शनिवार, ७ जुलै, २०१८

अतरंगी रंगुनी जावे । (परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची अमृत वाणी)

महेश हे तत्व सतमय होते. अन्यथा काही ओळखणे नाही अशा तर्हेने महेश होते. तसा भक्त सुद्धा त्या गतीने गेला, दुसरे कांही ओळखणे नाही, तरंगात रंगला तर तो सुद्धा अंतरंगात रंगून जातो.

अंतरंगाला सुद्धा रंग नाना आहेत. पण आपल्या सात्विकतेचा रंग कसा असणार? तर शुभ्र वलय! बाकी रंग आहेत. पितवर्ण आहे, निलवर्ण आहे, परंतु आपल्याला रंग कोणता पाहायचा असतो? शुभ्र  वर्ण !

शुभ्र वर्ण म्हणजे स्वयंम प्रकाशाचा वर्ण. तो सताचा वर्ण. त्याची झाक कोणती आहे? सताची आहे.  सतावेगळे ते नाही मग अशा अंतरंगात जर लयबद्ध झालात, तरळलात तर तुमच्या अंतरंगात चैतन्य प्रगट होईल अन त्या ठिकाणी सत स्थिर राहील अन तुम्हीं त्या दर्शनात स्थिर रहाल, लय व्हाल ! कसल्याही प्रकारची भ्रांती रहाणार नाही.

पण हे होण्यासाठी या उच्च पायरीप्रत जाण्यासाठी प्रथम पायरी कोणती? तर नाम! प्रथम पायरी कोणती? तर नामस्मरण.

"अखंड नाम" त्याला त्रिपदा गायत्री म्हणतात. तीन ताळ, सप्त पाताळ, एकवीस स्वर्ग भरलेले आहे अन भरूनही अलिप्त आहे असे परमनिधान तत्व ते नाम, जे सद्गुरू आसनावरून प्राप्त झालेले आहे. त्या नामस्मरणात राहिलेच पाहिजे , चॊविस तासातून थोडा का अवधी मिळेना नामस्मरण हे केलेच पाहिजे. थोडी तरी ध्यानधारणा, अभ्यास केलाच पाहिजे त्याला भक्तिमार्ग म्हणतात .

अतरंगी रंगुनी जावे । (सद्गुरू स्वामी भगवान महाराज )
क्रमशः

गुरुवार, ५ जुलै, २०१८

अंतरंगी रंगुनी जावे ।

अंतरंगी रंगुनी जावे । नेत्र भरुनी चरण पहावे ।।
31 जुलै 1986
(परम् पूज्य श्री सद्गुरू माऊलींची अमृतवाणी)

नेत्रात रंगुनी जावे म्हणजे काय ? नेत्र म्हणजेच ज्योत. कशाने कोणत्या गतीने रंगुनी जावे ? कोणत्या पद्धतीने रंगुनी जावे ?

कारण हे नेत्र म्हणजे दृष्टी, डोळे, ज्याला आम्ही त्रिकुटी म्हणतो. डोळे, कान, अन वाणी ही मिळून त्रिकुटी आहे. याच्यावर जो ताबा मिळवेल तो सर्वरहीत स्थिर होऊ शकेल. त्याचे नेत्र सर्वरहीत स्थिर होऊ शकतील. नेत्र हे चंचल असतात. ते स्थिर आहेत कां ? एका दृष्टीक्षेपात तो अनंत तऱ्हा पहात असतो . अन तसे त्याचे विचारही निर्माण होत असतात.

आता ही दृष्टी म्हणजे ते नेत्र. त्यात रंगुनी जावे म्हणजे काय ? जी सतभक्तीने आचरण करणारी ज्योत आहे, सताशिवाय दुसरे नेणे नाही, जाणे नाही, अशी ज्योत असेल त्याच्या नेत्र बिंदूजवळ नेहमी सतचरणच तरळत असतात. दुसरे कांही तरळणार नाही. तो पाहताना सदगुरु दर्शनातच लय असणार , त्याचे तरंग कसे असणार तर सतमय असणार. आता नेत्रात सतमय तरंग असले तर त्या तरंगात तो लय बद्ध होतो, त्यातच तो रंगून जातो हा या श्लोकाचा भावार्थ आहे. त्याला सतमय गती प्राप्त होते अन त्यातच तो रंगून जातो. अशा त्या गतीमध्ये तो भक्त, जो सतभक्त असेल तो.

सतभक्त कोणाला म्हणावे, त्याची व्याख्या काय? जो सताशिवाय दुसरे अन्यथा ओळखणे नाही, जाणणे नाही, पाहणे नाही, सत हेच माझे सर्वस्व निधान, सताप्रत भक्तीच्या गतीने जाणारी ज्योत असणार, सताशिवाय वेगळे पाहणे नाही अशी जी ज्योत असेल, ती ज्योत मग ती स्त्री असो वा पुरुष असो, प्रकृतीने जरी भिन्न तरी सगळ्यांना अधिकार समत्व आहे. त्या गतीने ती ज्योत सतचरणावर ध्यानयुक्त तऱ्हेने म्हणजे ध्यान कुठे तर मनाने अन पाहणे कुठे असते तर अंतःर्दृष्टीने, बहिर्दृष्टी रंगली, सतमय बनली, सतचरणावर स्थिर झाली मग अंतरंग देखील तसेच होणार, अंतःर्मन कसे होणार?

यस्य स्मरण मात्रेन । ज्ञानमुत्पध्यते स्वयंम ।
स एवं सर्व संपत्ती तस्मै श्री गुरवे  नमः ।।

महेश अंबेला सांगत आहेत माझे गुरू कसे आहेत की ज्यांचे स्मरण केले , ज्यांची आठवण केली, ज्यांचे ध्यान केले तरी लगेच तरळतात, लगेच प्रगट होतात आणि ते मला जाणीव देतात, दर्शन देतात असे जे महान पद त्या सद्गुरूंना माझा नमस्कार असो . क्रमशः
🙏🙏🙏🙏
टायपिंग : श्री रविंद्र वेदपाठक

मंगळवार, ३ जुलै, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 5

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

(परम् पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)

माझी कन्यका अहिल्या! पतीशापामुळे किती अवधी कोणत्या स्थितीत पडून होती? अशी स्थिती असताना आम्हाप्रत संयमनात्मक स्थिती होतीच ना! सताला सर्वस्वाची जाण होती. आम्हांसही सर्वस्वाची जाण होती.  पण मानवांना कल्पनेत यावयास हवे म्हणून किती अवधी त्याच स्थितीत स्थित होती.

भगवंताने स्थूल रुप धारण करून, तुम्हा मानवांना स्थुलरुप मिळाल्यानंतर कशी स्थित्यंतरे येतात त्याची स्वयंम आपणांस जाणही दिधली आहे. तरीही मानव विसरतो.

सुख आले तर मानव तास, मिनिष, महिना, वर्षे याची गणती करत नाही, परंतु दु:ख आले तर मानव क्षणापासून सुरवात करतो. पण मानवाने कल्पनेत घेतले पाहिजे आपण कोणाचे सेवेकरी आहोत? सताचे सेवेकरी आहोत.

कालानुसार, भोगत्वानुसार सुखदुःखे ही येणारच! पण जी सताची दृष्टी तुम्हाप्रत आहे ती कृपादृष्टी ह्या सर्वस्व स्थितीतून तुम्हास मुक्त करणार का नाही?

मानवास थोडीसी दु:खमय स्थिती झाल्यानंतर मानव चंचल बनतो. पण महान महान स्थितीनी किती दु:खमय स्थिती सहन केली आहे.

आपण जाणताच स्वयंम सत स्थुलाने अपुल्या स्थितीत होते ना! आपण सर्वस्वानी त्याची जाण घेतली का नाही? तरीही सताने अशी प्रणवाकृत स्थिती केली.

अपुले कर्तव्य आहे, सताप्रत प्रणव देणे अन सताने ते ग्राह्य करणे. पण हतबल होणे नाही. तुम्ही सताचे सेवेकरी आहात. संयमता ही ठेवलीच पाहिजे, लीनता ही ठेवलीच पाहिजे.

अवधितच आपण मजला माझ्या योगीनीचे प्रणव प्रस्थापित केलेत. मी योगीनीला सोडून आहे की योगीनी मजला सोडून आहे! सत तीजला सोडून आहे की ती सताला सोडून आहे! तीच्या सर्वस्व सुखदु:खाची जाण आम्हाला आहेच!

निवेदन देणे हे आपुले कर्तव्यच आहे. आपण सर्वस्व भक्त या भगवंताचे आहात, या सताचे आहात. ह्या सताला सर्वस्वांच्या सुखदुःखाची जाण आहे का नाही?

भगवंत भक्ताप्रत कधी लय होत असतो? भक्ताप्रत संयमता आहे, लीनता आहे, नम्रता आहे, सतशुध्दता आहे पण परीपूर्ण श्रध्दा ? श्रध्दा येणे दृढनिश्चय! येणेच नि:स्सीम प्रेम! जर भगवंताप्रत भक्ताचे नि:स्सीम प्रेम असेल तर भगवंत भक्तात लय होतात ना? अन मानवी स्थितीत सताने तुम्हास याची कल्पना पूर्णत्वाने दिधलेली आहे ना! जिथे नि:स्सीम प्रेम तऱ्हा आहे तेथे भगवंत ताबडतोब प्रगट होतील. कशामुळे? श्रध्देमुळे, लीनतेमुळे, नम्रतेमुळे, संयमतेमुळे ! म्हणून भगवंत भक्ताप्रत लय रहाण्यासाठी हे सर्वस्व गुण भक्तामध्ये हवेत. तरच तो भक्त ज्ञान ग्रहण करु शकेल. *" आपणास कल्पना आहे विषय मानवाप्रत असतो अन विवेचन आम्हाप्रत असते"*
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले

सोमवार, २ जुलै, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 4

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

प्रथम मानव, त्याला ईष तत्वाची जाण मिळाल्यानंतर तो मनुष्य, अन त्याचा उपदेश पूर्णत्व ग्रहण केल्यानंतर नंतर योगी!

मानवाला सताने ज्ञानही दिधले, अन भक्तिही दिधली. *"ज्ञानाविना भक्तिही शून्य अन भक्तिविना ज्ञानही शून्य"*

आपुले मन सतचरणावर लीन झाल्यानंतर भक्ति होते. सदगुरु चरणांजवळ आल्यानंतर ज्ञानही प्राप्त होते अन भक्तिही प्राप्त होते. परंतु ते मानवाने कसे ग्राह्य करायचे असते?

मनात जर पूर्णत्वाने सत् भक्ति असेल तर बौद्धिक स्थिती विशाल होईल. बौद्धिक स्थिती विशाल झाल्यानंतर ज्ञानही विशालच होईल. तरच त्याला ज्ञानाचा अन भक्तीचा प्रत्यय येईल. आपण स्थित रहावयाचे, सतशुध्द रहावयाचे, मन सतशुध्द करावयाचे, नम्र रहावयाचे, प्रणव लीनतेने द्यावयाचे तरच गती गतीने तुमच्या ज्ञानात, भक्तित पूर्णत्वाने वाढ होईल.

भक्त भगवंताप्रत का येत असतो? भक्तिसाठी आणि ज्ञानप्राप्तीसाठी तो सतचरणाप्रत येत असतो का? येणे भक्त भगवंताप्रत येतो, तो सुख, दु:ख सांगण्यासाठी. कलीयुगी स्थितीप्रमाणे, आर्यवर्त स्थितीप्रमाणे भक्त भगवंताप्रत जात होता तो ज्ञानासाठी. परमेशाला पूर्णत्व पहाण्यासाठी!

परंतु या कलीयुगी स्थितीत कशी स्थिती होते?
तर आपली सुख दु:ख  सताने येणे भगवंताने ग्राह्य करून सुखशांती दिधली पाहिजे.

अन जर का भगवंताकडून अशी स्थिती झाली नाही तर मग भक्त चंचल होईल. भगवंताने आपली सुख दु:खे ग्राह्य केली नाहीत तर आपली सर्वस्वांची स्थिती चंचल होते. चलबिचल होते.

मग तो मानव असो, सेवेकरी असो, तो कसा प्रणव देईल? आम्ही आपल्या चरणांवर शरण आलो आहोत यातून मजला सोडवा.

आपण प्रणव दिधलें भक्त भक्तिसाठी सताप्रत येत असतो, अन तोच भक्त पुन:श्च प्रणव कसे देतो?

आपणा सर्वस्वांच्या ज्ञानात अधिकाधिक तेजोमय स्थिती होण्यासाठीच हे प्रणव दिधलें आहेत.

भक्ताचे प्रणव ग्राह्य करणे हे भगवंताचे कर्तव्यच आहे. अन भक्ताने भगवंताप्रत प्रणव देणे हे भक्ताचेही कर्तव्य आहे.

परंतु हे आपणास असे प्रणव प्रस्थापित का केले? इतुके ज्ञान आपणाप्रत असताना आपणाकडून प्रणवांची स्थिती का होऊ नये?

भगवंताने स्थुलरुप धारण करून सुखदु:खे भोगली का नाही? त्या अवधीत भगवंत कसे होते? स्थिर, शांत, संयमी होते. पण तोच भक्त थोडीसी दुर्मिळ स्थिती झाली तर कसा होतो? चलबिचल होतो. अवधितच स्थितीही प्रगट करतो.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शनिवार, ३० जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |* 3

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

*"लाघव"*
सत स्थुलात असताना आपणा सर्वाना प्रणव द्यायचे,"हे पहा तू जर चुकीच्या स्थितीने गेलास तर तुला "लाघव" होईल."

मानवी स्थितीप्रमाणे मोहमाया अंध:काराच्या स्थितीत मानव लाघवी स्थितीला पात्र व्हायचा.

सत पदोपदी प्रणव द्यावयाचे, परंतु लाघव झाल्यानंतर तोच सेवेकरी सद्गुरू माऊलीजवळ नतमस्तक होऊन लीनतेने प्रणव द्यावयाचा, "सता!मला या त्रासयुक्त स्थितीतून मुक्त करा." म्हणजेच सताजवळ क्षमा मागणे. तदनंतर सत आपणास पूर्णत्वाने प्रणव द्यावयाचे,"पुन:श्च अशी स्थिती होणे नाही. पुन:श्च अशी स्थिती झाली तर लाघव स्थिती मानवाला पूर्णत्व होईल."

अशी स्थिती, स्थित्यंतरे होऊन गेली तरी सताने तुम्हास पूर्णत्वाने ठेवली आहे ना ? कारण कलीयुगी स्थितीत इतरत्र भ्रमणता होऊ नये, परंतु तरी देखील आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडतात ना?

म्हणूनच मी आपणास आदेशात्मक स्थिती केली. आपण सताचे सेवेकरी आहात सताचा सेवेकरी कसा असला पाहिजे? सतशुध्द पाहिजे, लीन पाहिजे, नम्र पाहिजे.

सत स्थुलात असताना प्रणव द्यावयाचे,"माझे सेवेकरी आहेत, कलीयुगी स्थितीतून मजप्रत आलेले आहेत. सता! मी पूर्णत्वाने त्यांना मजप्रत घेतले आहे. आपणही त्या ज्योतीची पूर्णत्व स्वीकृती करणें".

ते प्रणव आपण सर्वस्वानी ग्रहण केले आहेत. अशी स्थिती असताना मानवी स्थितीप्रमाणे अहमता (अहंकार) आपणाप्रत येत असते? ज्या सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली, अन जाण दिधली असताना, कृतीमान झाली असताना आपणाकडून अशी स्थित्यंतरे घडणे यथायोग्य नाही.

जोपर्यंत सत आपणास समजाऊन घेत नाही तोपर्यंत मानवाला क्षमा होईल का? नाही होणार! सताने आपणास समजावून घेण्यासाठी आपण लीनता, नम्रता, संयमता ठेवलीच पाहिजे.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

शुक्रवार, २९ जून, २०१८

संसार करून परमार्थ साधा !

परम् पूज्य श्री सद्गुरूस्वामी भगवान महाराज म्हणतात, "आपणाला प्रपंच करावयाचा नाही, तर आपल्याला काय करावयाचा आहे? "संसार".

प्रपंच ह्या शब्दाचा अर्थ पाहिला तर - प्र म्हणजे प + र म्हणजेच "पर" (इतर) आणि पंच म्हणजे "पंचाईत". याचाच अर्थ साध्या शब्दात सांगायचा म्हणजे परक्याची पंचाईत म्हणजे उठाठेव न करणे. इतरांच्या बाबतीत लक्ष न घालने. स्वतः स्वतःची उन्नती करून घेणे. (पारमार्थिक अर्थाने)

या प्रपंच शब्दाचे इतरही अनेक अर्थ होतात व ते सुद्धा पर म्हणजेच इतरांच्या बाबतीतच असतात. म्हणून भक्ताला काय केले पाहिजे तर "संसार".

आता संसार या शब्दाचा अर्थ पाहू. "संसार" येणे "सगुणाचा सार" येणे आपण मानव देहाने आहोत म्हणजेच सगुण आहोत. आणि सार येणे  मानव देहाचे कर्तव्य कर्म. ते आपण कसे केले पाहिजे ? तर ते सतमय मार्गाने करावयास हवे.

आपणास निर्गुणाप्रत म्हणजेच आपल्या सद्गुरूंप्रत जावयाचे आहे. ते कसे शक्य होईल? तर ते सतमय मार्गाने, मनोभावे सद्गुरूंची सेवा तिन्ही अंगाने येणे तन, मन, धनाने केल्यासच ते शक्य होईल. यासाठीच सद्गुरू माऊली म्हणतात, "संसार करून परमार्थ साधा". संसार केल्यानेच परमार्थ साधता येईल, अन्यथा नाही. प्रपंच करून परमार्थ साधता येणार नाही.

*ईश्वर म्हणे वो देवी |* 2

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम् पूज्य गुरुदेव पितामह यांची अमृतवाणी)*

*"क्षमा"* आणि ती केव्हा अन कधी होते? क्षमेची याचना केव्हा होते? मानवाकडून चुका झाल्यानंतर मानव सताप्रत क्षमेची याचना करतो, अन सत ते मान्य करते. सताने मान्य केल्यावर मानव कसा होतो? तृप्त होतो. मानवाची मनोमन कल्पना कोणती होते? माझ्या सताने मला क्षमा केली आहे. परंतु क्षमा झाली असे आपणास पूर्णत्व कल्पना येते का? सद्गुरू मुखातून प्रणव निघाल्यानंतर पूर्णत्वाने येते.

सद्गुरू मुखातून सतशुध्दच प्रणव बाह्य स्थितीत पडत असतात.

क्षमा येणे सामाऊन घेणे स्थिती नाही तर समजाऊन घेणे स्थिती आहे. आपणास प्रत्यय येतो सताने क्षमा केली. आपण मनोमन प्रफुल्लमय होता. आपल्या चुकांची क्षमा झाली आहे. परंतु त्या सतमाउलीने आपणास समजाऊन घेतले म्हणूनच तुम्हास क्षमेची स्थिती झाली ना? नाहीतर मानवांची कोणती स्थिती होते?

द्विधा ही आगळी वेगळी स्थिती आहे, क्षमा ही आगळी वेगळी स्थिती आहे. सताने आपणास समजावून घेतले येणे प्रणवाकृत करून, सतशुध्द करून आपल्याप्रत घेतले नाही का ?

आपणास कल्पना आहे, सद्गुरु येणे माउली एकलय झाली ना ? अन एकलय झाल्यानंतर तो योगी, तो मानव, तो मनुष्य, तो जीवात्मा सतशुध्द होतो. पूर्णत्व लीन अन नम्र अशी जेव्हा जीवात्म्याची स्थिती होते तेव्हाच सत त्यास क्षमा करते येणे समजाऊन घेते.

बुधवार, २७ जून, २०१८

*ईश्वर म्हणे वो देवी |*

*ईश्वर म्हणे वो देवी |*
*तुझी आवडी मातें वदवी ||*
*लोकोपकारक प्रश्न पूर्वी |*
*देवी दानवी जो न केला ||*

*(परम पूज्य गुरूदेव पितामह यांची अमृतवाणी)*


महेश अंबेला प्रणव देत आहेत, जो कोणी प्रश्न मला केला नाही तो प्रश्न तू मजला केला आहेस, अन त्याचे उत्तर मजला तुजला द्यायचे आहे.

अवधिपूर्वी मी आपणास कोणते प्रणव प्रस्थापित केले होते? लिनता, नम्रता, संयमता मानवाने सतत आपणाप्रत घेतली पाहिजे. तरच  मानवाची या कलीयुगी स्थितीत प्रगतिमय स्थिती होईल. अहंमतेने होईल का? नाही.

सत आपणास ज्या अवधीत सानिध्यात घेते त्याअवधीत प्रथम काय करते? प्रथम आपुली भूमी येणे आपले शरीर शुद्ध करीते. भूमी शुद्ध करीते येणे कोणती स्थिती तर मन शुद्ध करीते. भूमीतच मन आहे ना? भूमी शुद्ध केल्यानंतर मन शुद्ध होणारच! अर्थातच सत आपणास सानिध्यात घेण्याच्या प्रथम आपली भूमी शुद्ध करीते, येणे आपणात जी अहंमता आहे ती नाश करण्याची स्थिती करीते. अहंमता गेल्याविणा शुद्धत्वता येणार नाही, मन स्थिर होणार नाही. अन तदनंतर आपणात ज्ञानबीज पेरते.

ज्ञानबीज म्हणजे काय? तर सत आपली भूमी सतशुध्द करून, आपली शारीरिक स्थिती सतशुध्द  करून आपणाप्रत घेते अन आपणाप्रत घेऊन ज्ञानयुक्त प्रणव अर्थात उपदेश आपणास प्रस्थापित करीत असते.

उपदेशात्मक स्थिती याने ज्ञानाचे बीज! जर आपण सताचे प्रणव पूर्णत्व ग्राह्य करून कर्तव्यत: साधली असती तर आपणाकडून स्थित्यंतरे झाली असती का? येणे सताने जे ज्ञानबीज आपणात पेरले ते आपण विसरलात. कशामुळे? अहंमतेमुळे! अहंमता आल्यानंतर ही सर्वस्वी स्थिती होत असते. अन्यथा अशी स्थिती होणार नाही.
टायपिंग : श्री सुभाष भोसले

मंगळवार, २६ जून, २०१८

मन......!!!

मन हा असा वारू आहे , सुटला तर कधी स्थिर राहणे शक्य नाही. त्या वरवरच तुम्ही स्वार होण्याचा प्रयत्न करा. त्याचा लगाम आपल्या हातात घ्या. लगाम घेतल्यानंतर आपल्या सद्गुरूंचे स्मरण करा. मग तो वारू आपोआप ताब्यात येईल, शांत होईल. गुरू स्मरण जर केले नाही तर तो ताब्यात कसा येईल, शांत कसा होईल ?

मनाच्यावर ताबा मिळविण्याची शक्ती केवळ सद्गुरूंची आहे, इतरांची नाही. कोणीही करणार नाही, केले नाही, करविता नाही हिच तर गुरुमार्गाची खरी मेख आहे. मनाची ठेवण शुद्ध शुचिर्भूत राहिली पाहिजे. अन मनाच्या अशा ठेवणीनेच आपण गुरू मार्गाने गेले पाहिजे.

जो गुरू ब्रम्हउपदेशक आहे, सात्विक तत्व आहे, अविनाशी परम तत्वाची जाणीव देण्याची शक्ती त्याच्याजवळ आहे, त्या परमपदाप्रत स्थिर करण्याची पात्रता ज्याची आहे असाच गुरू हवा.

गुरुतत्व अर्थात असा गुरू अहंकारी असता कामा नये. अशाच गुरूला शरण जा आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे वाटचाल करा. अन ती केलीच पाहिजे. मग ते गुरू स्वत: तुम्हाला सुखी करतात, शांती देतात.

मानवाच्या मनाची ओढण त्या गुरुउपदेशाप्रमाणे असायला हवी. मग ते सांगतात मी तुझ्यातच वास करून आहे.

परब्रम्ह हे त्रिगुणावेगळे आहेच आहे परंतु त्यातच ते सामावलेले देखील आहे. त्रिगुण रहित ते परब्रम्ह आहे. याचे सार म्हणजे लिनत्व असेल तरच मेख सापडेल, अन्यथा सापडणे शक्य नाही. आपला अंत कळू देणार नाहीत कारण अनंत लाघवी शक्ती आहे.
(परम् पूज्य श्री सद्गुरू स्वामी भगवान महाराज यांची प्रवचने)
टायपिंग असिस्ट: श्री रविंद्र वेदपाठक

सोमवार, २५ जून, २०१८

*कवणे मार्गे जी स्वामी |* 2

*कवणे मार्गे जी स्वामी |*
*जीव ब्रम्हरुप होती तें मी ||*
*पुसतसे तरी सांगिजे तुम्ही |*
*अंतर्यामीं कळे ऐसें ||*

*(परम पूज्य गुरुदेव पितामहांची अमृतवाणी)*

सदगुरूनी सेवेकऱ्याच्या मनावर ताबा मिळवल्यानंतर सेवेकऱ्याचे मन कसे राहिले पाहिजे तर सतशुध्द राहिले पाहिजे. परंतु तसे रहात नाही.

सत्य अन असत्य ही स्थिती मन चंचल झाल्यावर होत असते. म्हणून सर्वात प्रथम सेवेकऱ्याने सद्गुरुमय झाले पाहिजे. सेवेकरी सद्गुरुमय झाला नाही तर तो ज्ञानाचा आस्वाद कसा घेऊ शकणार? याकरीता सेवेकऱ्याने सद्गुरुमय व्हायला पाहिजे. मानवाचे मन सदगुरुमय झाले तर मानवामध्ये शंका, कुशंका, चंचलता, सत्य, असत्य राहील का?

ज्ञानार्जनाची आवड आहे परंतु मन चंचल आहे, कशासाठी आपले मन चंचल आहे? आपण सत स्थानात आहात ना? मग मनामध्ये चंचलता का येते? ती न येण्यासाठी प्रथम मानवी स्थितीप्रमाणे मन सदगुरुमय करणे.

आपणास या भवसागरातून तरुण जायचे आहे, वाहून जायचे नाही. आपणा सर्वस्वाना सताचे सानिध्य घेऊन, ज्ञानार्जन करून सत स्थितीत स्थिर केले आहे. परंतु कलीयुगी स्थितीप्रमाणे आपुल्या मनाची स्थिती स्थिर शांत रहात नाही.

सदगुरु स्थानात प्रयाण झाल्यानंतर ज्योत सदगुरुमय होते. परंतु स्थानातून बाहेर पडल्यानंतर तीच ज्योत संशयातीत होते. सताचे स्थानातील ज्योतीने स्थुल त्यागीले आहे परंतु कर्तव्य त्यागीले आहे का तर नाही.

सत आपणास पदोपदी प्रणव देत होते आपणा सर्वस्वांचे कर्तव्य पाहून मी आनंदीमय आहे. परंतु अशी स्थित्यंतरे निर्माण झाल्यानंतर सताकडून आपण कोणते प्रणव घेणार आहात? ज्ञानाची स्थिती ग्रहण करावयाची असेल तर ते ज्ञान ग्रहणतेत येईल.

प्रथम मन सदगुरुमय करा, शीतल, शांत, द्वेषरहीत करा, शंकारहीत व्हां. स्थुल अनेक आहेत परंतु जडविता, घडविता एकच आहे. सताने स्थुलात आपणास ज्ञानमय प्रणव प्रस्थापित केले ते पूर्णत्व ग्रहण करा. ते पूर्णत्वाने मनन करा .

आपण सताचे सेवेकरी आहात. अन सत स्थितीत अशी स्थित्यंतरे होणे यथायोग्य नाही. सताने किती अवधी आपणास ज्ञानोपदेश केला. अन तो ज्ञानोपदेश आपण सर्वस्वानी पूर्णत्व ग्रहण केला असता, मननतेत पूर्णत्व घेतला असता तर अशी स्थित्यंतरे घडली नसती. सताने आपणास सर्वस्वाची जाण दिधली आहे. अन अशा सताचे तुम्ही सेवेकरी आहात. अशी स्थित्यंतरे घडल्यनंतर सतानाही दु:ख होईल. ज्ञानोपदेश करणे आमचे कर्तव्यच आहे. ज्ञानोपदेश हा कलीयुगी स्थितीतून मानवाची मुक्तता करण्यासाठी आहे. मुक्त होण्याकरिताच सताने सर्वस्व स्थिती केलेली आहे. परंतु आपण मानव त्याची जाण घेत नाही, कल्पना घेत नाही, अन आचरणात पूर्णत्व स्थितीने आणतही नाही.

सत प्रणवाकरीता आम्ही देखील कर्तव्य करत आहोतच ना? तद्वत आपण सेवेकऱ्यानी देखील आपले कर्तव्य सोडावयाचे नाही. सताने आपणास आद्य कर्तव्य बहाल केले. अन ते आद्य कर्तव्य करीता करीता कोणते कर्तव्य दिधले आहे.

संयमता, लीनता ही ठेवलीच पाहिजे. लीनता, नम्रता, संयमता नसेल तर तो सताचा सेवेकरी शोभून दिसणार नाही. या पूर्णत्व कलीयुगी स्थितीत तुम्हास आपणाप्रत घेतले आहे. शुध्दीकरण स्थितीचीही जाण दिधली आहे. या सर्वस्व जाणीवा ग्राह्यतेत असताना आपणाकडून घडणारी स्थित्यंतरे यथायोग्य नाहीत. *"लीनता, नम्रता, संयमता सर्वस्व पूर्णत्वाने आचरणात आणली पाहिजे."* आपणाकडून हे घडल्यानंतर, ग्राह्य झाल्यानंतर ज्ञानयुक्त प्रणव मी प्रस्थापित करीन. जर ही तीन गुण आपणाप्रत नसतील तर ज्ञानाचा काहीही उपयोग होणार नाही.
टायपिंग असिस्ट: श्री सुभाष भोसले.