शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

सतभक्तीचे स्वरूप (भाग चौथा) परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने


भक्तीमध्ये जे नाम आहे, ती महान अशी अखंड चित्-शक्ती आहे. या एका नामावर त्रिभुवन तरले आहे. तेच नामस्मरण तुम्ही करीत आहात. परंतु कलियुगी मानवांना वेळ मिळत नाही. इतर मायावी कर्तव्यासाठी मात्र बराच वेळ त्यांच्याकडे असतो. परंतु नामस्मरण करायला त्यांना वेळ मिळत नाही.

सेवेक-यांनो किती वेळा प्रवचनात मी तुम्हाला सांगितले आहे, दिवसातील तुमचा किती वेळ फुकट जात असतो?

जाती घडी हि अपुली साधा !

आजचा दिवस गेला, उद्याचा दिवस आला. आयुर्मान वाढते आहे. अन् प्रत्येक मानवाच्या आयुर्मानाची एक मर्यादा किती आहे हि ठरलेली आहे. मग आयुष्यात मिळवावयाचे काय? तर नामस्मरण. ती संपत्ती तुम्हाला जमवता येत नाही. नामाच्या या महान चित्-शक्तीनेच या अघोरांचा नाश करता आला, तीच चित्-शक्ती तुम्हाला बहाल केलेली आहे. ध्यान करा. नामस्मरण करा अन् तीच चित्-शक्ती मिळविण्याचा, संचय करण्याचा प्रयत्न करा. हीच ती भक्ति.

सप्तऋषी देखील याच मार्गाने गेलेत. संतांनी देखील याच मार्गाचा अवलंब केला. आज ते सर्व सताच्या सान्निध्यात आहेत. आपणाला माहित आहे – कित्येक कोटी अघोरांचा नाश झाला. शुद्धीकरणात ज्योतींचे तुकडे तुकडे करून नाश करण्यात आला. त्या ज्योती सांधण्याची शक्ती केवळ अनंतांची आहे. इतर कोणीही ते करू शकणार नाही.

आपण जाणताच कि अघोर ज्योतींचे सुरुवातीला तुकडे न केल्यामुळे त्या पुन्हा परत येत होत्या. नकली क्षीराब्धी बनलेला जालंधर आणि त्याचे सहकारी त्या नाश केलेल्या ज्योतीना वर काढीत होते. नंतर आम्ही ज्यावेळी बंधने टाकायला सुरुवात केली तेव्हा नकली क्षीराब्धी काही करू शकले नाहीत. वलय टाकल्यानंतर वलयाच्या आत त्याला काही करता येईना.

अशाप्रकारे आम्हाला शिक्षण घ्यायला लावले कोणी? तर या अघोरानीच. परंतु शेवटी विजय कोणाचा झाला, तर सताचाच ! भक्तीचाच विजय झाला ना.
वृंदा वर्तुळात जावून राहिली. सताच्या वर्तुळात शैवानी तिला आत नेवून ठेवले. तिची भक्ति श्रेष्ठ होती, तिची तप:श्चर्या खूप, पतिव्रता या एकाच नात्याने तिला सर्व अधिकार होते. त्रिगुनांना देखील त्यांच्या स्थानावरून या अघोरांनी हाकून लावले होते. कलीयुगात या अघोरांनी हि अशी त-हा करून ठेवली होती. परंतु या अघोरांचा शेवटी नाश भक्तीच्या अंगानेच केला गेला ना?

भक्तीचे अंग म्हणजे अखंड नाम ! महान चैतन्य शक्ती, चित्-शक्ती म्हणजेच अखंड नाम होय. या नामाच्या जोरावर या अघोरांचा नाश करता आला. केला गेला.

अनंताचे संदेश घेणे तर ते केवळ नामाच्याच सत्तेने. म्हणून नामस्मरण श्रेष्ठ. भक्तीचे हे मूळ द्वार आहे. नामाशिवाय भक्तिचा दरवाजा उघडणे शक्य नाही. तेथे अहंकार उपयोगाचा नाही. लबाड्या उपयोगाच्या नाहीत, सद्गुरूंना बनविणे उपयोगाचे नाही, या सर्वस्वाची नोंद होत असते. सद्गुरूंच्या नजरेतून हे सुटणे शक्य नाही.

ज्याचे अखंड नाम तुम्ही घेता, ज्याचे स्मरण तुम्ही करता तेच अखंड नामाच्या गतीने तुमच्यातच वास करून असतात. तुमच्या वेगळे जर ते नाहीत तर त्यांना तुम्ही कसे बनवू शकाल?

सद्गुरूंना सेवेकरी काही कमी त्रास देतात का? पण सद्गुरूंनी तो त्रास असे कधी म्हटले आहे का? ते विचार करतात. अरे या मानवी सेवेक-याने किती जन्म घेतले आहेत अन् आता जर तो पून्हा अनाठायी गेला तर कुठे व कसा भटकेल हे सांगता येत नाही. हि चिंता सद्गुरूंना असते. किती श्रेष्ट्त्व आहे हे, हे लक्षात घ्या. ते क्षणिक पाहत नाहीत.
                                           पुढे चालू...........(५)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: