मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

हरीविजय

*प. पू. श्री सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची यांची अमृतवाणी*
           
हरीविजय नाव पडण्याचे कारण म्हणजे कृष्णावतारामध्ये त्यांनी लाघवी तऱ्हा केलेली आहे. तू एक तर मी दुप्पट.

कृष्णाने अवतारामध्ये काय केले. वासुदेव व देवकी यांच्या लग्नाच्यावेळी कंसाने आकाशवाणी ऐकून आपल्या बहिणीला खाली पाडली. तेथे नारद हजर झाला. कंस म्हणाला, "हिच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो माझा वध करणार म्हणून हिचा वध करतो." नारद म्हणाले, "अरे कंसा बुद्धिमान असून तू मुर्ख कसा? आताच तू पापाचा धनी का होतोस?" तरी त्याने तिला बंदिशाळेत टाकली. जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला शिळेवर आपटायचा.

शेवटी एक बालक येण्यापूर्वीच देवकीला कृष्ण दिसला. ती कृष्णमय झाली होती. तिने लहान बालक पाहिले. नंतर ज्यावेळी शुद्धीवर आली त्यावेळी आकाशवाणी झाली "तुम्ही घाबरू नका. तुम्ही याला गोकुळात यमुनापार ठेवा."

तेव्हा वसुदेवांनी धीर केला. कृष्णाच्या स्पर्शाने बंदिशाळा उघडली. तोपर्यंत कोणाला जाग आली नाही. सर्व शांत. यमुना दुथडी भरून वहात होती. तेव्हा परत आकाशवाणी झाली "तू घाबरू नको."

बालकाचे पाय पाण्याला लागताच ती दुभंग पावली. त्यावेळी नंदाची मुलगी मृत अवस्थेत असलेली वसुदेवांनी आणली व मुलाला तेथे ठेवले.

नंतर कंसाला मुल झाल्याचे कळले. परमेश्वर कसे सूत्रधार आहेत पहा? तो रागाने तिला आपटणार तोच झटक्यात ती कडकडली, "हे पाप्या तुझा शत्रू गोकुळात वाढत आहे."

हिच ती अबुनिवासीनी देवी होय. हिच स्थिर राहिली आहे. त्यावेळी कंस हताश झाला. यदुकुलोत्पन्न कंस होता. कृष्णाला ठार मारण्यासाठी त्याने लाघवांनी माणसे पाठवली पण त्यात त्याला यश आले नाही. परंतु त्या बालस्वरूपाला सर्व गती होती. नंतर यदुकुलात कृष्ण वाढू लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: