रविवार, ५ फेब्रुवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग पाचवा) परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने

तूरत् दान महापुन्यम् नाही. पुढे हि ज्योत कुठे जाणार आहे याची सर्वस्वी नोंद त्यांच्याजवळ असते. सद्गुरूंना सर्वस्वाची कल्पना असते. अन् हाच राजमार्ग सेवेकरी चुकला तर मग सेवेक-यांची कशी प्रगती होईल म्हणून सद्गुरू मार्गदर्शन करीत असतात.
भक्तीनेच सेवेकरी पुढे जावू शकेल, स्वत:ची प्रगती साधू शकेल. तप:श्चर्येने अनंतांना प्राप्त करून घेवू म्हणाल तर, कितीही जन्म घेवून देखील हे शक्य होणार नाही. अनंत दर्शन मिळणे कालत्रयी शक्य होणार नाही. परंतु भक्तिने मात्र तुम्ही त्यांना थांबवू शकाल. पाहू शकाल.

संपत्ती संपत्ती मधील फरक :
धन संपत्तीत देखील फरक आहे - एक सात्विक संपत्ती, तर दुसरी अघोर संपत्ती. कष्ट करून, कर्तव्य करून किंवा जी वडिलोपार्जीत प्राप्त झाली ती सत् संपत्ती होय. परंतु इतरांना त्रास देवून, खोटे बोलून, विश्वासघात करून मिळविलेली संपत्ती ती अघोर संपत्ती होय. सात्विक संपत्तीला विचार असतो. अघोर संपत्तीला विचार कुठला? अघोर संपत्ती कमविणारे अघोर अविचाराने पाहणार. कितीही अघोर संपत्ती एकाद्याकडे असली तरी अंतिम त्याची अधोगतीच होणार. परंतु भक्ति मार्गाने जाणारे, सत् संपत्तीचा संचय करणा-यांच्या ठायी मात्र शांती, समाधान आणि प्रगतीच असणार. सात्विक संपत्तीला पुरवणी असते. अघोर संपत्ती ज्याच्याजवळ असते त्यांच्याजवळ समाधान कधीही नसते. परंतु सात्विक संपत्ती ज्या ठिकाणी असते तेथे सदैव समाधान असते. समाधान हीच खरी आपली लक्ष्मी आहे. भक्तीचे मूळ अंग म्हणजे समाधान ! समाधानी वृत्तीच मानवाजवळ हवी.

ठेविले अनंते तैसेची राहावे ! चित्ती असू द्यावे समाधान !!

आपल्याला सद्गुरू जे आपल्याला सांगत असतात त्याची छाननी करणे, उजळणी करणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. जर सद्गुरूंनी सांगितलेली एखादी गोष्ट लक्षात आली नाही तर समजावून सांगतील. परंतु तुम्ही भक्तीची आणि तपोभूमी यांची तुलना होवू शकत नाही. या दोघांमध्ये भक्तीच सर्वश्रेष्ठ आहे. सत् युगापासूनच्या ज्योतींनी अदृश्य त-हेने सत् सान्निध्य मिळविले आहे अन् स्थूल दृश्य सेवेकरी ज्योतींना ते सान्निध्य मिळवावयाचे आहे. प्रत्येक सेवेक-याने याकारीता मनाने अत्यंत शुद्ध राहणे आवश्यक आहे. नामस्मरणाच्या गतीने गेल्यानंतर अनंतांना तुम्ही डोळे भरून पाहू शकाल.
समाप्त ............

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: