Religious लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Religious लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ मार्च, २०१२

अजपा-जप ......भाग तिसरा.....!!!

सो ऽ हम् :
हा जो अनायासाने सहजासहजी जप होत असतो यांत कोणता मंत्र जपला जातो हे आपण पाहू. एकांतामध्ये स्वस्थ चित्ताने बसावे व श्वासोच्छवासावर लक्ष ठेवावे म्हणजे श्वासोच्छवासाचे वेळी सो ऽ हम् सो ऽ हम् असे शब्द उमटतात असे प्रत्यक्ष अनुभवास येईल. श्वास आत घेताना ‘सो’ व बाहेर सोडताना ‘हं’ अशा त-हेने सोहंचा हा अखंड जप सुरु असल्याचे ध्यानी येईल.
श्री समर्थ म्हणतात –
एकांती मौन धरून बैसे / सावध पाहाता कैसे भासे / सोहं सोहं ऐसे / शब्द होती //
ऐसी हे अ-जपा सकळासी / परंतु कळे जाणत्यासी / सहज सांडून सायासी / पडोच नये //
आपण जागृत अवस्थेत अगर स्वप्नावस्थेत असलो किंवा गाढ निद्रेतही असलो तरी हा जप आपल्यास नकळत पाण्याचे प्रवाहाप्रमाणे एकसारखा सोहं, सोहं, सोहं असा सुरुच आहे ! या अखंड जपात सोऽहम् असा जप होत असतो. या मंत्राचे अक्षराकडे पाहिले म्हणजे कळून येईल कि, स: व अहं अशी दोन पदे यामध्ये आहेत. यांचा अर्थ असा कि तो मी (आहे), वेदांत शास्त्राचे दृष्टीने याचा वाच्यार्थ व लक्ष्यार्थ निरनिराळा आहे.
वाच्यार्थ असा कि, अज्ञानाच्या उपाधीमध्ये – अविद्येमध्ये – गुरफटलेले आहे असे भासणारे चैतन्य, म्हणजे अर्थात अहं विशिष्ट बिंदुमात्र जीव, हा मायोपाधिक सर्व जगावर सत्ता चालविणारा ईश्वर आहे. हा अर्थ घेतला म्हणजे या मंत्रात जीवा शिवाचे ऐक्य दर्शविले आहे असे दिसून येईल!  
लक्षार्थाने विचार केला तर असे कळून येईल कि, आपले स्वस्वरूप जो अंगुष्टमात्र आत्मा, तो अखिलव्यापी प्रकाशरूप परमात्मा आहे. या दृष्टीने आत्म्याचे व परमात्म्याचे यांत ऐक्य दर्शविले आहे असे ध्यानी येईल ! या जपाचे सकार हे शक्तीबीज आहे व हकार हे पुरुष बीज मानिले आहे असे समजावे. सकार बीज नामरुपात्मक दृश्य जडाचा उद्भव व लय कळून येतो ! या जपासम्बधी कित्येकांनी असे सांगितले आहे कि, श्वास आत घेताना स: म्हणजे तो ईश्वर मी आहे अशी वृत्ती स्वासाबरोबर आत घ्यावी व श्वास बाहेर सोडताना अहं म्हणजे मी ही अहंकार वृत्ती बाहेर सोडावी. अशा त-हेने देहाच्या अहंकाराचा त्याग करीत जावे व ईश्वर वृत्ती सतत आत साठवीत जावी म्हणजे कालांतराने आपणच सर्वव्यापी ईश्वर आहोत असा साक्षात्कार होईल ! याचा अनुभव अभ्यासाशिवाय मिळणार नाही. हे सहज शब्द आहेत. ही सहज उपासना आहे.
समर्थ म्हणतात –
उच्चारेवीण जे शब्द / ते जाणावे सहज शब्द /
प्रत्यया येती परंतु नाद / काहींच नाही //
ते शब्द सांडूनी बैसला / तो मौनी म्हणावा भला //
हा जप सर्व प्राणीमात्र करतात. परंतु तो फक्त जाणत्यासच कळतो व त्याचे रहस्य त्यास कळते. या सहज जपाचे रहस्य कळून घेतल्यानंतर इतर कोणत्याही मंत्रजपाचे सायासात पडण्याचे कारण नाही. इतर जप हे मुद्दाम उच्चार करून करावे लागतात त्यामुळे नाशिवंत आहेत असे म्हणण्यास हरकत नाही.
उदाहरणार्थ दगड उत्तम घडविला व मोठ्या सायासाने त्याचा जरी देव बनविला तरी तो केव्हाना केव्हा भंग पावणारच. देव मात्र सर्वव्यापी व सहज आहे. अशा स्थितीत सहज असणा-या देवावर विश्वास ठेवण्याऐवजी नाशिवंत दगडावर कोण विश्वास ठेवील? त्याचप्रमाणे या सहज अ-जपा-जपावर भावना ठेवली म्हणजे सहज देवाची उपासना आपोआपच होते, सहज जप होतो, ध्यान घडते, स्तुति होते व ईशस्तवन होते. अशा त-हेने जी सहज सेवा होते तीच सर्वव्यापी ईश्वरास प्रिय होते. म्हणून याच जपाचे रहस्य समजून घेणे व त्याचा अनुभव घेणे हे श्रेष्ठ कर्तव्य होय ! आपल्या देहरूपी घरांत सुरु असणा-या या ज्ञानभांडाराचे जर आपण ज्ञान करून घेतले नाही तर निद्रेवी पुरुषाप्रमाणे स्थिति होते. निद्रेव्यास द्रव्याचा साठा तळघरांत असला तरी सापडत नाही म्हणून तो दरिद्री राहतो. खाली लक्ष्मी राहते व वर हा दरिद्री वावरतो अशी स्थिति होते ! तळघरांत द्रव्याचा साठा, भिंत्तीत द्रव्याचा साठा, खांबात व तुळवटांतही द्रव्याचा साठा ! अशाप्रकारे सभोवार द्रव्य असून आपण मध्ये कोरडा तो कोरडाच राहतो ! अशा परिस्थितीत जो करांत असतो त्यास अधिक दारिद्र्य येते. ईश्वराची ही काय अगाध करणी ? कित्येक द्रव्य पाहतात तर कित्येक त्याचा उपयोग करतात. हीच प्रवृत्ति व निवृत्ति होय ! म्हणून या सर्व गोष्ठी लक्षात घेवून अंतरीच्या नारायणाची ओळख करून घ्यावी.
     या मंत्र जपास मालेचे कारण नाही व मोजदादिचेही कारण नाही. ईश्वरानेच प्रत्येक दिवशी २१६०० इतका हा जप होतो असे अगोदरच ठरवून टाकले आहे. आपण जर काय करावयाचे असेल तर ते एवढेच की, या जापाकडे अनुसंधान वृत्ति ठेवावयाची. सकाम कर्म चित्तशुद्धीस कारण असते. चित्तशुद्धीकरता म्हणून का होईना या सहजासहजी होणा-या मंत्रजपाचे फळ, प्रत्येक स्त्री-पुरुषाने आम्ही वर उध्दृत्त केलेल्या शास्त्रोक्त जपविधीचे, दररोज प्रात:काळी सूर्योदयाबरोबर उदक सोडून पदरात का पडून घेऊ नये?
सौजन्य: षटचक्र दर्शन .......लेखक: श्री म वैद्य 

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१२

सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?


सद्गुरू कोण ? सद्गुरूंना कसे ओळखावे ?
      वंदेऽहं सच्चिदानंदम् ! भावातीतं जग्द्गुरूम !!
      नित्यं पूर्ण निराकारम् ! निर्गुणं स्वात्म संस्थितम् !! .......गुरुगीता
सद्गुरू म्हणजे देहधारी जडमूर्ती या भावनेने व अर्थाने त्याजकडे पहावयाचे नाही. तर याहीपलीकडे जावून सुक्ष विचारांती, सद्गुरू म्हणजे बुद्धीच्या अतीत असलेला आत्मा होय ! दुसरे काही नाही. हेच सत्य आहे. म्हणून त्याची प्राप्ती होण्याकरिता बुद्धीवानाने प्रयत्न केला पाहिजे. मूळमाया – जिस अविद्या असे म्हणतात – तिच्यायोगे देहाचे व जगाचे भान होते. आत्मसाक्षात्काराने तिचा निरास होतो व सच्चिदानंदस्वरूप प्राप्त होते. इतक्या उच्च अर्थाने विचार केल्यास नित्य, पूर्ण, निराकार व निर्गुण असे परब्रह्मस्वरूप हेच सद्गुरूंचे स्वरूप होय.
सध्या जनतेमध्ये शारीरिक व मानसिक दौर्बल्याबरोबर आत्मिक बलाचाही –हास होत आहे, असे दृष्टोत्पत्तीस येते. यावर उपाय काय?
समाजात एकी उत्पन्न होऊन त्याची सामाजिक, आर्थिक व अन्य त-हेने उन्नतावस्था होणे अत्यंत जरूर आहे; पण त्याचबरोबर पूर्वकालीन द्विजांमध्ये व हल्लीही काही विभूतींमध्ये वसत असलेले सद्गुण म्हणजे शांत वृत्ति, तेजस्विता, त्यागवृत्ति व समाधान; तसेच कर्तुंमकर्तम् शक्ति आदिकरून गुणांचा प्रकाश कसा होईल इकडेही लक्ष दिले पाहिजे.
समाज हल्ली त्रिविध तापाने पोळला आहे व त्याची अंतर्मुख दृष्टी होऊ लागली आहे तेव्हा उपरिनिर्दिष्ट गुणांचा अभाव होऊन ही अधोगती का झाली याचा खोलवर विचार करणे जरूर आहे. इतिहासाकडे पहिले तर असे दिसून येईल की, द्विजानी परिस्थितीप्रमाणे आपद्धर्म म्हणून पुष्कळ वृत्ति स्वीकारल्या व वैशिष्ट्य कायम ठेवून हिंदुधर्म राखण्याचा प्रयत्न केला; परंतु आपद्धर्माची मर्यादा सध्या येथपर्यंत गेली आहे की, द्विजांनी – विशेषत: ब्राह्मणांनी – जवळजवळ आपले सर्व आचार व कर्मे सोडली, असे म्हणण्यास हरकत नाही. तसेच आध्यात्मिक शक्ति वाढविण्याचे त्यांना नेमून दिलेले जें ज्ञान व उपसानादि मार्ग, तेही त्यांनी अजिबात सोडले. सध्याच्या परिस्थितीत आचार यथासांग होत नाहीत, अशी तक्रार ऐकू येते.  परिस्थितीनुरूप करणारास ते कठीण आहेत असेही नाही; किंवा सर्वतोपरी शक्य नाहीत असेही नाहीत, तरी मानसिक उन्नती करून घेणे व तद्द्वारा आध्यात्मिक तेजस्विता वाढविणे ही गोष्ट सर्वांस साध्य आहे आणि तशी ती सध्याच्या काळी वाढविणे अत्यंत जरूर आहे.
हल्ली बुद्धीप्रामाण्यास फार महत्व देण्यात येते. सद्सद्विवेकबुद्धीप्रमाणे प्रत्येकाने वागावे, असे सांगितले जाते. पण ही सद्सद्विवेकबुद्धी कोणती? याची मात्र कल्पना बहुतेकांस नसते.
हल्ली, सद्सद्विवेकबुद्धीचा अर्थ – मनास रुचेल व वाटेल ते असा घेतला जातो. परंतु हे चुकीचे आहे. याचा खरा अर्थ असा की, सत् म्हणजे परब्रह्म वस्तू व असत् म्हणजे मायिक सर्व क्षर सृष्टी या दोघांचा विवेक म्हणजे सत् कोणते व असत् कोणते त्याचा विचार करून सद्वस्तुचे ग्रहण करून असद्वस्तूचा त्याग करणे होय. अशी जी बुद्धी ति सद्सद्विवेकबुद्धी होय.
सद्सद्विवेकबुद्धीने खरोखरीच सर्वानी वागावयास हवे. अशा बुद्धीच्या विचाराने वागले म्हणजे अविद्येचा नाश होऊन आत्मत्वाचे ज्ञान होते व त्यामुळे सामर्थ्य प्राप्त होते. विद्येच्या योगाने प्राप्त झालेल्या या सामर्थ्यामुळे अमृतत्व मिळते, असे केनोपनिषदात सांगितलेले आहे; म्हणून द्विजांनी आपल्या वेदांनी जी उपासना सांगितली आहे, तीच करावयास हवी व त्यातच त्यांचे आत्यंतिक कल्याण आहे.
ब्राह्मण – ब्रह्म जाणे इति ब्राह्मण:, ज्याला ब्रह्माचे ज्ञान झालेले आहे असा तो मग कोणीही असो, तोच खरा ब्राह्मण होय. प्रणवोपासना या ग्रंथात लेखकाने दिलेल्या टीपेनुसार ‘ब्राह्मण’ हा शब्द ब्रह्म जाणण्याची इच्छा करणार या अर्थी व ज्याला गायत्रीची उपासना करण्याचा अधिकार आहे असा या अर्थी वापरण्यात आला आहे असे म्हटले आहे. (पृष्ठ : २१)   
ज्ञानवान जें ब्राह्मण होते त्यांनी आपली उपासना दृढ करून व सतत अभ्यासाने ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतले. प्रणवरूप जी गायत्री तिचेच अखंड ध्यान करून तिचे ज्ञान प्राप्त करून घेतले. व्यक्त ओंकार व अव्यक्त ओंकार यांचा साक्षात्कार ते मात्रालयाभ्यासाने करून घेत व अखंड ब्रह्मानंदात निमग्न होत ! अशी ही सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान, अर्धमात्रात्मक प्रणवसंवितीची उपासना सोडून भलत्याच मार्गाने जाणे म्हणजे अधोगति प्राप्त करून घेणे होय. ब्रह्मा, विष्णु व महेश ज्या आदितत्वाची उपासना करतात अशी सर्वश्रेष्ठ उपासना सोडणे म्हणजे मूळ सोडून शेंडा धरण्यासारखेच होय. 
प्रणवोपासना ही सर्व सांप्रदायिक उपासनांची जननी आहे. या उपासनेचे प्रयोजन म्हणजे आत्मा व परमात्मा यांचे ऐक्य साधून निरंजनस्वरूपी लीन होणे, हे होय. अविद्यादि बीजांचा समूळ नाश होऊन ब्रह्मसाक्षात्कार होणे व निरतिशयानंद सुखप्राप्ति होणे, हे याचे फल आहे आणि दृढ अभ्यास हे साधन आहे व ब्रह्मसाक्षात्कार हे साध्य आहे.
ज्ञानमार्गात ‘गुप्त’ असे काही नाही. थोर सत्पुरुषांनी व साधुसंतांनी आपले अनुभव ग्रंथरुपाने स्पष्टपाने जगापुढे ठेवले आहेत. ज्ञान स्वयंप्रकाशरूप आहे.  
सौजन्य: प्रणवोपासना .............श्री म वैद्य  

रविवार, २६ फेब्रुवारी, २०१२

मुख्य सद्गुरूंचे लक्षण


मुख्य सद्गुरूंचे लक्षण / आधी पाहिजे विमल ज्ञान /
निश्चयाचे समाधान / स्वरूपस्थिती //
म्हणोनी ज्ञान वैराग्य आणि भजन / स्वधर्म कर्म आणि साधन /
कथा निरुपण श्रवन मनन / नीती न्याय मर्यादा //
समर्थ ग्रंथराज ..........द. ५ स.२

गुरुचे कृपें सभाग्यां कुंडलिनी जागृती सुलाभ जयां /
सद्गुरू संनिध नसतां मार्गी कोठें असो दिसेल तयां //


श्रद्धेनें गुरुविण जरि करी नर अभ्यास नित्य नियमानें /
ग्रंथोक्त, युक्त पथिं हा त्वाम लावुनि दु:ख कां न विलया ने ?

सहस्रदलपंकजे सकलशीतरश्मिप्रभम् !
वराभयकरांबुजं विमलगंधपुष्पाम्बुजम् !
प्रसन्नवदनेक्षणं सकलदेवतारूपिणम् !
स्मरेत् शिरसि हंसगं तदभिधानपूर्व गुरुम् !! (गुरुगीता) 



शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग तिसरा)

सगळे कसे आहे? तर महेशासारखे. त्यांची उपासना कशी आहे? तर “ॐ नम: शिवाय”. पण जरी महेशचे गण असले तरी सताला आदर देतात.

आपणास कल्पना आहे, समंधाने आपल्या ज्योतीला त्रास देऊन हैराण केले, तेव्हा आम्ही देखील ठरविले या समंधाला हैराण करून त्याचा नाश करावयाचा. मग पितामहानां सांगून महेशाकडे एका भैरवाची मागणी केली.

आता तुम्ही सांगा, भैरव असून तो आसनासमोर कसा काय नतमस्तक झाला. अन् आम्हालाच विचारता झाला, “काय संदेश आहेत?” आता हे कसे काय?

लक्षात घ्या, त्रिगुण सताला मानतात अन् त्यांचे लष्कर देखील सताला मानते. तुम्ही पाहता, महान महान दैवते देखील सताला मानतात. सध्याच्या युगात कोणालाही सत् भक्ति नको, कारण, सत् भक्ति कशी आहे? तर शांत ! आज ही जगात चालली आहे ती भक्ति नव्हे. भक्ति फार वेगळी आहे.

आपल्याला शुभ्र प्रकाश पाहिजे. नामस्मरण करा. मन संपूर्ण सत् मय करा. लक्षात घ्या, मन सत्-मय कसे होईल? तर संपूर्ण अर्पण केल्याखेरीज मन सत्-मय होणे शक्य नाही. म्हणून आम्ही आसनावरून सदोदित सांगत असतो, सेवेक-यांनो, मन सत् मय करा. काही ज्योती थोड्या अवधीपुरत्या मन सत्-मय करतात अन् पुन्हा मायाबाजारात अडकल्यानंतर सतापासून लांब जातात. मन सत्-मय करतांना आशी-पाशी बघत बसू नका. मन सत्-मय करण्याची तुमची प्रवृत्ती असते, हे आम्ही मानतो. पण त्या प्रकृत्तीचा देखील कस घेतला जातो. जो सत्-मय बनण्याच्या प्रयत्नात असतो, त्यातच आजूबाजूला मोहमाया पसरवली जाते. खरोखरीचा भक्त असेल तर तो म्हणतो मला एकच माहिती आहे, माझे सत् हेच खरे आहे. अन् असाच भक्त टिकतो. पण बाकीचे दुरावतात. लक्षात घ्या, आपल्याबरोबर काय जाणार? सत् वा असत कृती! सत् असेल तर सान्निध्य देतील पण असत असेल तर सान्निध्य देणार नाहीत.
ज्ञानमार्ग म्हणजे प्रकाश ! हा ज्ञानमार्ग कशामुळे प्राप्त होईल? तर भक्तीच्या अनुषंगाने गेल्यानंतर ज्ञानमार्ग प्राप्त होईल. भक्ति म्हणजे काय, तर नामस्मरण !  अशा त-हेने भक्तिमार्गाने वाटचाल करीत गेल्यानंतर ज्ञानमार्गात पदार्पण करता येते. तुमच्यातील ज्योतींना सत्-पदाच्या आसनावरून अखंड नाम दिलेले आहे. पण काही ज्योतींना अजून ते मिळालेले नाही अशा काही भावी ज्योती देखील आहेत. अशा ज्योतीं देखील सद्-गुरु ! सद्-गुरु ! असे नामस्मरण करतील तर त्या देखील भक्तिमार्गाने जात आहेत असे म्हणता येईल.

ज्ञानमार्गात पदार्पण केव्हा होते? तर ज्यावेळेस सद्-गुरु अनुग्रहित करतात तेव्हा ! त्यावेळी ज्योतीस ज्ञानमार्ग मिळाला असे म्हणता येईल. प्रकाश मिळाल्याखेरीज ज्ञानमार्गाची गती सापडणार नाही. प्रकाश मिळविण्यासाठी सद्-गुरूंची सेवा करणे हे प्रत्येक सेवेक-याचे आद्य कर्तव्य आहे. सद्-गुरु प्रसन्न होतील, आदेश सुटतील, प्रणव मिळतील, तद्-नंतर अखंड नाम
सत्-पदावरून मिळेल. नंतर तुम्हाला ज्ञानमार्गाची चाकोरी माहित होईल, जाणीव मिळेल.
  
ज्ञानमार्ग आहे कठीण पण तसा तो सुलभही आहे. सुलभ कसा? जर ज्योतींचे मन अत्यंत शुचिर्भूत शुद्ध असेल तर अशा ज्योतीला ज्ञानमार्ग सुलभ आहे. पण या कलीयुगात मायावी मन हेलकावे खात असते. जरी आज या दरबारात बसून अत्यंत शुद्ध-शुचिर्भूत होऊन तुम्ही प्रवचन ऐकत आहात, पण या दरबारातून खाली उतरल्यानंतर ! इथे तुम्ही प्रवचन तन्मय होऊन ऐकता पण येथून गेल्यानंतर !

हे “पण” आहे ते संपले की मग खरा ज्ञानमार्गाचा मार्ग चोखाळता येतो. त्याकरिता हा “पण” संपला पाहिजे. परंतु हा “पण” संपत नाही. ज्ञानमार्गाच्या गतीने जायचे असेल तर “पण” आणि “परंतु” असता कामा नये. तेथें ठामपणा पाहिजे की मला हे केलेच पाहिजे. दृढनिश्चयी झाले पाहिजे.

भगवंतानी अर्जुनाला सांगितले होते, “यदात्मा दृढ:निश्चयी मे भक्त: समप्रिय:”. जर आपण चालढकल केली तर ज्ञानमार्ग आपल्याला कसा मिळवता येईल?

ज्ञानमार्गाकरिता नामस्मरण हे अन्न आहे, खाद्य आहे. अखंड नामाच्या गतीशिवाय ज्ञानमार्ग मिळणे कठीण आहे. अखंड नाम प्राप्त झालेलेच ज्ञानमार्गाच्या गतीने जावू शकतील. पण अखंड नाम ज्यांना प्राप्त झाले आहे अशा ज्योती कशा हव्यात तर दृढ:निश्चयी. चालढकल करणा-या असून उपयोग नाही. ज्योतीने मनाशी असा दृढ:निश्चय करायला हवा की उठता, बसता मी नामस्मरण करीन. कारण नामस्मरणापलीकडे दुसरा मार्ग नाही. लक्षात घ्या, आम्ही देखील सदोदित अखंड नामाच्या गतीत असतो. नामावेगळे या त्रिभुवनात दुसरे काहीही नाही.

ज्ञानाचा, चैतन्याचा गाभा म्हणजेच नाम आहे. हा चैतन्याचा गाभा यालाच पांडुरंग म्हणतात, तेच नाम आहे. पांडुरंग हेच नाम आहे. पांडुरंग नामातीत असल्यामुळे तुम्हाला आकार दिसत नाही, पाहता येत नाही.  ते साकारल्यानंतर तुम्हाला आकार दिसतो, हे नामच सर्वस्व आहे. म्हणजे ज्ञानमार्गाचे मूळ कोठे आहे, तर सद्-गुरुंजवळ ! मग ज्ञानाबद्दल विचारणा कोणाकडे करायची, तर सद्-गुरुंकडे ! मार्गदर्शक कोण? तर सतच मार्गदर्शक आहेत. तुम्हाला सहाय्यभूत होण्यासाठी तत्वांना आदेश देऊन मदत करायला सांगतात. पण ज्योतीला जर प्रकाशाचा अनुभव नसेल तर पाठविणार कोठे?

तुकारामांनी म्हटले आहे, “ज्योतीच्या प्रकाशे पाहीन तुझे रूप”. बाबा चैतन्यांनी अनुग्रहित केल्यानंतर तुकाराम म्हणाले की, “माझ्या ज्योतीच्या प्रकाशाच्या सहाय्याने तुझे रूप माझ्यात कसे वास करीत आहे ते पाहीन.”

पण ज्ञानमार्गाशिवाय ते असे म्हणू शकले असते का? प्रकाशाची जाणीव नसेल तर ते असे म्हणू शकतील का? तसेच नामदेवांनी देखील म्हटले आहे, “डोळियांचा डोळा उघडिला, आनंदाच्या डोही पाहिले” म्हणजे प्रकाशाच्या गतीने मी आज पांडुरंगाला देवळात पाहत आहे, अन् माझ्यात देखील पाहत आहे. म्हणून ते पुढे म्हणाले, “कदा न विसरे पाय खेचारांचे”.

लक्षात घ्या, सर्वस्व व्यापून उरलेले ते सतच आहे. विठ्ठ्ल, पांडुरंग, विष्णू, ब्रह्मदेव हे सर्वस्व मायेने विखुरलेले आहेत. पण या सर्वात असून अलिप्त असणारे तत्व म्हणजेच सत् आहे. मग ठाम होऊन सताचाच पाठपुरावा केला तर आम्ही खात्रीने सांगतो, तुम्हाला ज्ञानमार्ग सापडेल.

एकाच योनीत हे होणार नाही हे तितकेच सत्य आहे. एका योनीत हे प्राप्त होत नाही, त्याकरिता कितीतरी जन्म घ्यावे लागतात. आजपर्यंत तुम्ही किती जन्म घेतलेत, किती जन्मात तुम्ही सान्निध्यात होता, अन् किती जन्म तुम्ही घेणार आहात याची सर्वस्व जाण त्या अनंतांना आहे. परंतु आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. आपल्याला मानव जन्मात कशाला पाठविले आहे याची आपण जाण घेतली पाहिजे. माया सर्वास्वात विखुरली आहे. आपल्याला माया नाही तर सत् संचय करावयाचा आहे. मायावी त-हेने नव्हे तर सत् संपत्तीने सेवेकरी करोडपती बनला पाहिजे. अखंड नामाच्या गतीने तो अब्जोपती हवा.

अनुग्रहित ज्योत, प्रकाशित ज्योत कधीही चुकीच्या मार्गाने जाणार नाही हे आम्ही खात्रीने सांगतो. कारण चुकीच्या मार्गाने गेली तर लाघव होण्याचा संभव असतो. चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर सत् तुम्हाला सोडणार नाहीत. त्यांना कल्पना असते, इतके जन्म या ज्योतीने घेतलेले आहेत, ज्योतीला सान्निध्य मिळालेले आहे, सान्निध्य देऊन अनुग्रहित केलेले आहे, अखंड नाम सत्-पदाच्या आसनावरून बहाल केलेले आहे. एवढे असून देखील ज्ञानमार्गाची चाकोरी सोडून हा विचित्र मार्गाने कसा काय जात आहे? म्हणून थोडेसे लाघव करतात. प्रेम असल्याशिवाय लाघव होणार नाहीत. आम्हाला माहित आहे, या कलीयुगात खूप ज्योती व्यापलेल्या आहेत. या व्यापातून सुटण्यासाठी रानोमाळ भटकतात. अनेक मार्ग पत्करतात, पण भक्तिमार्ग म्हटले की बिचकतात.

एकदा असेच व्यापलेली एक ज्योत, पेशाने शिक्षक, दर्शनाकरिता अली, अन् आम्हाला उलट सुलत प्रश्न विचारू लागली. आम्ही त्यांना विचारणा केली, आपण एका देवाचे तरी नामस्मरण योग्य त-हेने करता का? आज रामाचे नामस्मरण करता, तर उद्या कृष्णाचे करता. तर कधी शंकराचे करता, मग कोणता  देव आपणासमोर येणार? तुम्हाला राम कोण, हेच जर कळलेले नाही, मग नामस्मरणाचा उपयोग काय? ज्योत विचारती झाली, मग आम्ही काय करावे? आम्ही सांगितले, आहे राम म्हणजेच ओंकार. त्यांचेच हे स्थान आहे. या स्थानात भक्ति आहे. ज्योतीला भक्ति नको होती, त्यांना हवी होती माया. त्या ज्योतीबरोबर असलेली दुसरी ज्योत सांगू लागली की आम्ही देखील गणपतीची उपासना करतो. आम्ही त्यांना सांगितले, “गणपती म्हणजे सुद्धा ओंकारच”! तुम्ही ओंकारांची उपासना करून देखील तुम्हाला त्रास होत आहे, म्हणजे नक्कीच तुमचे काही तरी चुकत असले पाहिजे. काय चुकत आहे हे माहित करून घेण्यासाठी तुम्ही भक्ति केली पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला तुम्ही काय चुकत आहात ते कळणार नाही. तुम्ही संकष्टी, विनायकी असे उपास करता. पण उपास गणपतीने करायला सांगितलेले नाही. गणपतीने सांगितले आहे, तुम्ही पोटभर जेवा, पण माझे ध्यान करा. तुम्ही एवढे उपास करता मग गणपती तुम्हाला प्रसन्न का झाला नाही?  दोन्ही ज्योती निरुत्तर झाल्या. मग आम्ही सांगितले, श्रद्धा असेल तर इथे या, आसनाचे घटक व्हा. मग पहा काय होते ते? आमच्या येथे भगतगिरि नाही. वेडपट लोकं देखील मानवात भटकत आहेत. पण भक्ति करा म्हटल्यानंतर यांना जणूकाय ओझे उचलल्यासारखे वाटते.

भक्ति ओझे वाटावी अशी आहे का हो? तर नाही. अशा वेडपट मानवांना नाम म्हणजे काय हे कळले असते तर? अरे ! नाम ही कामधेनु आहे. नाम म्हणजेच सर्वस्व आहे. असे मानव जर म्हणू लागले, नामस्मरण सोडून बाकीचे सांगा तर मग अशा लोकांना काय सांगावे? अनंतांनीच आम्हाला सांगितले आहे, “नाम म्हणजेच मी ! मी नामातीत आहे”. मग जर ते नामातीत आहेत मग ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र त्यांच्या वेगळे आहे का? ज्ञानमार्गाचा शोध लागल्याशिवाय त्यांचा शोध लागणार नाही. म्हणूनच ज्ञानमार्गाने जाणे, प्रकाशाच्या गतीने जाणे यथायोग्य होय. भक्तिमार्गाशिवाय ज्ञानमार्ग प्राप्त होणार नाही. प्रथम भक्ति अन् मग ज्ञान. म्हणजें प्रथम नामस्मरण ! नामस्मरणाखेरीज ज्ञानमार्ग प्राप्त होणार नाही. प्रथम भक्तिमार्ग अन् तदनंतर ज्ञानमार्ग ! आपला सेवेकरी नामस्मरणाच्या गतीने जावू लागला तर आज ना उद्या त्याला प्रकाशाचा मार्ग सापडेल. पण आपली जी चार तत्वे आहेत, ती मात्र त्याने टिकवली पाहिजेत. या चार तत्वांना तुम्ही चार वेद म्हटलेत तरी चालतील. अर्थात हे आमचे चार साधे वेद आहेत. जो सेवेकरी या चार वेदांचे काटेकोरपणे पालन करील त्याला एकदातरी मी स्थुलाने दर्शन देईन असे अनंताचे संदेश आहेत. स्थुलाने दर्शन देईन पण ओळखणारा पाहिजे. पण सद्गुरूंना, अनंतांना जर तुम्ही बनवू लागलात तर चूक कोणाची? तर चूक भक्तांची येणे सेवेक-यांची. सेवेक-याने जर ठाम निश्चय केला की मी बनवा बनवी करणार नाही अन् चारी तत्वांचे पालन करीन मग दर्शन कां बरे मिळणार नाही? एकदा कां चरणांवर स्थिर झालात की प्रकाश उजळलाच म्हणून समजा. तुकारामांनी म्हटले आहे, ज्योतीच्या प्रकाशे पाहीन तुझे रूप !!
एकदा कां प्रकाश उजळला मग दिवसही नाही अन् रात्रही नाही. मग ते सतत चालूच असते. दिवसाही चालू अन् रात्रीही चालूच राहतो. कबीराने म्हटले आहे, “बुझे नही बत्ती”. तो प्रकाश मिळवणे म्हणजेच ज्ञानमार्ग मिळवणे. सद्गुरु कृपेने मिळालेले जें एक अखंड नाम, ही जी एक संपत्तीची ठेव मिळालेली आहे ती वाढवून परमगतीला जाता आले पाहिजे. अखंड नामाची करोडपती संपत्ती मिळवली पाहिजे. मायावी संपत्ती नव्हे. अखंड नामाची संपत्ती वाढणे म्हणजे संचित संपविणे होय.

आपण पाहतो, आपले गुरुदेव वशिष्ठ व इतर ऋषी-मुनी आज वर्षानुवर्षे अखंड नामात आहेत. त्यांचे नामस्मरण चालूच आहे. ऋषी-मुनी म्हणतात, हेच सर्वस्व आहे. या पलीकडे आम्हाला दुसरे काही नको. म्हणून आज ते सतत अनंताच्या सान्निध्यात आहेत. जसे, दृश्यांना प्रेम असते तसे अदृष्यांना देखील प्रेम असते. तुम्ही पाहता, पितामह सतत जेथे सत् आहे तेथें असणार. असे का ? तर  त्यांच्या संपत्तीची गणना करता येणार नाही. तुम्हाला तेवढे जरी होता आले नाही तरी निदान सत् संपत्तीने लखोपती बना. असे लखोपती जर तुम्ही बनत गेलात, असे जर अखंड नामयुक्त झालात मग ज्ञानमार्गाला वेळ नाही. तो क्षणात प्राप्त होईल.
 
पूर्वी दरबारात सर्वांनाच प्रकाशित करत असत परंतु त्यांना प्रकाश टिकवता येत नसे. म्हणून आता संदेश दिलेत, कष्ट करून प्रकाश मिळवू देत. त्यांना आयते मिळाल्यानंतर त्याची किंमत नाही. बाकीचे कसलेही कष्ट नाहीत, पण मन केन्द्रीकरणाचे कष्ट आहेत. जर तुम्ही मायेत केंद्रीकरण करू शकता मग सतात कां केंद्रीकरण करू शकत नाही. सताचेच नाम आहे. नामावेगळे सत् नाही अन् सतावेगळे नाम नाही. मग नामस्मरण करायचे कोणी ? भक्ताने केले पाहिजे. पण आपण ते करतो का? तर करत नाही. कां करत नाही? कारण आपल्याला माया श्रेष्ठ वाटते. आपल्याला मान पाहिजे, सन्मान पाहिजे, संपत्ती पाहिजे, आराम पाहिजे अन् हे सर्वस्व मिळाले तर आपले बाबा खरे ! या भक्तीमध्ये सर्वस्व सामावलेले आहे. मुक्ती-मोक्ष  आहे, सायुज्यपद आहे, संसार देखील आहे.

अरे ! सगुणाचे सार म्हणजेच संसार ! सगुणात मी नाही असे तत्वच नाही. तुमच्या मनाजवळ जर चंचल वृत्ति असेल तर तुम्ही ज्ञानमार्गाने जावू शकाल? आपण मानसिक त-हेने व्यापलेलो असलो तर आपल्याला शांत निद्र येत नाही. म्हणून सर्वात प्रथम सद्गुरु सेवेक-याला संसारात स्थिर करतात अन् मगच त्याला नामस्मरण करायला सांगतात, पण सेवेक-याकडे आळस असल्यानंतर काय होईल. आळसामुळे शरीराला विश्रांती मिळते. नामस्मरण करायला नको, ध्यानधारणा करायला नको. मनाला ओढण लावायला नको. अशाने ज्ञानमार्ग मिळणे दुरापास्त आहे. प्रकाशाची जाण मिळणे हे देखील भाग्यच आहे अन् त्या प्रकाशाच्या गतीत दर्शन मिळणे हे त्याहूनही भाग्याचे आहे.

प्रकाश मिळाल्यानंतर तुम्ही स्थूलातून कारण देहांत जावू शकाल, महाकारण देहांत जावू शकाल. महाकारण देहातून अणु, रेणु, परमाणु पर्यंतही जावू शकाल. सगळीकडे सत् आहे. पण प्रकाश नसेल तर तुम्ही काय कराल? अनुभवाचे मिळविण्यासाठी ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्ग म्हणजे अखंड नामाचा स्त्रोत. नामस्मरण म्हणजेच अनंताचा जयजयकार ! मग अनंत म्हणतात की, तू मला प्रकाशात पाहू शकतील. अंधारातही मी तुला जाणीव देऊ शकेन. तुझ्यातच मी कसा वास करून आहे हे तू पाहू शकशील. हे सर्वस्व मिळविण्यासाठी प्रथम पायरी कोणती तर अखंड शुचिर्भूतपणा पाहिजे. मनामध्ये विकल्प चुकून येता कामा नये. सद्गुरूंच्या बाबतीत तर अत्यंत शुद्ध पाहिजे. कुणाला टिचकी मारून काय वदवतील ते सांगता येणार नाही. पण अशावेळी सेवेकरी मनाने अत्यंत ठाम असला पाहिजे. अशा ठाम सेवेक-याला ते सांगतात तू नामस्मरणाने वाटचाल कर. सद्गुरु तुमचे कधी नुकसान करतील असे आम्हाला वाटत नाही. सद्गुरु हे तारक आहेत. वेळप्रसंगी तुमच्यावर चिडतील, लाघव करण्याचे देखील आदेश देतील परंतु वेळ आली तर पाठीशी उभे राहतील. तुमच्या अंतर्यामी दयाघन तत्व आहे. सत्-पद हे दयाघन तत्व आहे.
समाप्त ..............

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

पाचवा प्रणववेद (भाग दुसरा)


पार्था तुझे मन तू माझ्यातच लय कर. माझेच चिंतन कर. माझ्यावेगळे तू दुसरे काही पाहू नको. मीच या त्रिभुवनात सर्वस्व भरून उरलेला आहे. आज ना उद्या मी तुला तुझ्या सर्व पापातून मुक्त करीन अन् माझ्यातच सामावून घेईन. आज हे कलियुग आहे, आम्ही कसे बरे तुम्हाला सांगू की तुमचे मन आम्हाप्रत लय करा. पण आम्ही एवढेच सांगू शकतो की तुमचे मन सत्मय केल्याशिवाय तुम्हाला पाचवा प्रणववेद पाहता येणार नाही. समजा, पाचवा प्रणववेद पाहता आला नाही तरी किमान सद्गुरु दर्शन तरी मिळावा. शुभ्रप्रकाश तरी पहायचा प्रयत्न करा. वर्तुळ पाहता पाहता ज्योत प्रगट होईल. पण हे सर्वस्व मन सत्मय केल्याशिवाय होऊ शकेल का? पण आजच्या या कलीयुगात सेवेक-याचे मन सद्गुरुमय होते का? आपल्या समक्ष दरबारात येणा-या ज्योतींची उदाहरणे आहेत. दोन तपे दरबारात येवून देखील ज्योत सांगते माझे काय चुकते ते मला ते कळत नाही. मग आता अशी ज्योत सद्गुरूंच्या ठायी मनाने लय झाली होती असे म्हणता येईल का ? अरे ! तुमच्या हृदयात देखील तेच वास करीत आहेत मग त्याला तुमचे काय चालले आहे ते कळत नाही का? ज्योतीच्या आतले वास करणारे सांगत आहे की ज्योतीला पूर्ण कळत आहे ती काय करीत आहे. तुम्ही सांगा मानवी स्थुलाला आतले अन् बाहेरचे काही कळते का ? त्याला त्याची जाणीव आहे का? तुम्ही त्यांच्यापासून लाखो कोसांवर जा. तुम्ही गेलात म्हणजे स्थुल गेले. तुमच्या स्थूलात वास करणारे तत्व तुमच्याबरोबर आहे. ते आहे म्हणून तुम्ही गेलात. कोणाच्या सहाय्याने गेलात? तत्वाच्या सहाय्याने गेलात. ते तत्व मनाजवळून तुमचे शरीर हलवून घेते. ज्या सताचे सत्-चरण तुम्ही पाहणार आहात ते तत्व मनाला जाणीव देऊन मनाला हलवते. म्हणजेच ते तत्व तुम्हाला सोडून असते का नसते? तुम्ही कुठेही गेलात तरी ते तुमच्या बरोबर असते. सत् हे सगळीकडे असते अन् त्याला सर्वस्वाची जाण असते. या पंचमहाभूतांच्या कवचामध्ये ते वास करून आहेत. लक्षात घ्या, मला सोडून सत् नाहीत अन् सताना सोडून मी नाही. मी आणि माझे सत् एकमेकाला बांधील आहोत. मग जें स्थुल आहे ते त्यांच्याजवळ स्थिर का नाही करत? तू आणि सत् एकच आहेत, कवचात तुही आहेस अन् कवचात सत् देखील आहे. आज आपण पाहतो, मानव चंद्रावर गेला, मंगळावर जाण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वस्व शोध घेण्याचा, यंत्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु मानव नामक यंत्र मात्र तो अजून तयार करू शकलेला नाही. हे मानव यंत्र अनंतांची निर्मिती आहे. अन् यातच खरे गुह्य आहे. तेच अनंत पंचमहाभूतांना संदेश सोडून कार्य करून घेत आहेत. कसे संदेश देऊन कार्य करून घेत आहेत हे कळण्याची मात्र कोणाचीही ताकद नाही. त्रिगुणांची देखील ती ताकद नाही. तुमच्या स्थूलात कसे प्रवेश करतात, हे ही कळत नाही. असे असून देखील त्यांच्या चरणांवर आम्हा मानवाना मन स्थिर करता येत नाही. असे कां ? मनाने बाजारगप्पा चालतात, मनानेच चिंतन चालते.सेवेकरणीने त्यांना असे म्हणावे की माझी काय चूक झाली हे मला कळत नाही, मग त्या सेवेकरणीने दोन तपे काय तप:श्चर्या केली?
आपल्या आसनाजवळ लाघव आहे. लाघव झाल्यावर, त्रास होऊ लागल्यावर मग मात्र सेवेकरी आसनाजवळ धाव घेतात. पूर्वी अशी त-हा नव्हती, पण ज्यावेळी हे लक्षात आले की सेवेकरी आसनाला, सद्गुरूंना बनवतात, तेव्हा लाघावाची त-हा ठेवणे क्रमप्राप्त झाले. अनंतांनी संदेश दिले, लाघव करण्यासाठी चैतन्य निर्माण करून त्याला अधिकार बहाल करा. लक्षात घ्या, चैत्यानाला त्यांनीच निर्माण केले. आम्हालाही त्यांनीच निर्माण केले. अधिकारदेखील त्यांनीच बहाल केलेत. अन् सांगितले की चुकीच्या मार्गाने गेल्यावर लाघव करा. सांगणारे कोण? तेच. भक्तांना शुद्धीवर आणणारे कोण? तेच. जन्माला त्यांनीच पाठविले. तुमचे पालन-पोषणही तेच करीत आहेत. दाही इंद्रीयांकडून कारभार देखील तेच करून घेत आहेत. मनाच्या चाकोरीतून व्यवहार करून घेताना आपणही स्थिर आहेत. असे असूनदेखील दोन तपे नामस्मरण केलेल्या ज्योतींना आपली चूक काय झाली हे कळू नये, तर मग सद्गुरूंनी तरी काय करावे?
उद्या अनंतांनी आम्हाला विचारणा केली की एवढी वर्षे तुम्ही सेवेकरणीला उपदेश केलात मग सेवेकरणीने तुमच्याकडून ज्ञान काय मिळविले? यावर आम्ही काय उत्तर द्यावे? आता तुम्ही सांगा, आसनाची घटक असलेल्या सेवेकरणीने काहीही केले तरी चालेल का? तर नाही. लक्षात ठेवा, मन सदोदित उघड, येणे शुद्ध-शुचिर्भूत पाहिजे. सेवेक-याच्या डोळ्यातून अश्रू आल्यानंतर सद्गुरु कधीही शांत बसणार नाहीत, पण ते बनवाबनवीचे अश्रु असतील तर लक्षही देणार नाहीत.
आपल्या भक्ताने वा सेवेक-याने अव्यापारेषु व्यापार करू नयेत. लक्षात घ्या, आज हे आपले आसन महान महान तत्वे, ऋषी-मुनिंबरोबर व्यवहार करते. संदेश आदान-प्रदान करते, मग या अशा आसनाच्या सेवेक-याची पातळी कशी हवी? तर अत्यंत उच्च-गतीची हवी.
जरी आपण या कलीयुगात असलो तरी आपण त्यांच्या सतत सान्निध्यात वावरत आहोत, त्यांच्या बरोबर संवाद साधत आहोत. मग आपल्या विचारांची गति, विशालता, उच्च हवी की नको? ही जाण प्रत्येक सेवेक-याने घेणे आवश्यक आहे. अन् ही जाण घेवून त्याप्रमाणे कृतीमान असणे देखील आवश्यक आहे. पूर्वी आम्हाला अनंतांनी संदेश दिले आहेत, आसनाधिस्त ! महान महान ऋषी-मुनी चकले तेथें या कलियुगी मानवांचा काय पाड लागणार आहे? त्यांनीच पुढे संदेश दिलेत, तत्त्वापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ ! तत्व कितीही महान असले तरी त्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठच आहे. तत्व महान असेल पण कर्तव्य नसेल तर त्याची किंमत शून्य. जो मानव आज या आसनावर आहे त्याच्या प्रणवाला इंद्रासारखा देव देखील आदर देतो. अशा मानवाची जर तुम्ही उपासना केलीत तर तुमचे अनहित होईल का? जो मानव इंद्रासारख्या तत्वांना संदेश देत आहे, अन् इंद्रासारखे तत्व त्या मानवाजवळ क्षमेची याचना करीत आहे, मग असा मानव श्रेष्ठ नाही का? असा मानव तुम्हाला कधी अधोगतीला पाठवील का? आमचे संदेशच असे आहेत, सन्मार्गाने चला, नितीमत्तेने चला, पवित्र आचरण ठेवा, म्हणजेच तुम्हाला मला डोळेभरून पाहता येईल. पवित्र आचरण नसेल तर तू कसा बरे मला पाहू शकशील? मन स्वच्छ होण्याकरिता नाम पाहिजे. मन स्वच्छ होणे कठीण आहे हे आम्ही मानतो, पण सतत नामस्मरणाच्या गतीत राहिल्यानंतर ते स्वच्छ होते. नामस्मरणाच्या गतीने जात जात एकदा कां मन त्यांच्या चरणांवर स्थिर झाले, मग वेगळेपण शिल्लक राहत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सांगितले, यदात्मा दृढनिश्च्ययी मे भक्ता समप्रिय: !! असा दृढनिश्च्ययी भक्त असेल त्याच्यासाठी तेही लगेच प्रगट होतात अन् पाचवा प्रणववेदही लगेच प्रगट होतो.
हे जें स्थान आहे ते सत्पदाचे स्थान आहे. अर्थात विश्वाचे निर्माते अनंत त्यांचे स्थान आहे. ज्यांचा अंत नाही ते अनंत ! ते भक्तीचे आगर आहेत, तेथें ऋद्धी-सिद्धी नाही, तंत्र-मंत्र नाही. फक्त भक्तिचा मार्ग नामस्मरण, ध्यान-धारणा अन् मन सतचरणात लीन करणे. ज्या अनंतांनीच हे निर्माण केले आहे त्यांना कोणी आव्हान करू शकेल? हे स्थान हे केवळ शुद्ध भक्तीचे स्थान आहे. लक्षात ठेवा, भक्ति केल्याने ऋद्धी-सिद्धी, तंत्र-मंत्र सर्वस्व मिळते. ज्याच्या ठिकाणी भक्ति, त्याच्या ठिकाणी अनंतांचा वास. त्या ठिकाणी अष्ठसिद्धी देखील वास करू शकतात. ज्याठिकाणी ॐकारांचे स्थान आहे, ज्या ठिकाणी ते वास करीत आहेत, मग तेथें काय शिल्लक आहे? ज्या ॐकारांचे ठिकाणी त्रिगुण आणि त्यांच्या तीनही शक्ति हात जोडून उभ्या असतात, असे तत्व जर भक्ताच्या सान्निध्यात असेल तर मग भक्ताला काय कमी आहे? अशा तत्वाच्या ठिकाणी भक्ताने, सेवेकर्याने बनवाबनवी का करावी? पण ही बनवाबनवी कशासाठी होते तर पैसा! पण आपण एवढेच म्हणायचे, अनंता मी केवळ आपल्या चरणांचा पाईक आहे. आम्ही आमचे सर्वस्व आपल्या चरणी अर्पण करतो. आपण अनुभवले आहे आपले काही सेवेकरी स्थुल सोडून गेले. त्यांनी आपल्या बरोबर जाताना काय नेले? स्वत:चे कवच देखील इथेच सोडून जावे लागते. अन् शेवट शिल्लक काय राहते? तर केवळ आठवणी. ज्योत तेथें जवळच असते, पण ती तुम्हाला पाहता येत नाही. हाच जर पडदा दूर झाला तर तुम्हाला पाहता येईल. याकरिता पाचवा प्रणववेद पाहिजे. जें भक्त आहेत ते सत सान्निध्यात आहेत. सुक्ष त-हेची अनंत नाटके अनंतांनी नटवून ठेवली आहेत. पण ती भक्तासाठी नाहीत. आपले काही सेवेकरी भित्रे असल्याने ते या सुक्ष्माच्या नाटकांना घाबरतात. रामदास स्वामिनी म्हटले आहे, वाजे पाउल अपुले, म्हणे मागे कोण आले? जेथे शंकराचे स्थान तेथें पिशाच्च त-हा असणार, पण जिथे श्रीहरीचे स्थान तिथे पिशाच्च त-हा वा-यालाही थांबणार नाही. जरी तो शंकर भूतनाथ असला तरी तो सताचा भक्तच आहे. 
क्रमश: पुढे चालू ........3