गुरुवार, २ ऑगस्ट, २०१८

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

*प. पू. सद्गुरु स्वामी भगवान महाराजांची अमृत वाणी*

*देही देखीली पंढरी । आत्मा अविनाशी विटेवरी ।।*

चोखोबा हा जातीने महार असून नितांत आदरणीय होता. त्याची कृती सत् व अभिमान रहित शुध्द अशी होती. तो म्हणे, "मला तुम्ही बनवले, तरी  विठ्ठलाला कुणी बनविणारे नाही."
चोखोबाची वर्तणूक निष्कलंक होती.

संत म्हणजे शांत, विठ्ठल म्हणजे चैतन्याचा गाभा! चैतन्याचा गाभा म्हणजे बाहेरील ज्योतीची निरज्योत. स्वात्म अनुभव घेण्यासाठी बालरूप घेतात. चित्घन चकचकीत हि-याप्रमाणे असतात.

पांडुरंग चोख्यासाठी सर्वस्व होते. कोणताही संत असला तरी त्याला सद्गुरुविना दर्शन नाही. विठ्ठलाशिवाय त्याला दुसरे काही माहित नव्हते. सद्गुरूंनी त्याला दर्शन दिले. त्याचा मूळ उद्देश नितांत भक्ति हा होता. शुध्द नितांत भक्ति हे उच्च पातळीचे ध्येय आहे. त्या भक्तिमध्ये कोणत्याही तऱ्हेचे तरंग निर्माण होऊ देऊ नयेत.

समर्थ कस पहातात. ती ज्योत ठामपणे आहे, निष्कलंक आहे कि मायावी आहे? तुम्ही श्रद्धेने आपल्या कर्तव्याने वाटचाल करा. ते अनंत व्यापक आहेत. अशा अनंतना सर्वस्वाची गती आहे.

कुणी निंदो वा वंदो आपला स्वहिताचा धंदा गमावता कामा नये. सद्गुरु तुमच्या पापसंचिताचा नाश करून तुम्हाला सत् पदाची ओळख करुन देतात.

आंधळ्याला ज्याप्रमाणे काठी त्याप्रमाणे भक्ताला सद्गुरु ही काठी आहे. ती ज्योत सताच्या आदेशा बाहेर नाही.

"आपण जे काही कर्तव्य करता, त्या कर्तव्यात असलेल्या काही मायावी ज्योतीना परब्रह्म म्हणजे पैसा वाटतो."

आपण जन्माला आल्याबरोबर आमच्या बरोबर काय असते? स्थूल संपत्ती नसून सत् किंवा असत् असते.

"सत् चित् झाले म्हणजे सच्चिदानंद होते."

काही मानव म्हणतात कि माझे समर्थ मजला कष्टाचे फळ देतात. समर्थ आहेत तर मला काय काळजी? तर आपण निमित्त आहोत, जे काही आहेत ते विठ्ठल आहेत. कर्ते करविते समर्थ आहेत. वैकुंठनायक तेच समर्थ!
टायपिंग : श्री सुभाष भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: