय येणे अंबरमय स्थितीत बहरलेला आहे. प्रकाशाची साठवण तुम्ही करु शकता का? नाही! तो प्रकाश नामानेच प्राप्त होऊ शकेल. सदगुरूंनी दिलेल्या नामानेच तो प्रकाश मिळू शकेल. मन त्रयीत, त्रयीत लय करून जे प्रणव पूर्णत्व होतात त्यालाच मंत्र म्हणतात. अन तोच मंत्र याने नाम! आता आपण सेवेकरी आरती येणे नाम कोणत्या तऱ्हेने घेणार शुद्ध शुचिर्भूत करून हे नाम येणे आरती केली पाहिजे. आपल्या म्हणण्यानुसार अर्धपदमासन घालून आपल्या सदगुरूंना नमस्कार करून, त्यांचे  स्वरुप मनामध्ये साठवून, चरणकमलाकडे मनाचे केंद्रिकरण करुन, त्रिकुटित आत्मज्योत लय करुन, देहाला विसरून अंत:र्यामापासून सदगुरूंना आळवले पाहिजे. लक्षात घ्या आपण नाम केव्हाही घेउ शकतो. परंतु ते नाम सताप्रत पोहचविण्यासाठी मन सदगुरु चरणांवर अर्पण करूनच नामस्मरण केले पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता या स्थिती एकत्र होतील त्याचवेळी मन स्थिर होईल. सतात पूर्णत्व लय होणे म्हणजेच स्मरण करणे. अशा स्थितीने आपण नामाची स्थिती केलीत तर्च ते सतचरणाप्रत पोहोचू शकतें. तदनंतर सताचे दर्शन पूर्णत्वाने घेउ शकता.
आपण जी ज्योत दिवास्वरुपी प्रगट करता तीच ज्योत आपल्या आत्मस्थितीतही प्रगट असते ना! आत्मा ही पण एक ज्योतच आहे ना! तो आत्मा आपण मानवी स्थितीप्रमाणे सामूहिक स्थितीत प्रगट करु शकणार नाही. त्या परब्रम्हाचे स्मरण दिपस्थितीने आत्म्याशी स्वरूप करणे अन परब्रम्हाचे स्मरण करणे. आम्ही देखील सताचे स्तवन करीतो, पण कोणत्या स्थितीने याची आपणास पूर्णत्व क्ल्पना आहे. परंतु मानवाला हे प्रतिक करावेच लागतें ते प्रतिक आपल्या हस्त स्थितीत नसेल तर आपण स्थिर होऊ शकणार नाही. लक्षात ठेवा आत्मज्योतीचे प्रतिक हा दिप आहे.

मंगळवार, १२ डिसेंबर, २०१७

सद्गुरू आणि अनंत

अंत न लागे अनंताचा
लिनता, नम्रता न अंगी बाणे
एकच मार्ग उरतो आता
शरण तयासी जाणे ||

शरण तयासी जाण्याचा
मार्ग दाखवी सद्गुरू
उपदेशाची अमृत वाणी
स्वामी मुखातून उच्चारू ||

उच्चारता नाम तयाचे
गळून पडतील पातके
सद्गुरू आणि अनंत हे
एकच तत्व इतुके ||

स्वामी हा तिन्ही जगाचा
नामातच असे सामावलेला
नाम मुखी घेता तयाचे
जन्म सार्थकी लागेल अमुचा !!!
..........मयुर तोंड़वळकर.........

मंगळवार, ५ डिसेंबर, २०१७

शरण जाता श्री सदगुरूशी.......

कोण रक्षितो गर्भामधे...?
कोण पुरवितो तेथे वारा...?
कोण निर्मितो बाळासाठी
जन्माआधिच अमृत धारा...?

कोण छेडीतो श्वासांमधे...?
प्रभूस्मरणाच्या मंजूळ तारा,
कोण निर्मितो नाद अनाहत.....?
ज्याने उजळे मनगाभारा.

उजळविण्याला मनगाभारा
कोण चेतवी अंतरज्योती...?
करण्या निशिदिन स्मरण प्रभूचे
कोण देतसे अखंड स्फुर्ती...?

कोण घडवितो वटवृक्षाला..?
कणा येवढ्या बिजामधूनी,
कोण देतसे फळांस गोडी..?
जिवन सोशून मातीमधूनी.

कोकिळ कंठी कोणी दिधले..?
गंधर्वांचे अपूर्व देणे,
वसंत येता आम्रतरूवर
कोण फुलवितो त्याचे गाणे..?

कुणी रेखिले मोरपिसावरी..?
रंग रेशमी इंन्द्रधनुचे,
मेघ बरसता गर्द वनामधे
कोण नाचतो त्याच्या संगे..?

निद्रेतूनही नयनांमधे
स्वप्न होऊनी कोण जागतो..?
सुखदु:खामधे हृदयी राहून
कोण अखंडीत सोबत करतो..?

कोण..? कसे..? या प्रश्नापाठी
आयुष्याची संध्या होते,
शरण जाता श्री सदगुरूशी
मग कर्त्याची ओळख होते.

"कर्ता एक रघुनंदन" हे
शरणांगत होताच उमगते,
प्रश्न मनीचे विरून जाती
एक तत्व हे मनी प्रगटते.

सद्गुरुकृपेच्या ऋणातुनी या
कोण कसे होईल उतराई,
हात मस्तकी सदैव वत्सल
जैसा ठेवत असते आई...

Courtesy: WhatsApp/Internet/unknown author
 🙏🙏🙏🙏

शनिवार, ८ जुलै, २०१७

भवसागर मुक्ती

🕉🙏🕉👏🕉🙏🕉👏🕉

"व्यावहारिक जीवनात माता-पिता  आपल्याला जन्म देतात तर अध्यात्मातील माता-पिता म्हणजेच सद्गुरू आपल्याला या भवसागरापासून मुक्ती देतात."

"भवसागराच्या मुक्तीसाठी भगवंताच्या नामस्मरणाची गरज असते. ते "नाम" सद्गुरूच आपल्याला देत असतात. सद्गुरू  हा मानव व भगवंत ह्यामधील एक असा दुवा आहे की मानवाला  भगवंत प्राप्तीचा मार्ग आपोआपच खुला होतो, त्यासाठी  थोडा मायेचा विसर पडणे गरजेचे  असते. मायेचा विसर तेव्हाच शक्य होतो ज्यावेळेस आपल्या शिरी सद्गुरूंचा कृपाहस्त होतो. कृपाहस्त तेव्हाच होतो ज्यावेळेस आपणांस कळू लागते की माया काय आहे. ते शक्य होते फक्त सद्गुरू माऊलींच्या पदस्पर्शाने. सद्गुरूंचा पदस्पर्श आणि हस्तस्पर्श होताच अर्थात नामस्मरण मिळताच आपण या भवसागरापासून मुक्त होण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करू लागतो. त्यासाठी सद्गुरू सांगतात हा प्रपंच सोडण्याची गरज नाही, मौजमजा सोडण्याची गरज नाही, तर संसारात राहूनच, त्यातून वेळ काढूनच हे सर्वस्व आपणांस प्राप्त  होऊ शकते. त्यासाठी संसारातून, या मायेतून जेवढा वेळ काढून आपल्याला सत् कर्तव्यासाठी देता येईल तेवढा तो आतापासूनच जर आपण दिला तर "थेंबे थेंबे तळे साचे" या म्हणीप्रमाणे आपले सत् मार्गाचे तळे निर्माण होऊन त्याचे एके दिवशी त्याचे सरोवरात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही व भगवंत प्राप्ती दूर राहणार नाही.

🕉👏🕉🙏🕉👏🕉🙏🕉