रविवार, १९ ऑगस्ट, २०१८

*भक्ति*

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*

आपला भक्ति मार्ग निराळा आहे. अध्यात्मिक केंद्राच्या अनुसंधनाने, त्यामुळे सर्व समान पातळीने वागायचे. ध्यानधारणा गती व अखंड ज्ञान.

आपल्याला त्या ठिकाणी जाण्यास प्रकाश अनुभवावा लागतो. दृष्टी नासाग्री ठेवून बसावे लागते. कारण मन एकाग्र रहाण्यासाठी. दृष्टी उघडी ठेवून सुद्धा ध्यान करता येते. म्हणजेच ती केवळ प्रकाशित ज्योत पाहिजे. ते आपोआप दृष्टी फेकणार!

आपल्या भक्ति मार्गात आपण कोणत्या हेतूने बसतो. तुम्ही मला ओळखून घ्या अन् तीच मुर्ती डोळ्यासमोर ठेवून नामस्मरण करायचे. ते आपोआप होत असते व स्थिर होता येते. आपल्या आसनाचा भक्तिमार्ग असा आहे.

24 तासातून काही वेळ समर्थ चरणात घालवावा, ध्यानधारणा झाल्याशिवाय पूजेला अर्थ नाही. आपल्या घरीसुद्धा आपल्याला ध्यान करता येते. तो वेळ तुमचा परमेश्वराच्या ठिकाणी रूजू होतो, एरवी नाही. त्यांची पहाणी बरोबर असते. तुम्ही त्यांना बनवायचा प्रयत्न केला तरी ते बनायचे नाहीत.

सत् तत्व प्रेमळ आहे पण तितकेच वज्रापेक्षाही कठीण आहे. सद्गुरु वेळप्रसंगी लाघव का करतात? अनाठायी कोणावर लाघव करणार नाहीत. पण ही ज्योत चार तत्त्वांच्या निराळ्या गतीने चालल्यास ते लाघव करतात. एकदा समर्थांनी लाघव केले तर पूर्ण क्षमा केल्याशिवाय ते पूर्ण होणार नाहीत. त्यासाठी त्याला चुका सांगाव्या लागतात. वर वर चुका तसे वर वर क्षमा! लाघव हे फार निराळे आहेत. ते सेवेक-याला कासावीस करून सोडतात.
टायपिंग: श्री सुभाष भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: